रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये सातत्याने झालेल्या वाढीमुळे, केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२३ साठी काही प्रमुख अल्पबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे.
यामध्ये मासिक उत्पन्न योजना (एमआयएस), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) या अल्पबचत योजनांचा समावेश आहे. अल्पबचत योजना या निवडक बँकांच्या माध्यमातून राबविल्या जातात. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून दर तिमाही या योजनांवरील व्याजदरांचा आढावा घेण्यात येतो. पाहूयात याविषयीची सविस्तर माहिती.
नक्की वाचा – RBI : आरबीआय नक्की काय काम करते?
रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये वाढ का करण्यात आली ? –
- गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ केल्यानंतर, विविध बँका आणि वित्तीय संस्थांनी आपल्या ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ करायला सुरवात केली होती.
- त्या पार्श्वभूमीवर अल्पबचत योजनांच्या व्याजदरातही वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार अर्थ मंत्रालयाने विविध योजनांच्या व्याजदरात वाढ जाहीर केली.
- या नव्या व्याजदरांचा लाभ नागरिकांना एक जानेवारी २०२३ पासून मिळणार असल्याने सर्वसामान्यांना नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी मिळाली आहे.
हेही वाचा – ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध करसवलती
ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा –
- ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर ७.६० टक्क्यांवरून ८.०० टक्के.
- एक ते तीन वर्षीय मुदत ठेवींचा व्याजदर १.१० टक्क्यांनी वाढवून ६.६० टक्के ते ६.९० टक्के.
- मासिक उत्पन्न योजनेवर ६.७० टक्क्यांऐवजी ७.१० टक्के व्याज.
- राष्ट्रीय बचत प्रमाणापत्रावर ६.८० ऐवजी ७.०० टक्के व्याज.
- किसान विकास पत्रावर ७ टक्क्यांऐवजी ७.२० व्याज व त्यातील गुंतवणूक आता १२० महिन्यांत दुप्पट होईल.
नक्की वाचा – ठेवींवरील वाढते व्याजदर
अल्पबचत योजनांचे व्याजदर –
- पाच वर्षीय टीडी – ७.००
- तीन वर्षीय टीडी – ६.९०
- दोन वर्षीय टीडी – ६.८०
- एक वर्षीय टीडी – ६.६०
- एनएससी (NSC) – ७.००
- केव्हीपी (KVP) – ७.२०
- एमआयएस (MIS) – ७.१०
- एससीएसएस (SCSS) – ८.००
- पीपीएफ (PPF) – ७.१०
- एसएसवाय (SSY) – ७.६०
- आरडी (RD) – ५.८०
- पोस्ट ऑफिस एसबी – ४