जेष्ठ नागरिकांसाठी महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन

Reading Time: 3 minutesआताची नवीन पिढी छोट्या कुटुंबात समाधानी राहते. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात. त्यांच्या घराची जबादारी त्यांच्या पालकांनी पार पाडलेली असते. त्यामुळे नवीन पिढी जोखीम घेऊन तरुण वयापासून एसआयपी किंवा स्टॉक मार्केट अशी जास्त परतावा देणारी पण जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करू शकतात. वर उल्लेख केलेली जी पिढी आहे त्यांचे वयोमान साधारणतः ५४ तो ६६ दरम्यान आहे. त्यांना चांगली मासिक पेन्शन कशी मिळू शकेल? याचा आढावा घेऊ.

चाळीशी पुढील वयोगटासाठी निवृत्ती नियोजन

Reading Time: 2 minutesतरुणांनो यशस्वी नियोजन करून ४० व्या वर्षी निवृत्त व्हा. चाळीशी ओलांडलेल्यांनी पन्नाशीत निवृत्ती घेऊन ती आनंददायी कशी करता येईल? हा विचार करा. या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. चाळीशीतील गुंतवणूकदारांनी जर त्यांच्या करिअरच्या सुरवातीपासून गुंतवणूक केली असेल तर निश्चित त्यांना ५०-५५ वर्षी निवृत्ती घेता येईल. मात्र बऱ्याच जणांच्या बाबतीत दीर्घकालीन गुंतवणूक न होता, आपली नजीकच्या काळातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची बचत झाली.

डायरेक्ट वि. रेग्युलर म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना

Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय दिवसेंदिवस जास्त पसंतीचा होऊ लागल्यानंतर, SEBI ही वारंवार त्यात नवनवीन नियमावली आणून गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत बदल करत असते. १ जानेवारी २०१३ पासून असाच एक बदल लागू झाला, तो म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी दोन पर्याय उपलब्ध झाले. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार दोन पद्धतींनी गुंतवणूक करू शकतात – एक म्हणजे डायरेक्ट प्लॅन आणि दुसरे म्हणजे रेग्युलर प्लॅन.

गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?

Reading Time: 4 minutesनवीन (२०१९) वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्वांनी आपापल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजनाचा आराखडा बनवला असेल. आता ही गुंतवणूक कुठे, कशी करावी? त्याचा साकल्यानं कसा विचार करावा? हे आपण पाहू. नववर्षाची सुरुवात हा करदात्यांचा बहुतेकदा करसवलतींसाठी गुंतवणूक करण्याचा काळ असतो. तेव्हा आज आपण गुंतवणूक आणि करबचत या विषयाकडे वळू.

Retirement Planning : तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा

Reading Time: 4 minutesआजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे. आजच्या तरुण पिढीने जास्त पगाराच्या नोकऱ्या बदलत असताना त्याच्या जोडीला व्यवस्थित आर्थिक नियोजन केले तर नक्कीच ते पन्नाशीला वेळेच्या अगोदर निवृत्ती स्वीकारून आपल्या आयुष्याचा जास्त आनंद घेऊ शकतात.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंड आपल्याला तब्बल ३६ प्रकारच्या योजना देतात, ज्यांचे योग्य संयोजन केल्याने कॅपिटल मार्केटच्या चढ उतारावर मात करता येते. मात्र बरेचसे लोक काय करतात तर म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दिलेले मागील रिटर्न्स पाहून गुंतवणूक करतात, त्यात काही विमा सल्लागार हे बाजाराचा अभ्यास न करता गुंतवणूकदारांना चुकीच्या योजना देतात.

महिला दिन विशेष: महिलांसाठी आर्थिक नियोजनच्या ५ सोप्या स्टेप्स

Reading Time: 4 minutesआज जागतिक महिला दिनाच्या दिवशी वर्तमानपत्राची पानं बातम्यांपेक्षा जास्त जाहिरातींनीच भरलेली दिसतात. त्यात बहुतांश जाहिराती महिला दिनानिमित्त असणाऱ्या कपडे, ब्युटी प्रॉडक्ट आणि दागिन्यांच्या ऑफर्ससंदर्भात असतात. महिला म्हणजे शॉपिंग’ हे जणू एक समीकरणच पक्के झालं आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. स्त्रिया म्हणजे शॉपिंग नाही तर त्या उत्तम आर्थिक नियोजन करू शकतात. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स.

काय आहे मुदत ठेवींचे गणित?

Reading Time: 3 minutesगुंतवणूकदारांमध्ये मुदतठेवी फार लोकप्रिय आहेत. लोक बऱ्याचदा पाव/अर्धा टक्का व्याज कुठे जास्त मिळेल ह्यावर वेळ घालवताना दिसतात. पण महागाई आणि आयकर यांच्या पश्चात आपल्याला नक्की किती परतावा मिळतो याचा विचार फार कमी जण करतात.

शेअर बाजार : भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल !

Reading Time: 4 minutesनव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला आज शेअर बाजार किंवा भांडवली बाजाराची चर्चा करणे, क्रमप्राप्त झाले आहे.

रिअल ईस्टेटचे नववर्ष ; आशादायी पण आव्हानात्मक! भाग ३

Reading Time: 3 minutesबांधकाम व्यवसायामध्ये आलेली मंदी, त्याचे परिणाम, कारणे, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि एकूणच या व्यवसायाचे भवितव्य यांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप –