Browsing Tag
Money
10 posts
Relationship crisis: पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का?
Reading Time: 3 minutesदिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, जीवघेणी स्पर्धा, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने आणि महत्वाकांक्षा या साऱ्यामध्ये माणसाचे आयुष्य गुरफटत चाललं आहे. या धकाधकीच्या आयुष्यात पती पत्नीला एकमेकांना देण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो. त्या वेळेतही जर त्यांच्यामध्ये वाद होत असतील तर नात्यांमधला दुरावा वाढत जातो.
Financial stress: तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…
Reading Time: 4 minutesआजकाल आपल्या अवतीभवती पैशांबद्दल काळजी करण्याचा मानसिक आजारच जडला आहे. अर्थप्राप्ती, उदरनिर्वाह, भविष्यातली तरतूद यांबद्दल केवळ विचार किंवा चिंता व्यक्त करत बसल्याने काहीही साध्य होणार नाही. या काळजीचा फक्त तुमच्यावरच नव्हे तर सभोवतालच्या वातावरणावरही वाईट व नकारात्मक परिणाम होत असतो. तर हा परिणाम कश्या पद्धतीने होतो, ते पाहुया.
पैशाचं पुनरावलोकन करताना लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी
Reading Time: 4 minutesवाढती महागाई आणि पगार यांच योग्य संतुलन असणं बदलत्या काळाची गरज आहे.म्हणूनच पैशाचंही रोज पुनरावलोकन करणं महत्त्वाचे आहे. दिवसभराच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी ‘गुगल ॲनेलिटिक्स’चा वापर करू शकता. रोजचा खर्च आणि त्याचं नियोजन व्यवस्थापन मॅट्रिक्स द्वारे करता येते. पैशाचं पुनरावलोकन करण्याची एक पद्धत आहे. ज्यात प्रत्येक दैनंदिन खर्चाचा किंवा बचतीचा मागोवा घेता येतो.
व्यायाम – आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा भाग
Reading Time: 3 minutesनियमित व्यायाम केल्याने तुम्ही केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तचं नव्हे तर आर्थिक स्थितीनेही श्रीमंत ही होऊ शकता. हे विधान अविश्वसनीय वाटले ना? पण होय, व्यायाम तुम्हाला आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बनवू शकतो. ते कसे, याच्या ८ क्लृप्त्या पाहुयात.
व्यायाम का पैसा? तुम्ही काय निवडाल?
Reading Time: 2 minutesपैसा आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी एकमेकांवर काही प्रमाणात अवलंबून आहेत. साधारणतः जर पैसा आणि व्यायाम यापैकी कुठलीही एक गोष्ट निवडण्याचा विकल्प दिल्यास कुणीही पैसा निवडेल, कारण भौतिक गरजा पैशाशिवाय पूर्ण करणे अश्यक्य आहे. असे असले तरी येल (Yale) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ मधील अहवालांमधून एक वेगळा निष्कर्ष समोर आला आहे. या अहवालनुसार पैशाच्या तुलनेत व्यायामामुळे माणूस जास्त आनंदी राहतो, आहे ना आश्चर्यकारक? शास्त्रज्ञांच्या मते, वर्षाला सुमारे १७,५०,००० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीपेक्षा नियमित व्यायाम करणारी व्यक्ती जास्त आनंदी असते.
अर्थसाक्षर कथा – संपत्ती आणि नातेसंबंध
Reading Time: 4 minutesअर्थ म्हणजे पैसा पण अर्थसाक्षरता म्हणजे निव्वळ गुंतवणूक, किंवा आर्थिक नियोजन नव्हे तर, अर्थसाक्षरता म्हणजे परिस्थितीनुसार पैशाचे मूल्य समजून घेणे.
इथे परिस्थिती म्हणजे केवळ जागतिक मंदी वगैरे नव्हे तर, तुमच्या समोर असणारी भावनिक, सामाजिक, कौटुंबिक किंवा इतर काही कारणांमुळे उद्भवणारी परिस्थिती. जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो. पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. लक्षात ठेवा पैसा माणसासाठी असतो, माणूस पैशासाठी नाही. पण आजच्या काळात “पैसा झाला मोठा” अशी परिस्थिती आहे. तुमच्या कष्टाच्या कमाईवर फक्त तुमचा अधिकार आहे हे जरी खरं असलं तरी, तुमच्या जीवलगांप्रती तुमची काही कर्तव्यही आहेत हे विसरून कसं चालेल? आजची कथा अशाच एका जीवलगांप्रती आपलं कर्तव्य विसरलेल्या समीरची आणि त्यामुळे दुखावलेल्या त्याच्या आईची आहे.
श्रीमंतीची ‘वही’वाट
Reading Time: 3 minutesआता मुलांच्या शाळा सुरु होणार म्हणजे खर्चांना सुरुवात होणार. खरतर शिक्षणासाठी केलेला खर्च म्हणजे गुंतवणूक असली पाहिजे. परंतु सध्याच्या शैक्षणिक बाजारात ही गुंतवणूक कायम आर्थिक ताळेबंदाच्या तुटीकडे जात असल्यामुळे सगळेच पालक चिंतीत आहेत. आज आपण बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी या मुद्द्यांवर चर्चा करू.बचतीच्या सवयी ढोबळपणे ४ प्रकारे नोंदविल्या जाऊ शकतात.
काटकसरीचे कानमंत्र भाग २
Reading Time: 3 minutesप्रत्येक श्रीमंत व्यक्तीचा काटकसरीच्या मार्गानेच धनोढ्य झाला आहे असे नाही. वेगवेगळ्या अनैतिक मार्गांनीदेखील संपत्ती मिळवता येते, पण ही श्रीमंती क्षणिक असते. ज्या गतीने पैसा येतो त्याच गतीने पैसा जातो देखील. सावकाश येंणारी श्रीमंती मात्र काटकसरीच्या सवयीने येते आणि दीर्घकाळ टिकते. जास्त पैसा असणे म्हणजे जास्त खर्च करणे या पेक्षा जास्त बचत करणे असे समीकरण असेल तर ती श्रीमंती टिकते. नाहीतर पत्त्याचा बंगला कोसळावा तशी सर्व संपती क्षणात नाहीशी होते. आपली श्रीमंती टिकवण्यासाठी श्रीमंत काही सवयी अंगी बाळगतात ज्यांना अंगीकार सगळ्यांनीच करायला काही हरकत नाही.
काटकसरीचे कानमंत्र भाग १
Reading Time: 2 minutesआपण देशतील, जगातील श्रीमंत लोकांकडे पाहतो आणि सहज विचार येतो की, हे श्रीमंत आहेत कारण यांचे पूर्वज श्रीमंत होते किंवा त्यांनी पुढच्या पिढ्या श्रीमंत व्हाव्यात याची सोय खूप पूर्वीच करून ठेवली होती. आपण श्रीमंत नाहीत कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्यासाठी फार कोट्यवधी रुपये कमवून ठेवले नाहीत. पण हे साफ चूक आहे. कित्येक श्रीमंतानी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. श्रीमंत होण्यासाठी पूर्वापार संपत्ती किंवा लॉटरीच तिकीट किंवा खजिना सापडावा लागत नाही. गरज आहे ती काही सवयी स्वतः मध्ये रुजवण्याची. मग दहा बाय दहा च्या खोलीत राहणारा आणि महिना १०,००० रुपये कमावणारा माणूस देखील बिलगेट्स, अंबानी, आदानी होऊ शकतो. जाणून घ्या श्रीमंत माणसांचे बचतीचे कानमंत्र.