Introvert / Extrovert
आपण नक्की कसे आहोत? इन्ट्रोव्हर्ट (Introvert) की एक्स्ट्रॉव्हर्ट (extrovert)? हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. इन्ट्रोव्हर्ट आणि एक्स्ट्रॉव्हर्टही दोन स्वभाववैशिष्ट्य तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. आजच्या लेखात आपण या दोन स्वभाववैशिष्टांची माहिती घेऊया.
जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती.. अशी एक म्हण आहे.. ते खरंय.. तसे जितक्या व्यक्ती तितकेच स्वभावही पहायला मिळतात. याच स्वभाव गुणधर्मांविषयी थोडेसे जाणून घेऊ.
माणसां-माणसांमध्ये अनेक प्रकारचे स्वभावगुण पहायला मिळतात. त्यात बरेचदा असे आढळते की काहीजण हे खूप कमी बोलतात आणि काहीजण खूप जास्त बोलतात. बडबड्या असणे हा यापैकीच असणारा एक गुण. मात्र व्यक्तीमत्त्व कसे आहे यालाही माणसाच्या आयुष्यात खुप महत्त्व आहे. स्वभावाचा व्यक्तीमत्वावर बराचसा प्रभाव असतो.
अत्यंत कमी बोलणारा, शांत स्वभावाचा किंवा मृदू स्वभावाचा एखादा माणूस हा अंतर्मूख म्हणजेच इंट्रोव्हर्ट असतो का आणि प्रचंड बडबड्या, सर्वांमध्ये मिसळणारा, नेहमी उत्साही, अनोळखी व्यक्तींनाही पटकन आपलसं करणारा असा थोडासा अवखळ किंवा अल्लड स्वभावाचा व्यक्ती हाच केवळ एक्स्ट्रॉव्हर्ट समजला जातो का.. याची शहानिशा करणे हा या लेखाचा मूळ उद्देश आहे.
हे नक्की वाचा: आत्मविश्वास कमी आहे? मग हे नक्की वाचा
Introvert: ‘इंट्रोव्हर्ट’ म्हणजेच अंतर्मूख हे नक्की काय असते?
- हा एक व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.
- स्वत:तच मग्न असणे किंवा राहणे,
- सहसा कुणामध्ये न मिसळणे,
- ऩव्या किंवा अनोळखी व्यक्तींशी स्वत: पुढाकार घेऊन न बोलणे,
- कुटुंबातल्या किंवा अगदी जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य कोणाशी फारसे संबंध नसणे,
- मित्र-मैत्रिणींचा फार गोतावळा नसणे,
साधारण अशा व्यक्ती अंतर्मूख किंवा ‘इंट्रोव्हर्ट’ या प्रकारात मोडतात.
Introvert: ठळक गुणविशेष
- सर्वसाधारणपणे एकटे असताना हे लोक एकांतात तासन् तास विचार करत बसतात.
- यांना स्वत:ला एकटं रहायला आवडतं.
- इतरांसोबत बोलण्यापेक्षा स्वतःच्या मनाशी बोलायला यांना जास्त आवडते
- नेहमी स्वत:च्याच जगात रमलेले असतात
- स्वभाव थोडासा लाजाळू आणि एककेंद्री असतो
- कमी बोलणे हे स्वभावतच असल्याने फारसे कोणाशी आपणहून बोलत नाहीत
- विषय आवडीचा असो वा नावडता, समजलेला किंवा न उमगलेला पण कधीही पटकन प्रतिसाद देत नाहीत
- सामाजिक दृष्टिकोन खूपच कमी, जवळपास नसतोच
- अशा व्यक्ती सहसा आपणहून समोरच्याशी संवाद साधत नाहीत
- मित्र परिवार फारसा नसतोच
मात्र सर्वच गोष्टी नकारात्मक नसतात. मुळात अंतर्मूख असणे हा स्वभावाचा भाग आहे. जो बहुतांश जन्मत: असतो. त्यामुळे ते म्हणतात ना.. तसा स्वभाव बदलत नाही.. पण थोड्या प्रयत्नांनी आणि काळानुसार त्यात काही बदल नक्की करतात. अर्थात त्यासाठी मनात इच्छाशक्ती असावी लागते.
इतर लेख: या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे
Introvert: अंतर्मूख लोकांमध्ये सर्वच गोष्टी नकारात्मक नसतात-
- अशा व्यक्तींचा जो स्वत:चा जवळचा असा मैत्रवर्ग असतो त्यांचतासोबतच अशा व्यक्ती मनमोकळ्या वागतात. प्रसंगी अशांसोबतच हे लोक अगदी छान खुलतात.
- ज्या गोष्टी ते अगदी मनापासून करतात .उदाहरणार्थ.. वाचन, लेखन, स्वयंपाक, संगीत साधना इ. त्यामध्ये ते अगदी निपुण असतात. मात्र त्याचा फार गाजावाजा करताना ते दिसत नाहीत.
- हल्लीच्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणे यावरुन जे मत एखाद्या व्यक्तीबद्दल ठरवले जाते ते प्रत्यक्षात वेगळे असू शकते. म्हणजे अंतर्मूख व्यक्ती या सोशल मीडियावर खूप जास्त ॲक्टिव्ह असतात याची उदाहरणे आहेत.
- प्रत्यक्षात लोकांशी फार बोलत नाहीत, एरव्ही कोणात मिसळत नाहीत, परंतू समाज माध्यमांवर खूप काही पोस्ट आणि रिप्लाय करताना दिसतात.
- कमीत कमी संवाद साधूनही आपला मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवण्याची कला ही काही अंतर्मूख लोकांना छान जमलेली असते.
यांच्या बाबतीत एक गोष्ट असू शकते ती म्हणजे, स्वतला ‘रिचार्ज’ करायला जो वेळ घ्यावा लागतो ते यांना आपसूकच मिळतो. कारण थोडा अबोल स्वभाव असल्याने हे लोक सतत कोणाशी बोलत नाहीत. किंवा वेगवेगळ्या सर्कल मध्येही वावरत नाहीत. जिथे असतात तिथेही ते एकटेच असल्याने किंवा कामाव्यतिरिक्तचा वेळ ते घरातच रहात असल्याने विचार, स्वतशी बोलणे आणि ‘रिचार्ज’ होण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. जो एक्स्ट्रॉव्हर्ट लोकांना फारसा मिळत नाही.
Extrovert – एक्स्ट्रॉव्हर्ट म्हणजे काय रे भाऊ?
अंतर्मूख म्हणजेच इंट्रोव्हर्ट व्यक्तींचे जे गुणविशेष आपण वरती पाहिले त्याच्या अगदी उलट गुणधर्म ज्यांच्यात आढळतात ते एक्स्ट्रॉव्हर्ट. अगदी मोकळ्या, खुल्या स्वभावाचे हे लोक. त्यांना नेहमीच त्यांच्या सभोवती एक गोतावळा असायला हवा असतो. सतत बोलण्याची ओढ असते. किंबहुना ती गरज असते. त्यांच्याकडे सांगण्यासारखंही बरंच काही असतं, त्यामुळे शेअरिंग करणे हा त्यांचा आवडता छंद.
हे लोक खूप सोशल असतात. व्हर्च्युअल जगापेक्षाही ‘रिअल कनेक्ट विथ पिपल’ असणं यांना खुपच आवडतं. मुळातच अशा लोकांचा स्वभाव खुप मोकळा असतो. ते कोणातही मिसळतात. अगदी कोणातही! फक्त स्वतःचा मित्र परिवार, कुटूंबातील सदस्य, शेजारपाजारचे, ओळखीचे एवढेच नाही तर अगदी वेगवेगळ्या वेळी विविध समूहांचा भाग असताना.
लोकलमध्ये, बसमध्ये, प्रवास करताना, विमानात बसलेला अनोळखी शेजारी अगदी कोणीही यांना गप्पा मारायला चालतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे अशा समोरच्या व्यक्ती समवयाच्या नसतील तरी चालेल मात्र समविचारी असले की बास.. यांचे सूर जुळलेच म्हणून समजा.
महत्वाचा लेख: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र
Extrovert : ठळक गुणविशेष
- समोरच्या व्यक्तीवर छाप पाडून आपल्याकडे आकर्षित करुन घेण्याची यांची वृत्ती वाखाणण्याजोगी असते
- अगदी मोकळ्या स्वभावाचे असल्याने आपले मत मांडतानाच समोरच्याचेही मत ऐकून घेतात
- मैत्रीपूर्ण आणि बोलका स्वभाव
- प्रचंड मोठा मित्रपरिवार आणि सामाजिक गोतावळा त्यामुळे प्रचंड ओळखीदेखील असतात
- असे लोक इतरांसाठी बरेचदा प्रेरणास्त्रोत असू शकतात.
- अनेक विषयांमध्ये रुची असल्याने सतत नव्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतात
- फिरणे, प्रवास करायला, भटकायला आवडते
- नव्या लोकांना भेटणे, बोलणे, नव्या विषयांची आणि संस्कृतींची माहिती करुन घेणे अशा गोष्टींमध्ये रुची असते
- कोणत्याही वेळी कोणत्याही समूहांमध्ये मध्ये असोत, हे लोक नेहमीच इतरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात
- शांत बसणे हे यांच्या स्वभावातच नसते
तर, याचा काही ठोस निष्कर्ष काढणे कठीण आहे, मात्र वर नमूद केलेल्या गोष्टी या मानवी स्वभावाचाच एक भाग असल्याने त्यात फार मोठे बदल करणं कोणालाही शक्य नाही. मात्र हे खरं की दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी कायम सकारात्मकतेकडे स्वत ला झुकतं ठेवलं पाहिजे. जसे तुम्ही सक्षम असाल, त्याप्रमाणे सतत आनंद घेत राहिलं पाहिजे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: introvert meaning marathi, extrovert meaning marathi, introvert mhanje kay, extrovert mhanje kay, introvert vs extrovert marathi
Image credit: https://bit.ly/2IHJQLU