आज आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडाची कर प्रणाली किंवा टॅक्स इम्पलिकेशन्स. म्युच्युअल फंडाच्या योजना प्रामुख्याने ३ प्रकारच्या असतात. डेट, इक्विटी व हायब्रीड (Debt / Equity / Hybrid).
म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती
१. डेट किंवा कर्जरोखे (Debt):- या प्रकारच्या योजना शेयर बाजाराशी अजिबात संबंधित नसतात. त्यांची करप्रणाली वेगळी असते.
२.इक्विटी (Equity):- या प्रकारच्या योजना थेट शेयर बाजाराशी संबंधित असतात, त्यात टॅक्स इम्प्लिकेशन वेगळे असते.
३.हायब्रीड योजना: हा प्रकार म्हणजे Debt (कर्जरोखे) आणि Equity (समभाग) यांचे मिश्रण असलेल्या योजना! हायब्रीड कॅटेगरीतल्या योजनांमध्ये जर कर्जरोख्यांचे प्रमाण जास्त असेल तर त्याची करप्रणाली हि Debt योजनेप्रमाणे असते व जर Equity चे प्रमाण जास्त असेल तर टॅक्स इम्प्लिकेशन हे Equity योजनांप्रमाणे असते.
हीच ती वेळ, म्युच्युअल फंड गुंतवणुकीची
म्युच्युअल फंडात बँकेच्या किंवा पोस्टाच्या योजनेप्रमाणे व्याज मिळत नाही. म्युच्युअल फंडातील परतावा हा भांडवल वृद्धी किंवा कॅपिटल गेन या प्रकारात मोडतो.
- डेट म्हणजेच कर्जरोखे संबंधित योजनांमध्ये ३ वर्षापर्यंत च्या भांडवल वृद्धी ला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतात, तर ३ वर्षांपुढील भांडवल वृद्धीला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन म्हणतात.
- शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मध्ये मिळालेला जो लाभ आहे तो आपल्या त्या वर्षाच्या एकूण मिळकतीमध्ये समाविष्ट केला जातो व त्यावर आपल्याला इनकम टॅक्स भरावा लागतो.
- ३ वर्षांपुढील भांडवल वृद्धी ज्याला आपण लॉन्ग टर्म कॅपिटल गेन असेही म्हणतो, ह्यावर आपल्याला १०% अधिक अधिभार इतका टॅक्स भरावा लागतो किंवा आपण जर महागाई इंडेक्सचा फायदा घ्यायचा ठरवलं, तर इंडेक्ससेशन नंतर २०% अधिक अधिभार इतका टॅक्स भरावा लागतो.
- जर गुंतवणूक डिविडेंड ऑप्शन म्हणजेच लाभांश प्रकारात मोडत असेल, तर म्युच्युअल फंड साधारण २२% अधिक अधिभार इतका डिविडेंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स सरकारला जमा करतात व नंतर डिविडेंड गुंतवणूकदाराला वाटलं जातो.
- डेट फंडामध्ये सध्या डिविडेंड ऑप्शन अट्रॅक्टीव्ह राहिले नसून गुंतवणूकदारांनी शक्यतो ग्रोथ ऑप्शन घ्यावे.
- ज्यांना दरमहा किंवा त्रेमासिक नियमित उत्पन्न हवे असेल त्यांनी डिव्हिडंडवर विसंबून न राहता ग्रोथ ऑप्शन मधून एसडब्लूपी म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन (SWP) चालू करावा.
- भारतीय नागरिकांच्या किंवा एचयूएफ (HUF) यांच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचा टीडीएस कापला जात नाही, मात्र एनआरआय गुंतवणूकदारांचा कॅपिटल गेन टॅक्स टीडीएसने कापला जातो.
गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे
आता आपण इक्विटी (Equity) फंडातील टॅक्स इम्प्लिकेशन्स पाहू.
- इक्विटी (Equity) फंडामध्ये १ वर्षाच्या आतील भांडवल वृद्धीला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतात व एक वर्ष वरील भांडवल वृद्धीला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन म्हणतात.
- शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा १५% अधिक अधिभार इतका असतो.
- लॉन्ग टर्म कॅपिटल गेन मध्ये, रु १ लाख पर्यंतची भांडवल वृद्धी ही करमुक्त असते व त्यावरील भांडवल वृद्धीवर १०% अधिक अधिभार इतका लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो.
- भारतीय गुंतवणूकदारच्या लाभावर कोणत्याही प्रकारचा टीडीएस कापला जात नाही. मात्र एनआरआय गुंतवणूकदारच्या बाबतीत हा टॅक्स ‘टीडीएस’च्या स्वरूपात कापला जातो.
- इक्विटी फंडात जर डिविडेंड ऑप्शन घेतले, तर म्युच्युअल फंड १०% डिविडेंड डिस्ट्रॉब्युशन टॅक्स अधिक अधिभार सरकारला जमा करतात व नंतर लाभांशाची वाटणी करतात.
- भारतीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवर भांडवल वृद्धी कर प्रणाली वैयक्तिक गुंतवणूकदारांपेक्षा वेगळी असते.
एसआयपी(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय
म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही दीर्घ काळासाठी अतिशय करप्रभावी म्हणजेच टॅक्स एफिशिएंट होते. इतर कोणत्याही गुंतवणूक पर्यायांपेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून कर कपाती नंतरचा परतावा हा निश्चितच जास्त असतो. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार म्युच्युअल फंडाच्या एकंदर ३६ पर्यायातून आपल्या साठी योग्य योजनांचे संयोजन करा आणि आपली आर्थिक उन्नती करा.
म्युच्युअल फंड गुणवणूक ही बाजारातील उतार चढावाच्या अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा!
निलेश तावडे
9324543832
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्ष कार्यरत होते सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/