बुल मार्केटमध्ये या ‘५ चुका’ गुंतवणूकदारांनी १००% टाळायला हव्यात !

Reading Time: 2 minutes

बुल मार्केट हा शेअर मार्केटमधला शेअर्सच्या वाढत्या किमतीचा कालावधी असतो. या तेजीच्या काळात शेअर्सच्या किमती वाढत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने अजून अजून शेअर्स खरेदीला प्रोत्साहन दिले जाते. गुंतवणूकदारांना बुल मार्केट मध्ये चांगला नफा मिळवण्यास अपयश येते कारण ते परत परत त्याच चुका करतात. अशा सामान्य चुका टाळण्यासाठी गुंतवणूकदारांना काय करायला हवे याबाबतची माहिती या लेखातून समजून घेऊया – 

१. बाजारातील हालचालींचा अंदाज न घेणे 

 • शेअर बाजारातील व्यवहारांचा नियमित अभ्यास असेल तर तुम्हाला बाजारातील परिस्थितीचा अंदाज येतो. बरेच गुंतवणूकदार बाजारातील चढ उताराचा अंदाज ठरवू शकत नाहीत. अनेक गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या काळात बुल मार्केट समजत नाही. 
 • जेव्हा बाजार घटतो तेव्हा  वाटते की गुंतवणुकीची संधी मिळाली आणि बाजार वाढला की संधी गमावल्याची भावना वाटते. यामध्ये जास्त कालावधीची गुंतवणूक उद्दिष्ट्ये ठरवायला हवीत. तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करणार असाल तर खरेदी थोडी फार चुकली तरी फारसा फरक पडत नाही. 

 

२. एकरकमी अल्पमुदतीची गुंतवणूक करणे 

 • जेव्हा बाजार सर्वोच्च पातळीवर पोहोचलेला असतो तेव्हा एकरकमी गुंतवणूक करणे टाळायला हवे. जर अशी  गुंतवणूक केली तर त्या रकमेवर कमी परतावा मिळतो. 
 • त्यापेक्षा तुम्ही तीच रक्कम एसआयपी मध्ये ८-१० वर्षांच्या कालावधीत टप्याटप्याने गुंतवली तर त्याच्यावर मिळणारा परतावा जास्त असतो. मंदीच्या काळातही एसआयपीचालू ठेवायला हवी, त्यामुळे सरासरी चांगला परतावा मिळतो. 

३. एसआयपीला प्राधान्य न देणे 

 • जेव्हा बाजार तेजीमध्ये असतो तेव्हा अल्प परतावा मिळतो, म्हणून अनेक गुंतवणूकदार एसआयपी बंद करतात. गुंतवणूकदाराने हे लक्षात ठेवायला हवे की, त्याचे अंतिम उद्दिष्टय साध्य करण्यासाठी एसआयपीमध्ये नियमित पैसे जमा करायला हवेत.
 • सुरुवातीच्या कालावधीत तुम्हाला त्यामधून किती परतावा मिळत आहे यावर लक्ष केंद्रित करणे टाळायला हवे. बाजार खाली वर होत असताना संयम ठेवायला हवा. जेव्हा एसआयपीमध्ये तुम्ही जास्त कालावधीकरिता गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला मिळणारा परतावा जास्त असतो. 

नक्की वाचा : थोडक्यात: शेअर मार्केट

४. गुंतवणुकीत वैविध्य नसणे 

 • बुल मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना बाजारामध्ये वेग वेगळ्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये सर्व पैसे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. 
 • त्यापेक्षा  गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी  इक्विटी, कर्ज आणि डिजिटल सोने प्रकारामध्ये गुंतवणूक करायला हवी.

 

५.  कमी किमतीचे स्टॉक खरेदी टाळणे 

 • जेव्हा बाजार नवीन उच्चांक गाठत असेल तेव्हा ५२ आठवडे नीचांकी पातळीवर असणाऱ्या शेअर्सची खरेदी टाळायला हवी. 
 • नीचांकी पातळीवर असलेला स्टॉक इतर समभागांच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध असला तरी त्यामागे अनेक कारणे असू शकतात. 

 

 

अभ्यासपूर्वक गुंतवणुक करा !  

 • बुल मार्केट मध्ये गुंतवणूकदार मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून बाजारातील भावनांवर लक्ष देतात. बाजारातील परिस्थितीपेक्षा कंपनीचा व्यवसाय, त्याचे व्यवस्थापन आणि दीर्घकालीन उद्दिष्टये यावर लक्ष देऊन गुंतवणूक करायला हवी. 
 • बाजारातील भावना बदलत्या असल्याने अल्प गुंतवणुक परतावा देतात तर मूलभूत गोष्टी विचारात घेऊन केलेली गुंतवणूक दीर्घकालीन नफा देऊन जाते. बाजारातील परिस्थितीपेक्षा कंपन्यांच्या मूलभूत गोष्टींवर आधारित गुंतवणुकीवर लक्ष द्यायला हवे. गुंतवणूकदारांनी भावनांवर नियंत्रण ठेवून जोखीम विचारात घेऊन निर्णय घ्यावेत.

 

नक्की वाचा : 5 Biggest Wealth destroyers : ‘या’ ५ शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधान

 

 

अंतिम लक्ष्य निर्धारीत करा !  

 • इक्विटी आणि म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीने संपत्तीत वाढ होते. बुल मार्केटमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी वर नमूद केलेल्या चुका टाळायला हव्यात. 
 • गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

 

बुल मार्केटमध्ये भावनेच्या भरात गुंतवणूक न करता जास्त कालावधीचा म्हणजे दीर्घकालीन लक्ष्य ठेवून विचारपूर्वक गुंतवणूक करावी. तुमच्या दीर्घकालीन गुंतवणूक निर्णयांसाठी शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!