Five Hour Rule
Reading Time: 3 minutes

Five Hour Rule

‘फाईव्ह अवर रुल (Five Hour Rule) एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया!हे शीर्षक वाचूनच तुमच्या मनात लेखाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असेल.  बिल गेट्स, वॉरन बफे, एलोन मस्क, बराक ओबामा, ऑपरा विंफ्री, जॅक मा अशा जागतिक कीर्ती मिळवलेल्या यशस्वी व्यक्तींमधला एक समान धागा म्हणजे ‘फाईव्ह अवर रुल’.या दिग्गजांची नावे वाचून तुमची उत्सुकता अजून वाढली असेल आणि आज खूप मोठं आणि महत्वाचं वाचायला मिळणार हे लक्षात आलं असेल.  

 

Five Hour Rule: काय आहे हा ‘फाईव्ह अवर रुल’?

  • अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी असे बहुआयामी व्यक्तीमत्व, ज्यांची प्रतिमा अमेरिकन 100 डॉलर्सच्या नोटेवर पहायला मिळते. त्या बेंजामिन उर्फ बेन फ्रँकलिन यांच्या आयुष्यावर सखोल अभ्यास करून मायकल सिमसन्स या अमेरिकन लेखकाने ‘फाईव्ह अवर रुल’ प्रकाशात आणला.
  • फ्रँकलिन नित्यनेमाने सकाळचा एक तास वाचन आणि लिखाणासाठी देत असत. या वेळात ते वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि त्यानुसार चाललेली त्यांची प्रगती याविषयी पुनरावलोकन करत असत.
  • कामाच्या व्यापात आयुष्य कितीही व्यस्त असलं तरीही रोजचा एक तास असे आठवड्यातील पाच दिवसांचे मिळून पाच तास काटेकोरपणे वाचनासाठी, काही नव्या गोष्टी शिकण्यासाठी देणे यास ‘फाईव्ह अवर रुल’ असे म्हणतात.

हे नक्की वाचा: वाचनाच्या सहाय्याने करा नैराश्यावर मात 

‘फाईव्ह अवर रुल’चे तीन महत्वाचे भाग:

१. वाचन:

  • जगातल्या सर्वात महत्वाच्या मानल्या गेलेल्या लोकांत हे साम्य दिसते की ते खूप चांगले वाचक आहेत.
  • ते केवळ सामान्य ज्ञान वाढावं म्हणून वाचतात असं नव्हे, तर इतरांच्या बिझनेस स्ट्रॅटेजी काय आहेत? नवे ट्रेंड काय चालू आहेत? याविषयी स्वतःला अपडेट करण्यासाठी देखील ते वाचन करत असतात.
  • जर आपणास वाचनाचा कंटाळा असेल, रोजचा एक तास वाचनासाठी देणे देखील आपणास जिकिरीचे वाटत असेल तर किमान 30 मिनिटे तरी वाचनाची स्वतःहून सवय लावून घ्यायला हवी.
  • रोजची एक ठराविक वेळ केवळ वाचनासाठी राखून ठेवल्यास हळूहळू आपोआप सवय लागत जाईल.
  • एक ठराविक वेळ राखून ठेवणे अशक्य असेल तर दैनंदिन जीवनात जिथे कुठे, अगदी बँकेच्या, दवाखान्याच्या रांगेत बसल्यानंतर, प्रवासात असताना जो वेळ मिळतो तो स्मार्टफोन ऐवजी बॅगेत सोबत असलेल्या छोट्याशा पुस्तकाची काही पानं वाचण्यासाठी दिली तर आयुष्यात प्रभावी बदल घडू शकतो.
  • ज्या कुणास वाचणे अशक्य आहे, प्रवासात वाचताना डोळ्यांना त्रास होतो, डोकेदुखी वाढते अशांसाठी ‘ऑडीओ बुक’ हा सर्वोत्तम पर्याय आहे.

२. विचार:

  • ‘फाईव्ह अवर रुल’ मधील काही वेळ विचार करण्यासाठी द्यायला हवा. यासाठी शुद्ध मराठीत ‘चिंतन-मनन’ हे सर्वात चपखल शब्द आहेत. परंतु या शब्दांकडे आपण काहीशा अध्यात्माच्या अंगाने पाहतो आणि दुर्लक्ष करतो.
  • जे आपण वाचलं, अनुभवलं त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात कुठे कसा वापर करता येईल याचा विचार करणं किंवा मनातले विचार, महत्वाकांक्षा, ठरवलेल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठीचे नियोजन एखाद्या डायरीत लिहून ठेवणे हे सुद्धा ‘विचार’ या विभागात मोडते.
  • दिवसभरात कोणतेही काम केल्यानंतर अगदी १० ते १५ मिनिटांचा मोकळा वेळ जेव्हा मिळतो तेव्हा स्वतःला केवळ २-३ साधे प्रश्न विचारा. या कामात नेमका काय लाभ झाला? काय शिकायला मिळालं? काय चुकलं? ही चूक पुढच्यावेळी कशी सुधारली जाऊ शकते?

इतर लेख: दैनंदिन जीवनासोबत आर्थिक नियोजन करतानाही हॉफ्सटॅडर सिद्धांताचा विचार करा 

३. प्रयोग:

  • विज्ञान असो वा तंत्रज्ञान सततच्या प्रयोगानेच हवे ते लक्ष्य गाठता येते.
  •  फ्रँकलिन असोत वा एडिसन. यांच्या आयुष्याचं रहस्य होतं प्रयोगशीलता. आपण एखादी कृती करतो तेव्हा दोन गोष्टी घडतात. एकतर आपण सफल होतो किंवा शिकतो.
  • जे आपण वाचलंय, ज्या विषयी आपण नियोजनाची आखणी केलीय ते दैनंदिन आयुष्यात अंमलात आणायचं यालाच प्रयोग म्हणतात.
  • जेव्हा आपण शिकलेल्या, ठरवलेल्या बाबी प्रयोगात आणतो तेव्हाच आपल्याला लक्षात येते की आपण वाचलेली माहिती किंवा ठरवलेला आराखडा बरोबर होता की चुकीचा. त्यात नेमक्या कुठे त्रुटी राहिल्या.
  • या त्रुटी, चुका आपण स्वतःला, जवळच्या व्यक्तीला अथवा आपल्या व्यवसाय बंधुला विचारू शकतो.
  • सततच्या प्रयोगाने त्रुटी कमी कमी होत जातात आणि आपण परिपक्व बनत जातो. यातूनच एक दिवस आपण ठरवलेले लक्ष प्राप्त जाते.

‘फाईव्ह अवर रुल’ने आपल्या बुद्धीचा आणि व्यक्तिमत्वाचा झालेला विकास इतरांपेक्षा स्वतःलाच दृश्य स्वरुपात जाणवू लागेल.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Five Hour Rule in Marathi, Five Hour Rule Marathi Mahiti, Five Hour Rule mhanaje kay?, Five Hour Rule explain in Marathi, What is Five Hour Rule Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –