आयकर रिटर्न भरताना झालेल्या चुका कशा दुरुस्त कराल?

Reading Time: 3 minutesआयकर रिटर्न भरल्यानंतर त्याची आयकर विभागाकडून कम्प्युटर प्रोग्रॅमद्वारा तपासणी केली जाते व त्यासंबंधित सूचना करदात्याला पाठवली जाते. सूचनांमध्ये आपल्याकडून सादर केलेल्या परताव्याचे तपशील आणि आयकर विभागाकडे उपलब्ध असलेले तपशील यांच्यामध्ये काही फरक आढळला असल्यास त्यासंबंधीची नोंद असते. जर करदात्यास यासंदर्भात कोणत्याही शंका असतील अथवा या सूचना मान्य असतील तर संबंधित सूचनांनुसार दुरुस्ती करून पुन्हा रिटर्न भरावा लागतो तसेच आकारण्यात आलेल्या कराची जादा रक्कम भरावी लागते.

आयटीआर: आयकर रिटर्न भरण्यासाठीची १० महत्त्वाची कागदपत्रे

Reading Time: 3 minutesजून जुलैचा सिझन अनेकांसाठी कंटाळवाणा असतो. भरपूर सुट्टीनंतर मुलांची शाळा सुरु होणार असते. भर पावसात वह्या-पुस्तके दप्तर ई शालेय वस्तूंची खरेदी, ॲडमिशन प्रोसेस हे सर्व चालू असत आणि त्यात भरीस भर म्हणून आयकर रिटर्न (ITR) भरण्याचं टेंशन. रिटर्न फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. पण  रिटर्न फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रांची माहिती करुन घेतली तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होऊन जाईल. आजच्या लेखात आपण आयकर रिटर्न भरण्यासाठी लागणाऱ्या १० महत्वाच्या कागदपत्रांची माहिती घेऊया. 

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

‘आयटीआर (ITR)’ कसा भरावा?- पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शन

Reading Time: 3 minutesजूनमध्ये एकीकडे मान्सून पिकनिक ठरत असतात, तर दुसरीकडे आयटीआर (ITR) फाईल करण्याची धावपळ सुरू असते. त्यातही जर कोणी पहिल्यांदाच आयटीआर फाईल करत असेल, तर अचानक आलेला पाऊस जशी तारांबळ उडवतो तशीच तारांबळ आयटीआर भरताना होत असते. आयटीआर भरताना खरंतर गोंधळून जायची काहीच गरज नाही. फक्त थोडीशी माहिती जाणून घेतली की आयटीआर भरणं एकदम सोपं होईल. 

कार खरेदीचा निर्णय? थांबा …. आधी हे वाचा – भाग २

Reading Time: 3 minutesभारतातील रस्ते हे योग्य प्रतीचे नाहीत. वाहतूक ही कधीही विस्कळित होत असते. अशावेळी पाऊस, पूर आला असता गाड्या पाण्यातून जात नाहीत. मग कित्येकदा आपली गाडी पाण्यात, रस्त्यात ठेऊन पायी जावं लागतं. मग गाडीची काळजी मनाला लागते. शेवटी ज्यांच्याकडे गाडी नाही तो रस्त्यावरून पायी चालत जातो आणि ज्याच्याकडे स्वतःची गाडी आहे तो ही रस्त्यावरून पायी चालत जातो. 

कार घेताय? थांबा… आधी हे वाचा

Reading Time: 3 minutesभारतामध्ये स्वतःची कार असणे हा प्रेस्टीज इशू असतो. घरात चार चाकीचा ऐरावत उभा असणे म्हणजे मोठेपणा मानला जातो.  भारतीय लोक स्वतःच्या गाडीबद्दल, चारचाकी बद्दल, कारबद्दल, खूप भावनिक असतात. शेजाऱ्याने कार घेतली किंवा नातेवाईकांमध्ये कुणी कार घेतली की आपणसुद्धा कार घ्यायलाच हवी असं वाटतं. पण कार म्हणजे नक्की काय भानगड आहे? खरंच ती घ्यायला हवी का? आपण ती खरंच घेण्याच्या परिस्थितीत आहोत का? कार घेण्याचे फायदे व तोटे याचा विचार खोलात जाऊन प्रत्येक जण करत नाही.

मी अर्थसाक्षर!!

Reading Time: < 1 minuteतळागाळातल्या जनतेपर्यंत पोचून त्यांना अर्थसाक्षर करायचे असल्यास पुस्तक हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, अशी आमची खात्री पटली आणि आम्ही पुस्तक प्रकाशनाचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकच्या आखणीसाठी आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे. यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

नरेंद्र मोदी- मोदींचा विजय आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे १२ मूलमंत्र

Reading Time: 3 minutesलोकसभा निवडणूकींचा निकाल लागला आणि श्री नरेंद्र मोदी यांनी अद्भुत यश कमावत पुन्हा एकदा पंतप्रधान पद मिळवलं. हा विजय फक्त लोकसभेपुरता मर्यादित नाही. हा विजय प्रत्येकाला स्पर्श करून जाणारा आहे. प्रत्येकजण यातून खूप काही शिकू शकतो. व्यापाऱ्याला, एका इंटरप्रिन्युअरला खूप काही यातून शिकता येण्यासारखं आहे.

आरटीजीएस, एनईएफटी आणि आयएमपीएस सुविधांमधील फरक

Reading Time: 4 minutesएनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर), आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) आणि आयएमपीएस (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) म्हणजे तात्पुरती भरणा सेवा या तीन महत्वाच्या सेवा बँकांद्वारे पुरवल्या जातात. या तीन सेवांबद्दल व त्याच्या वापराबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे पैसे हस्तांतरित करताना अनेक अडचणी येतात. एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे  पैसे हस्तांतरित करण्याची प्रमाणित वेळ असते. पण आयएमपीएसने पैसे हस्तांतरित करायचे असतील, तर त्याला वेळेची मर्यादा नसते.

कॅशलेस आरोग्य विमा पॉलिसीचे फायदे

Reading Time: 3 minutesबरेचदा अकस्मिक वैद्यकीय वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये पैश्यांची गरज पडते. अनोळखी शहरात ओळखीचे लोक नसताना आर्थिकदृष्ट्या अडचणी येऊ शकतात. अशावेळी आरोग्य विमा खरेदी करताना कॅशलेस आरोग्य विमाचा पर्याय निवडावा. यांमध्ये आपल्याला वैद्यकीय उपचारांचे पैसे भरावे लागत नाहीत. आपल्यातर्फे आपली आरोग्य वीमा कंपनी हॉस्पिटलच्या बिलाचे पैसे देते.  आपण फक्त योग्य ती कागदपत्रेसादर करणे आवश्यक आहे.