शेअर बाजार: रिलायन्सचे वाढते बाजारमूल्य

Reading Time: 2 minutesरिलायन्स कंपनीच्या बाजारमुल्याने ( Market Capitalisation) आज दहा लाख कोटी (एकावर तेरा शुन्ये.. उगीच घोळ नको) रुपयांचा टप्पा पार करत एक नवा मैलाचा दगड गाठला. नऊ लाख ते दहा लाख हा टप्पा गाठायला फक्त ४० दिवसांचा आणि  २५ सत्रांचा अवधी लागला. म्हणजेच गेल्या महिनाभरांत कंपनीच्या शेअरने १०% च्या आसपास वाढ नोंदविली.

शेअरबाजार: घर (कर्ज) पहावं ‘न’ फेडून… 

Reading Time: 5 minutes‘काळ बदलला, हे आजकालचे परवलीचे वाक्य बहुतेकदा खरेही असणारे, पण कर्ज या शब्दाला चिकटलेली एकतर्फी नकारात्मक, अपराधी भावना आजही तितकीशी बदललेली नाही. हाच धागा पकडून कर्ज या संकल्पनेबद्दलचे गैरसमज दूर करता आले, तर पहावे या हेतूने हा शब्द्च्छल (आणि वाचकांचा छळ).

सध्या शेअर्स खरेदी करावी का?

Reading Time: < 1 minuteकाही विकत घेताय?? मग जरा नव्हे भरपूर सावधगिरी बाळगा. हे वाक्य यापूर्वी मी अनेकदा बोललोय. लोक थोड्याश्या जास्त व्याजाच्या आमिषाने आपले मुद्दलच धोक्यात घालतात

शेअर बाजार – रिलायन्स जीओ

Reading Time: < 1 minuteकाल ‘रिलायन्स कंपनीने’ त्यांच्या जिओ नेटवर्क संदर्भांत आपल्या एक्श्चेंजेसकडे दाखल केलेले पत्रही वाचनीय आहे.

शेअर बाजारातील सध्याची उसळी टिकणार का?

Reading Time: 2 minutesशेअर बाजार – मंदीची  कक्षा भेदून बाजाराचीही  चांद्रयान मोहिम? या लेखानंतर ही उसळी टिकणार का? हा प्रश्न ‘ट्रेंडिंग’ होता. आता जर मला ह्या प्रश्नाचे नक्की उत्तर माहित असते, तर मी कीबोर्डवर बडवून बोटे झीजवण्यापेक्षा नोटा मोजून ती झीजवणे पसंत नसते का केले?? तरीपण आपल्याला लोक विचारतायत म्हटल्यावर उत्तर ठोकायलाच हवे, ही नशा पण काही कमी नाही.

शेअर बाजार – मंदीची कक्षा भेदून बाजाराचीही चांद्रयान मोहिम? 

Reading Time: 4 minutesदोन तीन दिवसांपूर्वीच काहीतरी होणार, करणार, देणार म्हणून गाजावाजा झालेल्या पत्रकार परिषदेत फक्त ई-सिगारेटवर बंदीसारखे छुटपूट निर्णय घेऊन डोंगर पोखरुन काढलेल्या उंदीराच्या पार्श्वभुमीवर अचानक घेतलेला करकपातीचा हा निर्णय! या अभूतपूर्व निर्णयाचे वर्णन प्रामुख्याने ‘मंदीवरील उतारा’ असे केले गेले. त्या अनुषंगाने मला जाणवलेल्या विविध पैलूंचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

शेअरबाजार – गावा अर्थसंकल्प आला….

Reading Time: 3 minutesमध्यम व लघु आकाराच्या कंपन्यांवरील कर कमी केल्याचा फायदा म्युच्युअल फंडसच्या स्माल किंवा मिडकॅप (Small / Midcap) योजनांना होण्याची शक्यता आहे. CPSE, Govt. ETF यांचा अंतर्भाव करबचतीकरिता पात्र योजनांमध्ये केल्याने अशा योजनांकरिता पात्र समभागांच्या  भावांमध्येही याचे सकारात्मक प्रतिबिंब दिसु शकेल.

शेअरबाजारः DHFL चे महाभारत

Reading Time: 4 minutesगेल्या आठवड्यात म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकदारांना मोठाच धक्का बसला. आपल्या गुंतवणुकीचे मुल्य फक्त एका दिवसांत (०४ जुन २०१९) जेव्हा १०.. २०.. ३०%  आणि (काही दुर्दैवी लोकांनी) ५०% पेक्षा अधिक गमावल्याचे अनेकांना आढळले. आश्चर्याची बाब म्हणजे नुकसानीची ही त्सुनामी शेअर् बाजारांत थेट पैसे गुंतविणाऱ्या ‘ईक्विटी फंड्स’मध्ये नव्हती, तर एरवी सुरक्षित, बॅंकेच्या मुदतठेवी समकक्ष असल्याचे ‘भासवुन विकल्या गेलेल्या ‘गैर ईक्विटी’ योजनांमधे  होती. एका दिवसात झालेल्या नुकसानीची टक्केवारी दाखवणारी खालील आकडेवारी हे चित्र किती विदारक आहे हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

शेअर बाजार – मनी वसे ते सत्यात दिसे

Reading Time: 3 minutesजेव्हा भावाच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा अल्पकालीन सरासरी जास्त दिसू लागते. विश्लेषक याचा अर्थ बाजारांत तेजीचे वातावरण तयार होऊ लागले आहे असा घेतात. याउलट भावाची अल्पकालीन सरासरी खाली जाऊ लागल्यास तेजीवाल्यांकरिता ती मंदीची सुचना असते. (यामागचा तर्क समजणे विशेष अवघड नसावे). बाजाराच्या तांत्रिक परिभाषेत या संदर्भांत दोन लक्षवेधी संज्ञा आहेत, ‘गोल्डन क्रॉस’ (Golden Cross) आणि ‘डेथ क्रॉस’ (Death Cross).