Browsing Tag
PPF
17 posts
PPF: सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी लोकप्रिय का आहे?
Reading Time: 3 minutesसार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हा भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. म्युच्युअल फंड, शेअर बाजार यासारखे आधुनिक गुंतवणूक पर्याय लोकप्रियतेचं शिखर गाठत असताना पीपीएफ सारखी सरकारी योजनाही तितकीच लोकप्रिय आहे. हा पर्याय एवढा लोकप्रिय का आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात घेऊया.
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी व सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सवलत
Reading Time: 2 minutesआर्थिक वर्ष २०१९-२०२० हे ३१ मार्च २०२० रोजी संपले. यापूर्वी २५ मार्च २०२० पासून जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे अगदी शेवटच्या क्षणी करबचत करण्याच्या हेतूने गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना होत असलेल्या त्रासाचा विचार करून अपवाद म्हणून केवळ या वर्षीची ८०/क नुसार करसवलत मिळवण्यासाठीची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली. सन २०२०-२०२१ ची गुंतवणूक कधी करायची? ३१ मार्च २०२० रोजी ज्यांच्या खात्याची मुदतपूर्ती होते त्यांनी काय करायचे? अशा प्रश्नांच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात पुरेशी स्पष्टता नसल्याने त्यातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने मार्गदर्शन पत्रके काढण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी व सुकन्या समृद्धी योजना या दोन योजनांच्या सवलतींचा खुलासा करणारे पत्रक ११ एप्रिल २०२० रोजी वित्त मंत्रालयाने जारी केले असून यात केलेला खुलासा सर्व खात्यांना तात्काळ लागू झाला आहे.
बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक
Reading Time: 4 minutesगेले काही दिवस भांडवल बाजारात अस्थिरता आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक आपल्या ४२,२७४ वरून २५,६३९ तर, राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १२,४३० वरून ७,५११ पर्यंत तळ गाठून आला. जवळपास ४०% घट ही एकदम अत्यल्प कालावधीत झाली. यापूर्वीही अनेकदा ही वेळ आली आहे त्यातून बाजार सावरला आणि त्यांने पुन्हा उभारी घेतली. यातील सन २००८ मधील मंदीमध्ये निर्देशांकात ६०% घट झाली होती. देशी आणि परदेशी वित्तसंस्थाचा कल बाजारास हेलकावे देत असतो. त्यांना आपल्या गुंतवणुकीवर फक्त नफाच मिळवायचा असल्याने उपलब्ध सर्व मार्गांचा वापर त्यांच्याकडून केला जातो.
आहे म्युच्युअल फंड तरी…..
Reading Time: 3 minutesएका खाजगी संस्थेने (YouGuv) केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात गुंतवणूक साधनांमधे मुदत ठेवी पहिल्या क्रमांकावर, विमा योजना दुसऱ्या तर म्युच्युअल फंड योजना तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याखालोखाल सोने, पीपीएफ, शेअर्स असा क्रमांक लागतो. या आठवडयात बाजार आणि म्युच्युअल फंडाबद्दल समाज माध्यमांवरून इतकी नकारात्मकता पसरवली गेली की बाजार पुढील आठवडाभर बंद राहणार, अशी देखील हाळी देण्यात येत आहे. म्हणूनच म्युच्युअल फंडाची थोडी पार्श्वभूमी माहित करून घेण्याचा प्रयत्न या लेखात करू.
पगारदारांनो आयकर विवरणपत्र भरताना ही काळजी घ्या
Reading Time: 3 minutesआपल्या मालकाकडून आपणास फॉर्म नंबर १६ मिळाला असेल. यात आपणास मालकाकडून मिळालेले उत्पन्न यातून आपण जाहीर केलेल्या आणि कायद्यानुसार मिळत असलेल्या विविध वजावटींचा विचार करून आपले करपात्र उत्पन्न व कापलेला कर याची तपशीलवार माहिती असते. आयकर कायद्यानुसार सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न मग ते करपात्र असो अथवा नसो याची गणना आपल्या निव्वळ उत्पन्नात (gross income) होते. त्यामुळेच आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नापैकी काही गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या जमेस घ्यायच्या राहून जातात. त्या कोणत्या याच्यावर एक दृष्टिक्षेप
काय आहे पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना?
Reading Time: 3 minutesकोणीही व्यक्ती आयुष्यभर कमाई कशी करू शकेल? म्हणूनच कमवत असतानाच आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आपण करायला हवी.यासाठी बाजारात अनेक बचत व गुंतवणूक योजना उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं. अशा अनेक योजनांपैकी कोणती निवडावी? तर ती निवड सजगतेने करायला हवी.कारण आपल्या मेहनतीचा पैसा आपण गुंतवणार असतो. अशा सगळ्या योजनांमध्ये सर्वात खात्रीशीर म्हणता येतात, भारतीय टपाल खात्याच्या काही योजना. अशापैकीच एक आहे PPF योजना अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजना.
सुकन्या समृद्धी योजना वि. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी
Reading Time: 3 minutesएसएसवाय ही दीर्घ मुदतीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली चांगली योजना आहे. ही योजना विशेषतः आपल्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने लाभदायक योजना आहे. परंतु, इतक्या दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज वाटत नसल्यास पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. वेळेची लवचिकता देणारा पीपीएफ योजना उपयुक्त असून यामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते. दोन्ही योजना कर बचतीच्या उत्तम मार्गांपैकी आहेत. कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा, हे मात्र प्रत्येकाने आपआपल्या गरजांचा विचार करून ठरवावे. संभ्रमाच्या वेळी अर्थाताज्ञाचा सल्ला घ्यायला हरकत नाही.