PMS – काय आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट योजना (Portfolio Management)

Reading Time: 4 minutesदलालांमधील स्पर्धा, त्यामुळे कमी कमी होत गेलेली दलाली, डिस्काउंट ब्रोकर्सचे आगमन आणि त्यांनी आकर्षित करून घेतलेले गुंतवणूकदार यामुळे नेहमीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या दलालांचे उत्पन्न घटले असून बाजारात टिकून राहण्यासाठी अनेक युक्त्या त्यांना योजाव्या लागत आहेत. मग याला पूरक व्यवसाय म्हणून म्युच्युअल फंड एजन्सी, विमा एजंट, यूलीप योजना विक्री, पेन्शन योजना विक्री असा पूरक व्यवसाय त्यांनी चालू केला आहे. यातून मिळणारे उत्पन्न मर्यादित आहे. याहून अधिक उत्पन्न मिळावे यासाठी प्रोट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम यांचा आधार घेतला जात आहे. यातून मिळू शकणारा फायदा हा अधिक असल्याने अनेकांना त्याचा आधार आहे. 

संपत्ति निर्माणाचा राजमार्ग: एसआयपी

Reading Time: 4 minutesजागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. आपण बँकांच्या मुदतठेवी, बँक व पोस्टल आरडी, विमा या पारंपरिक बचतीला आर्थिक ज्ञान नसल्याने गुंतवणूक समजतो. अशा प्रकारची गुंतवणूक महागाई निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देऊ शकत नाहीत. म्हणूनच या बचत गुंतवणुकीत परावर्तित केल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल. आपण विमा पॉलिसीसाठी वीस वर्षे सहज देतो . मग असा कालावधी “म्युच्युअल फंड्स सही हैं..” साठी का देत नाही?

शेअर्स खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या समभागांचे विभाजन आणि एकत्रीकरण

Reading Time: 3 minutesशेअरबाजारात नोंदणी केलेल्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची संख्या ठरलेली असते त्याचा उल्लेख कंपनीच्या मसुद्यात (Articles of incorporation) केलेला असतो. ही संख्या त्या कंपनीच्या समभागांचे दर्शनीमूल्य (Face value) किती आहे यावर अवलंबून असते. समजा एखाद्या कंपनीचे भाग भांडवल १० कोटी रुपये असेल आणि ते रु. १०/- च्या एका भागात असेल, तर त्याच्या समभागांची संख्या १ कोटी होईल.

श्रीमंतीचा मार्ग – चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक

Reading Time: 3 minutesआपण गुंतवणूक आणि कष्ट करून पुढच्या पिढ्यांची सोय करायची असं आहे का? अजिबात नाही! यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वयाच्या २५ व्या वर्षी कमवायला लागलेल्या व्यक्तीलासुद्धा पुढची ३५ वर्षं गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. म्हणजे प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात ७ वेळा मुद्दल दुप्पट करण्याची संधी असते. एखादी रक्कम ७ वेळा दुप्पट झाली तर तिचं मूल्य किती होऊ शकतं? उत्तर आहे – तब्बल १२८ पट! यालाच म्हणतात ‘चक्रवाढीची जादू’ (Magic of Compounding).

गुंतवणूक – कला का शास्त्र?

Reading Time: 3 minutesखरंतर गेल्या १५ वर्षात आपल्याला माहितीचा प्रचंड स्त्रोत गवसला आहे. अगणित संकेतस्थळे, मोबाईल ॲप्स, कॅल्क्युलेटर्स, व्हिडीओज, दृक-श्राव्य जाहिराती, उरलेसुरले वर्तमानपत्रात येणारे लेख आणि या सगळ्यांमुळे आपल्या आजूबाजूस तयार झालेले मुक्त मोफत अर्थतज्ञ असा एवढा लवाजमा असतांना देखील समभाग निगडीत योजनांमधे गुंतवणूकदारांची संख्या वाढत नाहीये.

गृहकर्ज – लवकर परतफेड की गुंतवणूक?

Reading Time: 3 minutesआजकाल जवळजवळ प्रत्येक पगारदार कुटुंबात एक तरी गृहकर्ज चालू असते आणि थोड्या बहुत काळाने उत्पन्न वाढेल तसा त्यांना हमखास पडणारा प्रश्न म्हणजे गृहकर्जाची लवकर परतफेड करावी की जास्तीची रक्कम गुंतवणूकीसाठी वापरावी? या प्रश्नाला सर्वांना समान लागू होईल असे उत्तर अर्थातच नाहीये, पण या गोष्टीचा विचार कसा करावा, हे समजून घेतले म्हणजे आपले उत्तर आपल्याला शोधता येईल. एखाद्या आर्थिक सल्लागाराकडून आपली विचारांची दिशा योग्य आहे ना? हे मात्र तपासून घ्यायला विसरू नका. 

शेअरबाजारः DHFL चे महाभारत

Reading Time: 4 minutesगेल्या आठवड्यात म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकदारांना मोठाच धक्का बसला. आपल्या गुंतवणुकीचे मुल्य फक्त एका दिवसांत (०४ जुन २०१९) जेव्हा १०.. २०.. ३०%  आणि (काही दुर्दैवी लोकांनी) ५०% पेक्षा अधिक गमावल्याचे अनेकांना आढळले. आश्चर्याची बाब म्हणजे नुकसानीची ही त्सुनामी शेअर् बाजारांत थेट पैसे गुंतविणाऱ्या ‘ईक्विटी फंड्स’मध्ये नव्हती, तर एरवी सुरक्षित, बॅंकेच्या मुदतठेवी समकक्ष असल्याचे ‘भासवुन विकल्या गेलेल्या ‘गैर ईक्विटी’ योजनांमधे  होती. एका दिवसात झालेल्या नुकसानीची टक्केवारी दाखवणारी खालील आकडेवारी हे चित्र किती विदारक आहे हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’ कॅल्क्युलेटर

Reading Time: 3 minutesएसआयपी’चा मागील इतिहास पहिला तर इक्विटी म्युच्युअल फंडांनी ‘एसआयपी’ मधून खूप चांगला म्हणजे अगदी १५ ते १८ % किंवा कधी त्याहून जास्त परतावा दिला आहे. आपले करोडपती होण्याचे स्वप्न म्युच्युअल फंडाच्या ‘एसआयपी’मधून कसे साकारत येईल ते आपण पाहू. यासाठी आपण म्युच्युअल फंडाचा कंजर्वेटिव्ह १२% परतावा गृहीत धरू. बरेच आर्थिक सल्लागार आपल्या संकेत स्थळावर आपली गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’चे कॅल्क्युलेटर उपलब्ध करतात ज्यातून आपण आपल्या गुंतवणुकीतील पुढील काळातील वाढीचा अंदाज बांधू शकतो.

म्युच्युअल फंडाचा करमुक्त परतावा

Reading Time: 4 minutesगुंतवणूक करताना केवळ किती टॅक्स वाचतोय एवढेच बघणे पुरेसे नाही तर परताव्याच्या दृष्टीने देखील ती गुंतवणुक अधिकाधिक करसुलभ कशी असेल त्याचा प्रत्येकाने विचार करावा. त्याचंच अजून एक उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंडातील परताव्याचे पर्याय. लाभांश वितरणावरील टॅक्समुळे तो पर्याय कधीचा कालबाह्य झालाय, पण असंख्य गुंतवणूकदार अजूनही ‘टॅक्स-फ्री’ लाभांशाच्या मोहात पडलेले दिसून येतात.

शेअर बाजार सर्वोच्च पातळीच्या जवळ, पुढे काय?

Reading Time: 2 minutesगेल्या आठवडयात राष्ट्रीय शेअर बाजारच्या (NSE) निर्देशांकाने (निफ्टी) ११६१० ही खालची पातळी गाठली होती तर १२०३९ हा उच्चांक गाठला होता. गेल्या काही दिवसांच्या हालचालींचा विचार करता, इथून पुढे बाजार तेजीत जाईल अशी जास्त शक्यता आहे. सद्य परिस्थितीत तरी तेजी/मंदी वाल्यांना धोका असण्याचे संकेत नाही. पुढील आठवडा आणि येणाऱ्या काळासाठी बाजारात विक्रीचा जोर वाढला तर ११८०० ही पहिली पातळी महत्वाची ठरेल.