हीच ती वेळ, म्युच्युअल फंड गुंतवणुकीची
Reading Time: 2 minutesसर्व सामान्य मराठी गुंतवणूकदार नेहमीच अतिशय कमी जोखीम घेणारे असतात. पारंपरिक बँकेचे एफडी, पोस्टाच्या योजना किंवा सोने यामध्येच गुंतवणूक करतात. हे पर्याय जरी खूप आश्वस्त वाटत असले तरी या पर्यायातून मिळणार परतावा हा महागाई वर मात करत नाही आणि त्यामुळे दीर्घावधी मध्ये आपल्याला चक्रवाढ वाढीचा फायदा होत नाही. त्याचबरोबर येणाऱ्या ७-८ वर्षात आपला भारत देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होईल. पुढील काही वर्षात व्याज दर हे आणखी खाली खाली जातील.