आयपीओ अलर्ट – “उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक”

Reading Time: 5 minutesउज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) या कंपनीची प्राथमिक भागविक्री (IPO = Initial Public Offering)  दि. २,३ व ४ डिसेंबर या ३ दिवशी खुली असणार आहे. आयपीओ द्वारे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. कंपनीचे जवळपास रु. १००० कोटी भांडवल म्हणून जमा करण्याचे लक्ष ठेवले होते. यापैकी २ आठवड्यांपूर्वी प्री- आयपीओ भाग विक्रीद्वारे रु. २५० कोटी जमा केले आहेत. आयपीओद्वारे रु.७५० कोटी उभे केले जाणार आहेत. त्याचा वापर कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी होणार आहे. 

बँक व्यवहार आणि तक्रार निवारण

Reading Time: 3 minutesबँकिंग व्यवसाय कसा चालतो, ते आपल्याला माहीत आहेच. जनतेकडून व्याजाने ठेवी स्वीकारून भांडवलाची जरुरी असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना अधिक व्याजाने देणे, हा कोणत्याही व्यापारी बँकेचा मुख्य व्यवसाय. या बँका सहकारी, सरकारी व खाजगी स्वरूपाच्या आहेत. तसेच, नव्याने अस्तित्वात आलेल्या पेमेंट बँक याही बँकांच असून रिझर्व बँकेचे त्यांच्यावर नियंत्रण आहे. मुख्य व्यवसायाशिवाय ग्राहकांना लॉकर पुरवणे, पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध करून देणे, क्रेडिट कार्ड देणे, गुंतवणूक विमा यासंबंधी सेवा पुरवणे यासारखी अनेक कामे बँका करतात यातील काही सेवा विनामूल्य तर काही सेवा मूल्य आकारून देण्यात येतात. 

शेअरबाजार: घर (कर्ज) पहावं ‘न’ फेडून… 

Reading Time: 5 minutes‘काळ बदलला, हे आजकालचे परवलीचे वाक्य बहुतेकदा खरेही असणारे, पण कर्ज या शब्दाला चिकटलेली एकतर्फी नकारात्मक, अपराधी भावना आजही तितकीशी बदललेली नाही. हाच धागा पकडून कर्ज या संकल्पनेबद्दलचे गैरसमज दूर करता आले, तर पहावे या हेतूने हा शब्द्च्छल (आणि वाचकांचा छळ).

बँका आणि मुदत ठेवींची सुरक्षितता

Reading Time: 3 minutes‘सुरक्षित’ समजल्या गेलेल्या मुदतठेवीमधे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेवर अचानक रिझर्व बँकेने निर्बंध घालून त्यांच्या कर्जवितरणातील घोटाळा उघड केला. त्याचपाठोपाठ शेअर बाजारात सुचीकृत असलेल्या लक्ष्मीविलास बँकेवर देखील निर्बंध लागू झाले. या लागोपाठच्या घटनांनी सामान्य गुंतवणूकदार पुरता भांबावून गेला. 

चिट फंड म्हणजे नक्की काय?

Reading Time: 3 minutesचिट म्हणजे वचनचिठ्ठी! असंघटित क्षेत्रातील लोक, ज्यांचा बँकिंग व्यवहाराशी अत्यंत कमी संबंध येतो, अशा समान उत्पन्न असलेल्या गरजू लोकांना आपल्या आर्थिक गरजा ताबडतोब भागवण्यासाठी या फंडाचा उपयोग होतो. भिशीच्या जवळपास जाणारा हा बचतीचा प्रकार असून, त्यास अनेक वर्षांची परंपरा आहे. काही चिट फंड कंपन्या १०० वर्षाहून जुन्या असून अजून व्यवस्थित चालू आहेत. 

मारुतीची कारची होम डिलिव्हरी

Reading Time: 2 minutesकोपऱ्यावरचा दुकानदार डाळ,तांदूळ आपल्या घरी पोहचवितो, हे आपणास माहिती आहे. अलिकडल्या काळात इडली, डोसा, भेळ हे पदार्थ देखील संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने घरपोच येऊ लागले आहेत.  या सोयीमुळे ग्राहकाला वाहतुकीसाठी द्यावा लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते. परंतु, यापुढे ‘मारुती’ देखील आपल्या घरी येईल याची क्वचितच कोणाला माहिती असेल.

Bank Rules: बँकेच्या या नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesअनेकदा बऱ्याच अधिकाऱ्यांना आपल्याच बँकेचे नियम नक्की काय आहेत ते माहीत नसते आणि आपल्या हेकेखोर स्वभावामुळे ‘मी म्हणतो तोच नियम’ यावर ते अडून बसतात आणि आपण म्हणतो तसेच झाले पाहिजे म्हणतात त्यामुळे ग्राहकाचे आणि ग्राहक नाराज झाल्याने, अप्रत्यक्षपणे बँकेचेही नुकसान होण्याची शक्यता असते.

दसऱ्याला करा दहन या दहा आर्थिक सवयींचे!

Reading Time: 4 minutesआज दसरा! दसरा हा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आजच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि युद्ध जिंकले, त्यामुळे आज रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. खरंतर रावण हा अत्यंत हुशार, शूर आणि श्रीमंत होता. परंतु त्याचा अहंकार, अट्टाहास त्याच्यासाठी काळ बनून आला. त्याला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला नाही. त्यामुळे शेवटी तो विनाशाच्या मार्गाला गेला. रावणाची प्रतिमा दहन करण्यामागे, “आपल्या मनातील वाईट भावनांचे दहन करणे” हा मुख्य उद्देश आहे. आपल्या मनात अशा अनेक भावना, इच्छा असतात ज्या आपल्यासाठी घातक ठरू शकतात. तसंच, आपल्या काही सवयी आपल्या आर्थिक स्थितीसाठीही घातक ठरू शकतात. आजच्या लेखात जाणून घ्या रावणाच्या दहा तोंडांप्रमाणे असणाऱ्या आपल्या दहा सवयी, ज्यांचं दहन करणं आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे.

ऋण व्याजदराने गृहकर्ज?

Reading Time: 2 minutesघरांच्या वाढलेल्या किमती आणि त्यावरील व्याज यामुळे घर घेणाऱ्याची सर्व मिळकत पणास लागते. आयुष्यातील उमेदीची वर्ष फक्त कर्ज फेडण्यासाठी खर्च होतात, इतर खर्चाना मुरड घालावी लागते. जरी हे कर्ज ८.५% दराने इतक्या कमी व्याजदराने घेतले तरी १ लाख रुपये कर्ज १० वर्षात फेडण्यासाठी साधारणत: दीड लाख, २० वर्षात २ लाख १० हजार तर, ३० वर्षात २ लाख ७५ हजार रुपयांची परतफेड करावी लागते. 

कर्जमुक्त कसे व्हावे? – भाग ३

Reading Time: 4 minutesतुमची सगळ्यात जास्त काळजी घरातल्या सख्ख्या लोकांपेक्षा कर्ज देणाऱ्या सावकाराला असते. त्याचबरोबर कर्ज परतफेड करायची चिंता भरपूर कर्ज घेतलेल्यांना सुद्धा असते. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लवकरात लवकर कर्जमुक्त होणे आवश्यक आहे.  या कर्जमुक्तीच्या लेखमालेतील हा तिसरा लेख ! मागील भागापर्यंत आपण कर्जमुक्तीसाठी  एकूण ४ कृती बघीतल्या होत्या. आता या भागात कृती क्रमांक ५ व कृती क्रमांक ६ पाहूया.