गृहकर्ज परतफेड – एक वेगळा विचार

Reading Time: 4 minutesग्राहकाला त्याच्या गरजेनुसार कर्ज कोणाकडून घ्यावे, यासंबंधीचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. या कर्जास उपलब्ध असलेल्या करसवलतींचा करदेयतेच्या दृष्टीने कर्जदारास फायदा करून घेता येतो. आपल्यावर कोणाचेही कर्ज असू नये, अगदीच घेण्याची वेळ आलीच तर ते लवकरात लवकर फेडून टाकावे अशा रीतीने आपल्यावर झालेले पिढीजात संस्कार आपली आर्थिक क्षमता वाढल्यावर स्वस्थ बसू देत नाहीत अनेक जण त्यांना उपलब्ध असलेले पर्याय वापरून अंशतः अथवा पूर्णतः लवकरात लवकर कर्जमुक्त कसे होता येईल याचा प्रयत्न करतात. या शिवाय काही पर्याय आहे का? या संबंधीचा हा वेगळा विचार –

गुंतवणुकीची  गोष्ट हातातली…..

Reading Time: 3 minutesकाल सरत्या वर्षाचा अखेरचा महिना सुरु झाला. आपण सगळे जण हे वर्ष किती पटकन संपलं? लक्षातच नाही आले. अशा वाक्यांनी सुरुवात करणार आणि ३१ डिसेंबरची वाट बघणार. कशासाठी? तर नविन वर्षात नविन संकल्प सुरु करायचे म्हणून. या महिन्यात सर्व जण नविन वर्षात काय काय सवयी शिस्तबद्धपणे अंगीकारायच्या याची मनातल्या मनात किंवा अगदीच साक्षर लोकं वहीत लिहून यादी बनविणार. मग अर्थसाक्षर जन काय करणार?

गुंतवणुकीचे ४ ‘P’लर

Reading Time: 3 minutesगुंतवणूक करतांना किमान ४ Pलर अनुकरणीय असतात.Participation – सहभाग, Provision – तरतूद, Protection – जोखमीचे सरंक्षण, Profit – परतावा आता वरील मुद्द्यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो.

म्युच्युअल फंड क्या है?- भाग ४

Reading Time: 3 minutesया लेखमालेचा हेतू सर्व वाचकांना म्युच्युअल फंड नक्की कसे काम करते? हा आहे. परंतु विषय तसा क्लिष्ट असल्यामुळे वाचकांना चांगला परतावा देणाऱ्या योजनांची नावे किंवा माझा फंड का चालत नाही? याबाबत जाणून घेण्यात उत्सुकता आहे असे आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते.  मागील लेखात आपण नियंत्रकांची भूमिका, कायदे व गुंतवणूकदारांचे हक्क याबाबत सविस्तर माहिती घेतली होती. या भागात आपण म्युच्युअल फंडाचे वितरक, हिशेब, करदायित्व व मुल्यांकन याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू. 

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ३

Reading Time: 4 minutesम्युच्युअल फंड आस्थापनांना विविध स्वतंत्र नियंत्रकांसोबत काम करावे लागते. जसे की रिझर्व्ह बँक ही रोखे बाजार तसेच आंतरराष्ट्रीय विनिमय बाजाराचे स्वतंत्र नियंत्रक म्हणून काम पाहत असते. त्यामुळे म्युच्युअल फंडांना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांना अधीन राहूनच रोखे, आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुका, परदेशी गुंतवणूकदार यांच्यासोबत काम करता येते.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी

Reading Time: 3 minutesइक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपला गुंतवणुकीचा कालावधी हा कमीत कमी ५ वर्षे किंवा जास्त असायलाच हवा. अल्पकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी फंडाचा विचार करू नये. गुंतवणूक करताना बाजारातील चढ उताराला न घाबरता इक्विटी फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी. 

कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा तयार कराल?

Reading Time: 4 minutesकौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्वाच्या घटकांमध्ये विभागु शकतो. १) दैनंदिन गरजांसाठीचे खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी खर्च ३) दैनंदिन खर्चांसाठी बचत ४) दीर्घकालीन स्वप्नांसाठी गुंतवणूक. या चार घटकांसाठी आपण योग्य नियोजन केले की आपण आपल्या अर्थसंकल्पात यशस्वी झालो असे समजायचे. 

संपत्ति निर्माणाचा राजमार्ग: एसआयपी

Reading Time: 4 minutesजागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. आपण बँकांच्या मुदतठेवी, बँक व पोस्टल आरडी, विमा या पारंपरिक बचतीला आर्थिक ज्ञान नसल्याने गुंतवणूक समजतो. अशा प्रकारची गुंतवणूक महागाई निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देऊ शकत नाहीत. म्हणूनच या बचत गुंतवणुकीत परावर्तित केल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल. आपण विमा पॉलिसीसाठी वीस वर्षे सहज देतो . मग असा कालावधी “म्युच्युअल फंड्स सही हैं..” साठी का देत नाही?

गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’ कॅल्क्युलेटर

Reading Time: 3 minutesएसआयपी’चा मागील इतिहास पहिला तर इक्विटी म्युच्युअल फंडांनी ‘एसआयपी’ मधून खूप चांगला म्हणजे अगदी १५ ते १८ % किंवा कधी त्याहून जास्त परतावा दिला आहे. आपले करोडपती होण्याचे स्वप्न म्युच्युअल फंडाच्या ‘एसआयपी’मधून कसे साकारत येईल ते आपण पाहू. यासाठी आपण म्युच्युअल फंडाचा कंजर्वेटिव्ह १२% परतावा गृहीत धरू. बरेच आर्थिक सल्लागार आपल्या संकेत स्थळावर आपली गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’चे कॅल्क्युलेटर उपलब्ध करतात ज्यातून आपण आपल्या गुंतवणुकीतील पुढील काळातील वाढीचा अंदाज बांधू शकतो.

Investment FAQ : गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न व त्याची उत्तरे

Reading Time: 5 minutesविमा पॉलिसी, गृहकर्ज, म्युच्युअल फंड, एसआयपी, एसडब्ल्यूपी, इत्यादी गुंतवणुकीसंदर्भात पडणारे काही प्रश्न (FAQ) व त्यांची गुंतवणूक सल्लागारांमार्फत दिलेली उत्तरे या लेखात दिलेली आहेत.