Reading Time: < 1 minute

१ एप्रिल २०२० च्या प्रतिकात्मक प्रदर्शनानुसार, स्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली, तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अंकांनी पुढे आला. तथापि २०२० मधील पहिल्या तिमाहीतील हे आकडे दोन्ही मार्केटसाठी ऐतिहासिक घसरण दर्शवणारे ठरले. 

कोरोना व्हायरसचा कमोडिटीजच्या किंमतीवरही मोठा परिणाम

  • १९९२पासून निफ्टीने सर्वात वाईट तिमाही अनुभवली असून २०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक ठरले आहे.
  • नकारात्मक वातावरण असल्याने मार्च महिन्यात भारतीय इक्विटी बाजारातून परदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय) मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. या एकूण एफपीआय आउटफ्लोची किंमत ५८,३४८ कोटी रुपये एवढी होती. 
  • नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (एनडीएसएल)कडे उपलब्ध आकडेवारीनुसार, ही रक्कम आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
  • भारतात अत्यंत कठोर लॉकडाउन व उपाययोजना होत असूनही कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या समूहातही खूप भीती निर्माण झाली आहे. 

कोरोना, शेअर बाजार आणि एसडब्लूपी गुंतवणूक

  • पुढील काही दिवस अधिक गंभीर असून भविष्यातील चित्र आणखी स्पष्ट करतील मात्र एक चांगली बाजू अशी की, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या मंदीची झळ भारत आणि चीनला अपवादात्मक रुपात बसणार नाही, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. 
  • लॉकडाउनची बंधने हटल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत नूतनीकरणाचा उत्साह वाढणे अपेक्षित आहे.

कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?

अमर देव सिंह 

प्रमुख सल्लागार,

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…