आपल्या पाल्याच्या भवितव्याचं नियोजन कसे कराल ?

Reading Time: 3 minutes सध्याचा  पालक वर्ग मुलांना चांगले शिक्षण,  चांगली जीवनशैली मिळावी म्हणून झटत असतो. कधी मुलांचे हट्ट पुरवावे लागतात, तर कधी त्यांच्या शाळेच्या आणि क्लासेसच्या फीज  भराव्या लागतात. एकदा मुलं मोठी झाली की या ना त्या कारणाने पैसा लागतच असतो. मग अशा वेळी सगळा आर्थिक भार त्या पालकांवर पडलेला असतो. योग्य नियोजन केल्यास या गोष्टीसुद्धा कुठल्याही आर्थिक भाराशिवाय आनंदाने पेलता येऊ शकतात या लेखामध्ये आपण आपल्या पाल्याच्या भविष्याचं आर्थिक नियोजन कस करू शकतो, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ. 

प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुंतवणूक करणे झाले अधिक सुरक्षित

Reading Time: 2 minutes उद्योगातील तज्ञांच्या मते, भांडवली बाजारपेठेत यशस्वीरित्या मजल मारण्याची गुरुकिल्ली म्हणजे डेटा आणि त्यातील खाचखळगा समजून घेणे. पण हेच मुद्दे गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे कारण ठरू शकतात. कारण कोणत्याही सामान्य माणसाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरील वर्तमान आणि इतिहासातील डेटाचा अभ्यास करणे कठीण आहे. मात्र तंत्रज्ञानामुळे हा गुंता सोडविण्यास मदत झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक वित्तीय मंच गुंतवणुकीचे जग अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाणून घेऊयात या विविध मार्गांबद्दल.

आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसचा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध

Reading Time: 2 minutes स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीच्या एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसचा आयपीओ (IPO) २ मार्च ते ५ मार्च पर्यंत विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे.  कंपनी एकूण १३.७१ कोटी शेअर्सची विक्री करून १०,३४१ कोटी रुपयांपर्यंत भांडवल जमा करू शकेल. प्रति शेअर ७५० – ७५५ एवढी किंमत असून किमान १९ शेअर्सची खरेदी करावी लागेल. म्हणजेच किमान १४,२५० रुपयांचे शेअर्स खरेदी करावे लागतील. अँकर, पात्र संस्थागत खरेदीदार, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार, किरकोळ, एसबीआय शेअरधारक आणि कर्मचारी अशा सहा वेगवेगळ्या प्रकारातील गुंतवणूकदारांसाठी स्वतंत्र समभाग कोटा ठेवण्यात आला आहे.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १९

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, फंड मॅनेजमेंट शैली विषयी.  चांगला फंड कसा निवडायचा हे आपण बऱ्याच वेळा फंडाची पूर्वीची कामगिरी पाहून ठरवतो. परंतु तो पुढेही तितकाच चांगला परतावा देईल हे खात्रीने नाही सांगता येत, अशावेळी काहीवेळा आपण त्याची सातत्यता किंवा कॉन्सिस्टंसी पाहतो.  तसेच बाजाराच्या उताराच्या काळात फंड मॅनेजर ने कसा परतावा दिला आहे ते पाहतो. 

स्टॉक मार्केट – पी /बी प्रमाण म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes एखादी कंपनी जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी ती तिच्या सर्व मालमत्तांची विक्री करते आणि तिची सर्व कर्जे फेडते. जे काही शिल्लक उरते ती असते कंपनीचे पुस्तकी मूल्य. पीबीव्ही प्रमाण दर बाजारभावासाठी प्रति समभाग किंमतीनुसार त्या भावाच्या किंमतीनुसार भागविला जातो. उदाहरणार्थ, पीबीव्ही प्रमाण २ च्या समभागाचा अर्थ असा आहे की आम्ही प्रत्येकी एका पुस्तकी मूल्यासाठी २ रुपये देतो. पीबीव्ही जितका जास्त असेल तितकी समभागाची किंमत जास्त.

पेन्शनचं टेन्शन!

Reading Time: 4 minutes गेल्या काही वर्षात भारताच्या सेवाक्षेत्रातील प्रगतीमुळे तिथले आर्थिक लाभ वाढले आणि सरकारी नोकरीचे महत्त्व काहीसे कमी झाले. मात्र रिटायरमेंट प्लानिंग म्हटलं की लोकांना अजूनही खात्रीशीर, वाढत जाणारं आणि गरजांना पुरून उरणारं ‘सरकारी पेन्शन’ हीच गोष्ट डोळ्यासमोर येते. बदलत्या काळामुळे अशा खात्रीशीर पेन्शनच्या स्वरूपात पडलेला बदल बहुतेकांच्या लक्षात येत नाही आणि मग ते एलआयसी (LIC) किंवा तत्सम कंपनीचा कुठलातरी ‘पेन्शन प्लान’ गळ्यात बांधून घेतात.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १८

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन प्रॉडक्ट कॅटेगरी तिसरा भाग हायब्रीड फंड आणि स्पेशल फंड. ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे.  ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘सेबी’ने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराला फंड निवड करणं सोपा होईल. हा फरक साधारण एप्रिल-मे २०१८ नंतर दिसून आला. 

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी

Reading Time: 2 minutes स्टॉक मार्केट म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भरघोस परतावा किंवा प्रचंड नुकसान. अनेकदा पूर्वग्रहदूषित नजरेने आपण स्टॉक किंवा शेअर्स खरेदीकडे बघत असतो. परंतु, तुमच्याकडे स्टॉक निवडण्याचे योग्य कौशल्य आणि सतत देखरेख करण्यासाठी वेळ असेल, तर तुम्ही स्टॉकमार्केट म्हणजे शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करू शकता.  

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १७

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, सेबी ची नवीन प्रोडक्ट कॅटेगरी दुसरा भाग डेट फंड.  ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे. 

‘क्रिसिल’ म्युच्युअल फंड पतमानांकनात ‘एलआयसी’ म्युच्युअल फंडाची’ बाजी

Reading Time: 2 minutes गुंतवणूकदारांनाही अशा कालावधी मध्ये योग्य योजनांची निवड करणे कठीण होऊन जाते. बाजारातील काही पतमानांकन संस्था आणि संशोधन संस्था निरनिराळे मापदंड वापरून योजनांची क्रमवारी नियमित जाहीर करीत असतात. क्रिसिल ह्या पतमानांकन करणाऱ्या संस्थेची डिसेंबर महिनाअखेरची क्रमवारी जाहीर झाली. समभाग संबंधित योजनांच्या क्रमवारीत एलआयसी म्युच्युअल फंड’च्या योजनांनी अतिशय सुरेख कामगिरी दाखविली. तब्बल ५ समभाग संबंधित योजनांनी CPR -१ हे उच्च रेटिंग प्राप्त केले.