जागतिक बचत दिन – जगा सन्मानाने…

Reading Time: 2 minutesआज ३० ऑकटोबर! भारतमध्ये आजचा दिवस ‘जागतिक बचत दिन’ (world saving day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ३१ ऑक्टोबर १९२४ रोजी मिलानो, इटली येथील पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँक (बचत बँकांच्या जागतिक सोसायटी)’ दरम्यान स्थापित करण्यात आला. इटालियन प्राध्यापक ‘फिलिपो रॅव्हिझाने’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बचत दिन’ म्हणून जाहीर केला. जगभर, ‘जागतिक बचत दिन’ दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतामध्येही पूर्वी हा दिवस ३१ ऑक्टोबरलाच साजरा होत असे. परंतु १९८४ साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ३१ ऑक्टोबरला निधन झाल्यामुळे त्यानंतर भारतामध्ये ‘जागतिक बचत दिन’ हा ३० ऑक्टोबरला साजरा केला जातो.

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १

Reading Time: 4 minutesकायदेशीर कागदपत्रे हा अनेक ठिकाणी लागणारी आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. अगदी जन्मापासून सुरु झालेला हा कागदपत्रांचा सिलसिला मृत्यूनंतर मृत्यू-दाखला मिळाल्यावरच संपतो. जर लहानपणीच मुलांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करुन ठेवली तर शाळेच्या प्रवेशापासून अगदी परदेशगमनापर्यंतच्या बहुतांश गोष्टी करताना वेळ वाचेल व इतर अडचणींचा सामनाही करावा लागणार नाही.

Cashless – लेसकॅश ते कॅशलेस

Reading Time: 3 minutesआपल्या देशातील प्रत्येकाने जास्तीतजास्त व्यवहार हे रोख रक्कम न वापरता करावेत अशी सरकारची इच्छा असून यास चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॅशपासून लेसकॅश ते कॅशलेसचा’ प्रवास अनेक गोष्टींनी करता येतो. हे व्यवहार अतिशय पारदर्शक आहेत आणि त्याची कुठेना कुठे नोंद होत असल्याने त्याचा मागोवा घेणे शक्य आहे .त्यातील महत्वाच्या गोष्टींवरील हा धावता  दृष्टिक्षेप–

इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा भाग १

Reading Time: 2 minutesसायबर क्राईमच्या (Cyber crime) नोंदींची संख्या आजकाल इंटरनेट वापरकर्त्यांच्या गतीने वाढत चालली आहे, म्हणूनच अधिक अधिक सुरक्षा मिळवत असताना आपण अजून असुरक्षित होतो आहोत! अशा परिस्थितीत सामान्य माणसांनी काय करावं? इंटरनेट बँकिंग सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यातील धोक्यांमुळे बंद करावा? हे सोडून जुन्या, पारंपारिक पद्धतीनेच बँकिंग वापरावी? तर अजिबात नाही!! ‘Prevention is better than cure’  असं म्हटलं जातं. सायबर क्राईम आणि सुरक्षित इंटरनेट बँकिंग च्या पद्धती यांचा थोडासा अभ्यास आणि इंटरनेट बँकिंग वापरताना बाळगलेली जागरूकता खूप मोठी संकटं टाळू शकतात. म्हणूनच जाणून घ्या काय आहेत इंटरनेट बँकिंग च धोके? ते कसे टाळावे? कोणती काळजी घ्यावी?

गुगल पे मार्फत आर्थिक व्यवहार

Reading Time: 3 minutes‘तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय’ हे तर कित्येकदा ऐकलं असेलच. पण या जागतिकीकरणाचा तुम्ही कधी फायदा करून घेतलाय का? नाही? मग आता करा.  विचार करा, तुम्ही कामा निमित्त एखाद्या नवीन शहरात आहात आणि तुमच्या कडील रोख पैसे ((कॅश)) संपले. काही वेळाने असं लक्षात आला की घाईमध्ये निघताना क्रेडीट, डेबिट कार्ड्स सुद्धा घरीच विसरले आहेत. ज्यांच्याकडून तत्काळ मदत मिळेल असं अनोळखी शहरात तुमचं कोणीही नाही. जेवण, प्रवास, निवास सगळ्या गरजा तुमच्या समोर ठाण मांडून बसल्या आहेत. अशा वेळी काय कराल? तुमचा मोबाइल डिव्हाइस वापरून आपल्या जवळपास असलेल्या किंवा भारतात कोठेही असलेल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला पैसे पाठविण्यासाठी विनंती करू शकता तसच तुम्ही बाहेर असताना तुमचे कुटुंबीय संकटात असतील अथवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती संकटात असेल तर अशा वेळी त्यांना पैसे पाठवूही शकता. कसं? ‘गुगल पे’ चा वापर करून! मोबाईल वर ‘गुगल पे’ डाउनलोड करा आणि आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना ‘गुगल पे’ वरून पैसे पाठवा अथवा पाठवण्याची विनंती करा. झालं तर मग देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तरी तुम्ही तुमच्या  प्रियजनांना पैसे पाठवू शकता अथवा त्यांना पैसे पाठविण्याची विनंती करू शकता. यालाच तर म्हणतात- “जग जवळ आलंय!”

रेरा नंतरचा बांधकाम व्यवसाय- भाग २

Reading Time: 3 minutesसामान्य माणसाला असा संदेश देण्यात आला की, “तुमचं घर आरक्षित करण्यासाठी थोडा वेळ वाट पाहा, कारण किमती कमी होणार आहेत, यासाठीच आम्ही ‘रेरा’ आणला आहे”. यामुळे काही काळ घरांचे बुकींग पूर्णपणे थांबलं. एक लक्षात घ्या, रेरा रिअल इस्टेटचे दर ठरवत नाही व यापुढेही कधीच ठरवणार नाही. तर ते ग्राहकांना घर हे उत्पादन खरेदी करताना त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी देण्यात आलेलं एक साधन आहे. कोणताही कायदा एखादा उद्योग बदलू शकत नाही, मात्र आपण त्या कायद्याचा वापर कसा करतो यावर तो उद्योग बदलेल किंवा नाही हे अवलंबून असतं, रेराही त्याला अपवाद नाही.

मोटारींची एकतर्फी खपवाढ ही तर रोगट सूज!

Reading Time: 4 minutesमोटारींचा खप एकदोन टक्क्यांनी कमी झाला तरी हल्ली चिंता व्यक्त केली जाते आहे. खरे म्हणजे दर्जेदार आणि पुरेशा सार्वजनिक वाहतुकीच्या सेवांकडे लक्ष जाण्यासाठी ही इष्टापत्ती मानली पाहिजे. अर्थव्यवस्थेला आलेली सूजही नोटबंदीसारख्या धोरणात्मक बदलांनी अशीच कमी होत असून ती पैशीकरणातून वाढणाऱ्या विकृतीला अटकाव करणारी आहे. अर्थव्यवस्थेची सतत वाढच होत राहिली पाहिजे, ही आपल्या देशाची गरज असली तरी ती सतत चढ्या वेगाने होत राहील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. वाढ थोडी जरी कमी झाली तरी फार मोठे संकट कोसळले, असे भांडवलशाहीत मानले जाते.

रेरा नंतरचा बांधकाम व्यवसाय- भाग १

Reading Time: 3 minutesमहाराष्ट्र हे रेरा प्राधिकरण स्थापन करणारे व नोंदणीसाठी संकेतस्थळ तयार करणारे सर्वात पहिले संकेतस्थळ ठरले. मात्र नेहमीप्रमाणे रिअल इस्टेट उद्योगामध्ये तथ्यात्मक डेटा फारसा उपलब्ध नाही. तरीही मला असं वाटतं की रेराअंतर्गत सर्वाधिक नोंदण्या आपल्याच राज्यात झाल्या असाव्यात, ज्यातून आपण कायद्याचे पालन करायचा उत्सुक आहोत हे दिसून येते.

तुमची कार्डस् गुगल पे सोबत जोडली आहेत का?

Reading Time: 2 minutesगुगल पे ने जाहीर केलेली नवनवीन वैशिष्ट्ये वापरात आणायची असतील तर त्यांची ओळख करून घ्यावी लागेल. क्रेडीट आणि डेबिट कार्ड व्यतिरिक्त अनेक कार्डस् आणि व्हाउचर्स गुगल पे ला जोडण्याची सोय आता आपण वापरू शकता. वेगवेगळे कार्डस् त्यांचे वेगवेगळे पासवर्डस, तसेच नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या विविध उपक्रमांचे तपशील नव्याने लक्षात ठेवण्याची गरज आता उरलेली नाही. तुम्हाला एकच करायचं आहे, आजच तुमचे गुगल पे अकाऊंट तयार करा आणि तुमच्याजवळ असलेले सर्व कार्डस् आणि उपक्रम या गुगल पे अकाऊंटसोबत जोडा. झालं तर मग! तुमचे सर्व कार्डस् तुमच्या पाकिटात आहेत. कुठेही घेऊन फिरा! ना कार्डस् घरी विसरण्याची चिंता, ना हरवण्याची, ना पासवर्ड लक्षात ठेवण्याची काळजी.