नवीन वर्ष ग्राहक राजाचं … !! भाग १

Reading Time: 2 minutesमी माझ्या लेखाच्या सुरुवातीला दोन वेगळी अवतरणे का वापरली याबद्दल तुम्ही गोंधळून गेला असाल तर तुम्हाला सांगतो की हा विषयच दोन घटकांचं मिश्रण आहे, जे सकृतदर्शनी सारखेच वाटू शकतात मात्र त्या पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. होय मी रिअल इस्टेट व घराविषयी बोलतोय, या दोन्ही संज्ञा एकमेकांशी संबंधित आहेत तरीही रिअल इस्टेट म्हणजे पैसे कमावणे (म्हणजेच व्यावसायिकांसाठी) व घर म्हणजे, इलियट यानं म्हटल्याप्रमाणे केवळ एक भौतिक गोष्ट नाही तर ती एक भावना आहे, जी सगळ्यांचीच महत्वाकांक्षा असते.

पॉवर ऑफ (रूपे कार्ड) कॉमन मॅन !

Reading Time: 3 minutesरूपे कार्डचा वापर देशात इतका वाढला की व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांना भारत सरकारची अमेरिकी प्रशासनाकडे तक्रार करावी लागली. भारतीय सामान्य नागरिकांची ताकद त्यातून दिसली. संख्येने प्रचंड असलेला हा सामान्य भारतीय नागरिक असे बदल करू लागला तर आपली लोकसंख्या ओझे न होता ती आपली संपत्ती होऊ शकते.

General Insurance -सर्वसाधारण विमा योजनेचे विविध प्रकार

Reading Time: 3 minutesविविध प्रकारच्या धोक्यातून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा काढला जातो,  हे आपल्याला माहीत आहेच. विम्याद्वारे ही भरपाई पैशांच्या स्वरूपात केली जाते. आयुष्याची अशाश्वतता ही जीवनविमा (Life insurance) घेऊन सुरक्षित केली जाते तर इतर सर्व गोष्टीतील धोका हा सर्वसाधारण विमा योजना (General Insurance) घेऊन सुरक्षित केला जातो. असे अनेक प्रकारचे धोके निश्चित करून त्यावर मात करण्यासाठी सर्वसाधारण विमा घेतला जातो. हा ग्राहक आणि विमाकंपनी यातील कायदेशीर करार असून उभयपक्षी यातील अटींचे पालन करावे लागते. या योजनांची मुदत सर्वसाधारण पणे एक वर्ष असून क्वचित २/३  वर्षाचीही असू शकते. यातील काही योजना या कायद्याने आवश्यक असून अनेक योजना ऐच्छिक आहेत.

सुकन्या समृद्धी योजना – भाग १

Reading Time: 2 minutesघरात कन्यारत्नाचं स्वागत तर जोरदार झालं, पण तिच्या भविष्याची काळजी वाटते? पालक म्हणून तिच्या शिक्षण आणि लग्नासाठीच्या खर्चाची तरतूद काय आहे? तुमचं तुमच्या मुलीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची सुवर्ण संधी एक सरकारी योजना तुम्हाला देते आहे. जिचं नाव आहे ‘सुकन्या समृद्धी योजना’. तुमची लाडकी लेक सज्ञान होई पर्यंत प्रती महिना गुंतवणूक करा आणि तिच्या भविष्य बद्दल निश्चिंत व्हा!

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग २

Reading Time: 3 minutesमागच्या भागात आपण दोन ‘जन्म दाखला’ आणि ‘आधारकार्ड’ अशा दोन महत्वाच्या  कागदपत्रांची माहिती घेतली. देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही दोन्ही कागदपत्रे कायद्याने अनिवार्य आहेत. या भागात आपण लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या  इतर कागदपत्रांबद्दल माहिती घेऊया.

इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग ३

Reading Time: 2 minutesधोक्याची सूचना! इंटरनेट बँकिंग वापरताना कळत नकळत अशा काही चुका होऊन जातात की ज्यामुळे तुमची जमापुंजी धोक्यात येते. मोठे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव करायचा असेल तर इंटरनेट बँकिंग चा काळजीपूर्वक वापर करणं फार महत्वाचं आहे. इंटरनेट बँकिंग हे साधन जितकं सोईस्कर आहे तितकच धोक्याचाही आहे. इंटरनेट बँकिंग बद्दलची अपुरी माहिती फार महागात पडू शकते. ‘Half knowledge is always dangerous’  असं म्हणतात, ते इथेही खरं आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार हाताळताना, मग ते लहान रकमेचे असोत की करोडोंचे, पुढील काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजेत. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊ शकता, अथवा ऑनलाईन फ्रॉड, आणि तत्सम धोक्याची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर असेल.

इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग २

Reading Time: 3 minutesइंटरनेट बँकिंगचा वापर करताना ‘काय करावं’ यापेक्षा ‘काय करू नये’ याची यादी नेहमीच मोठी असते. त्यामुळेच ‘काय करावे?’ या प्रश्नाकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. काही गोष्टी टाळणे जसे महत्वाचे आहे तसेच थोडी अधिक काळजी घेऊन काही गोष्टी केल्या की आपण सुरक्षेच्या वाटेवर अजून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पुढील काही गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असल्याने आवर्जून काळजीपूर्वक करायला हव्यात.

‘गुगल पे’ च्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 2 minutesसरकारच्या चलन बंदीच्या (demonetization) निर्णयानंतर देशात डिजिटल पेमेंट स्वीकारण्यात वाढ झाली. क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सबरोबरच पेटीएम सारख्या मोबाइल वॉलेट आणि पेमेंट् लोक वापरू लागली.  ‘तेझ’ चा बोलबाला गेल्या वर्षात याच मुळे वाढला. पण डिजिटल पेमेंट च्या या स्पर्धेत टिकण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आपलं काहीतरी वैशिष्ट प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेझ म्हणजेच सध्याच्या गुगल पे ने देखील आपल्या अॅपची खासियत म्हणून काही वैशिष्ट जाहीर केले आहेत. तुम्हाला त्याबद्दल माहित आहे? नाही? मग जाणून घ्या.

जागतिक बचत दिन – जगा सन्मानाने…

Reading Time: 2 minutesआज ३० ऑकटोबर! भारतमध्ये आजचा दिवस ‘जागतिक बचत दिन’ (world saving day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ३१ ऑक्टोबर १९२४ रोजी मिलानो, इटली येथील पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँक (बचत बँकांच्या जागतिक सोसायटी)’ दरम्यान स्थापित करण्यात आला. इटालियन प्राध्यापक ‘फिलिपो रॅव्हिझाने’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बचत दिन’ म्हणून जाहीर केला. जगभर, ‘जागतिक बचत दिन’ दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतामध्येही पूर्वी हा दिवस ३१ ऑक्टोबरलाच साजरा होत असे. परंतु १९८४ साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ३१ ऑक्टोबरला निधन झाल्यामुळे त्यानंतर भारतामध्ये ‘जागतिक बचत दिन’ हा ३० ऑक्टोबरला साजरा केला जातो.

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १

Reading Time: 4 minutesकायदेशीर कागदपत्रे हा अनेक ठिकाणी लागणारी आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. अगदी जन्मापासून सुरु झालेला हा कागदपत्रांचा सिलसिला मृत्यूनंतर मृत्यू-दाखला मिळाल्यावरच संपतो. जर लहानपणीच मुलांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करुन ठेवली तर शाळेच्या प्रवेशापासून अगदी परदेशगमनापर्यंतच्या बहुतांश गोष्टी करताना वेळ वाचेल व इतर अडचणींचा सामनाही करावा लागणार नाही.