Browsing Category
गुंतवणूक
664 posts
Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?
Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.
SIP- म्युच्युअल फंड युनिट एसआयपी करताना…
Reading Time: 3 minutesगुंतवणूक करण्यास योग्य वेळ कोणती? हे सातत्याने बदलत असल्याने एकरकमी गुंतवणूक न करता एसआयपी (SIP) च्या माध्यमातून टप्याटप्याने करावी असे सांगण्यात येते. ही गुंतवणूक अधिक चांगल्या पद्धतीने कशी होऊ शकेल, यात कोणत्या चुका होऊ शकतात आणि त्या कशा टाळता येतील यासंबंधीचे हे चिंतन.
माझे पैसे कोणत्या बँकेत कसे ठेऊ किती ठेऊ?
Reading Time: 4 minutesबचत आणि गुंतवणूक यांच्या अनेक योजना आहेत. आपल्याकडील पैसे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, भविष्यकालीन गरज या सर्वांचा विचार करून कमी अधिक प्रमाणात पैशांची विभागणी करावी लागते. यात सुरक्षितता, परतावा आणि रोकडसुलभता यांचाही विचार करावा लागतो. या सर्वाचा विचार करून काहीतरी रक्कम आपल्याला बँकेत ठेवावी लागते. बँकेत ठेवलेले पैसे, जरी ते कोणत्याही योजनेत असले तरी आपल्याला मागणी केल्यास ताबडतोब मिळू शकतात. तेव्हा आपण कोणत्या बँकेत किती पैसे ठेवावे? कसे ठेवावेत? असे प्रश्न पडणे साहजिकच आहे.
Foreign Investment -परकीय गुंतवणूक म्हणजे काय?
Reading Time: 2 minutesआयात व्यवहार प्रामुख्याने डॉलर या चलनात होतात. त्यामुळे आपल्या चालू खात्यात तूट येते त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला विविध माध्यमातून डॉलर्स मिळवावे लागतात. यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज, अन्य देशातून कर्ज किंवा मदत, परदेशी वित्तसंस्थाना भांडवल बाजारात व्यवहार करण्याची परवानगी इत्यादी. याशिवाय थेट परकीय गुंतवणूक (FDI) व भांडवली परकीय गुंतवणूक (FPI) दोन अन्य प्रकारात केली जाते
Stock Market : शेअर बाजारातील वादळी काळात टिकण्यासाठी ५ गोल्डन टिप्स
Reading Time: 2 minutesट्रेडिंग ही क्रिया आपणा सर्वांनाच आवडते. पैशांचा खणखणाट कुणाला नाही आवडणार? कधीकधी अशीही वेळ येते जेव्हा या क्षेत्रातील जाणकारांची देखील अचूक अंदाज बांधण्यात चूक होते. सध्या आपण अशाच काळातून जात आहोत. नेहमी गुंतवणूक करणाऱ्यांकडे अशा काळात त्यांचा बचाव करणारी संरक्षणात्मक यंत्रणा असते. विरुद्ध बाजूने होणा-या अस्थिरतेपासून आपल्या पोर्टफोलिओचा बचाव करण्यास ते सक्षम ठरतात. या बचावात्मक दृष्टीकोनाची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे: