Reading Time: 3 minutes
कोणत्याही कार्यक्रम किंवा मित्र परिवार किंवा आमचे गुंतवणूकदार यांच्याशी जेव्हा बोलणे होते तेव्हा बाजारात चाललेल्या फसव्या योजना बद्दल माहिती मिळते.
महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा आणि आपले जीवन आनंदी जगा. आधीच कमाई चे मार्ग कमी आणि खर्च जास्त असलेला मध्यमवर्गीय रिस्क न घेता आपल्या पदरात फायदा कसा पाडून घेता येईल याचा विचार करत असतो आणि मिळणाऱ्या हमखास नफ्याच्या आड बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक करतो. तर, जाणून घेऊया या कंपन्या कशा चालतात आणि पुढे काय होते.
योजनांची संकल्पना-
आमची शेअर बाजारात कंपनी आहे आणि आमच्याकडे हमखास नफा कमवायच्या ट्रिक आहेत. ज्याचा वापर करून आम्ही गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून देतो. काही नफा आम्ही स्वतःला ठेवतो काही नफा आम्ही तुम्हाला देतो. अशा सगळ्या फसव्या योजनांमध्ये दिसणारे हे काही पॉईंट्स-
-
सर्व व्यवहार रोख रकमेत केले जातात किंवा कंपनीच्या नावाने चेक घेऊन केले जातात. (सेबीच्या नियमानुसार शेअर बाजारात गुंतवणूक करताना सर्व गुंतवणूक ही डिमॅट अकाउंट मध्ये होणे गरजेचे आहे. इथे सुरुवातच चुकीच्या पद्धतीने होते)
-
तुमच्या डिमॅटमध्ये गुंतवणूक नसल्याने तुम्हाला नफा किती झाला तोटा किती झाला याचा ताळेबंद आखू शकत नाही.
-
१०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर जुजबी माहिती आणि अटी लिहून एक /दोन पानांचे अग्रीमेंट केले जाते.(गुंतवणूकदारांना हे खूप विश्वसनीय वाटते….कायदयाच्या भाषेत याला शून्य किंमत असते…विश्वास वाटत नसेल तर एखाद्या वकील मित्राला विचारून पहा)
-
कमीतकमी गुंतवणूक ही १ लाखापासून चालू होते.
-
भपेकेदार ऑफिस, टकाटक स्टाफ, आणि मुख्य कंपनीचे भागीदार BMW, Audi मधून सेमिनार घेत गावोगाव भटकत असतात.
-
तुम्ही शेअर बाजारात नक्की काय करता असे विचारल्यास आम्ही ट्रेडिंग करतो, गुंतवणूक करतो, डॉलर मध्ये ट्रेडिंग करतो, future & options मध्ये ट्रेडिंग करतो, (म्हणजे लाथ मारेन तिथे पाणी काढतो).
-
नवीन गुंतवणूकदार आणणाऱ्या व्यक्तीला कमिशन दिले जाते.
आता या कंपन्या चालतात कशा? तर, या कंपन्यांचे दोन प्रकार असतात –
-
ज्यांचे मुख्य ध्येयच लोकांना फसवून मोठा पैसा गोळा करून निघून जायचे आहे.
-
यांचे मुख्य ध्येय फसवणे नसते, तर ते स्वतःच फसलेले असतात (शेअर बाजारात घुसलेल्या व्यक्तीला पहिल्या १-२ वर्षातच भरघोस नफा मिळतो. त्याला वाटते जर मी माझ्या २-३लाख किंवा ५-१० लाखावर इतके कमावत आहे, तर अजून काही लोकांकडून पैसे उभे करून डबल नफा कमावू शकतो….यातूनच वरील संकल्पनेचा उदय होतो.
शेअर बाजार हे एकेरी रेषेत पैसा देणारे साधन नाही आहे तरी दर महिन्याला हमखास नफा हे कसे देतात?
-
कारण सर्व पैसा कंपनीच्या एका अकाऊंट ला असतो जिथे साऱ्या गुंतवणूक दाराचे पैसे असतात त्यात दर महिन्याला नवीन गुंतवणूक दारांचा भरणा चालूच असतो.
-
तुम्हाला नक्की नफा मिळतोय की तुमच्या मुद्दल मधून तुम्हाला पैसे काढून देत आहेत तुम्हाला कळत नाही.कारण महिन्याला ३-५% म्हणजे वर्ष्याला ३६-६०% नफा हा गुंतवणूक दारांना अजून नफा करून देणारी कंपनीचा नफा समजा १२-१८% पकडला, शेअर बाजारात लागणारे टॅक्स आणि कमिशन पकडले, तर ते १२-१५%. म्हणजे सरासरी ६०-८०% दर वर्षाला नफा होईल तेव्हाच ही रोलिंग होणे शक्य आहे.
-
आज एफडी मध्ये मिळणारे व्याज ८%. शेअर बाजारात सरासरी मिळणारा परतावा १२-१५% सरासरी कोणत्या व्यवसायात मिळणारा परतावा २५-३०% हे माहिती असून सुद्धा लोक या हमखास परतावा देणाऱ्या कंपन्या मध्ये बुद्धी गहाण ठेऊन पैसा लावतात.
-
तोटा झाला तरी तो नवीन गुंतवणूकदारांचे पैसे कंपनीत येत असतात यातून महिन्याला द्यावे लागणाऱ्या पैशांचा जुगाड केला जातो.
-
आता कंपनी रियल इस्टेट किंवा ५-१० नवीन प्रोडक्ट घेऊन येत आहे अशी घोषणा होते यात जुने ग्राहक अजून पैसे गुंतवतात.
-
सुरुवातीला तारखेला पैसे न चुकता न मागता क्रेडिट केले जातात. ६-७ महिने हमखास पैसे मिळाल्यावर गुंतवणूकदारांची हाव वाढते. १ लाखाला ५००० म्हणजे वर्षाला ६०००० अजून १ लाख टाकले की महिन्याला १२००० म्हणजे एक पगार घरी आल्यासारखे.
-
एका बाजूला दर महिन्याला ५-६% नफा देणे परवडत नसते, तर दुसऱ्या बाजूला गुंतवणूक खोऱ्याने लाईन लावून पैसे गुंतवायला उभे असतात.
-
पहिल्या प्रकारच्या कंपनीचे एक पैसा उभा करायचे टार्गेट असते ठराविक रक्कम गोळा झाली की बोजा गुंडाळून हे रातोरात निघून जातात.
-
दुसऱ्या प्रकारच्या कंपनीचे भागीदार त्यांना स्वतःची चूक कळत असते, पण आता माघार नसते. काही जण यात ही अति आत्मविश्वास दाखवून घर जमीन यावर कर्जे काढून कशीतरी कंपनी चालू ठेवतात, पण एक दिवस येतो तेव्हा सर्व बंद होते.
धन्यवाद!
– महेश चव्हाण
i4i Investment Planners Pvt Ltd.
9821899211
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/
Share this article on :