क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?: भाग २

Reading Time: 3 minutesआपल्या क्रेडीट कार्डचा सजग वापर करावा. कार्डचा वापर झाल्यावर आपल्या  पाकिटात कार्ड ठेवले गेले आहे का याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याचदा खर्च करताना लक्षात येते की आपले क्रेडिट कार्ड मागच्या वेळेस पेट्रोल पंप किंवा दुकानदाराला  दिल्यावर आपण परत घ्यायचे विसरलो म्हणून!

क्रेडिट कार्ड आणि सिबिल स्कोअर

Reading Time: 2 minutesकोणत्याही प्रकारचं कर्ज घेताना आपला सिबिल स्कोअर महत्त्वाचा असतो. हा स्कोअर आपल्या कोणत्याही एकाच व्यवहारावर ठरत नसतो. आपला सिबिल स्कोअर म्हणजे आपण सातत्याने करत आलेल्या सर्व आर्थिक उलाढालींचा एकत्रित परिणाम असतो. या स्कोअरवर कर्ज मंजूर वा नामंजूर होणे अवलंबून असते. हा स्कोअर खराब असल्यास आपण कर्ज घेण्यास पात्र ठरण्यासाठी तो सुधारायला साधारण ४ ते १२ महिने लागू शकतात.

गृहकर्ज – लवकर परतफेड की गुंतवणूक?

Reading Time: 3 minutesआजकाल जवळजवळ प्रत्येक पगारदार कुटुंबात एक तरी गृहकर्ज चालू असते आणि थोड्या बहुत काळाने उत्पन्न वाढेल तसा त्यांना हमखास पडणारा प्रश्न म्हणजे गृहकर्जाची लवकर परतफेड करावी की जास्तीची रक्कम गुंतवणूकीसाठी वापरावी? या प्रश्नाला सर्वांना समान लागू होईल असे उत्तर अर्थातच नाहीये, पण या गोष्टीचा विचार कसा करावा, हे समजून घेतले म्हणजे आपले उत्तर आपल्याला शोधता येईल. एखाद्या आर्थिक सल्लागाराकडून आपली विचारांची दिशा योग्य आहे ना? हे मात्र तपासून घ्यायला विसरू नका. 

क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?

Reading Time: 2 minutesक्रेडिट कार्ड म्हणजे काय ? क्रेडिट कार्ड कसे काम करते, वापराचे फायदे-तोटे काय आहेत हे सोप्या शब्दांत या लेखात जाणून घ्या.

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

Reading Time: 3 minutesसुरूवातीला क्रेडिट कार्ड हे वापरण्यास सरळ व सोपे वाटत असते. परंतु, क्रेडिट कार्डच्या वापरात अनेक छुपे खर्च लावण्यात आलेले असतात, ज्याची माहिती आपल्याला नसते.  क्रेडिट कार्डवर वेगवेगळ्या प्रकारचे कर व फी आकरली जात असते. जसे की, उशीर केलेले देय, क्रेडिट कार्ड घेतानाची फी, नुतनीकरणाची फी आणि प्रक्रिया शुल्क असे वेगवेगळे छुपे खर्च कार्डवर लावले जातात.

Mortgage Loan: तारण कर्ज – सुरक्षित कर्जाचा एक प्रकार

Reading Time: 3 minutesतारण कर्ज हे सुरक्षित कर्ज असून ते बँक, बिगर बँकिंग संस्था, सहकारी संस्था, सावकार यांच्याकडून व्यक्ती अथवा संस्था यांना देण्यात येते. सहसा हे कर्ज जमीन , घर खरेदी करण्यासाठी कमी पडणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी घेतले जाते. कर्ज घेणाऱ्याची मालमत्ता गहाण ठेवलेली असल्याने ते सुरक्षित असते. कर्जदार कराराने बांधला गेल्याने ठराविक मुदतीत ठरलेली रक्कम मुद्दल व त्यावरील व्याजासह समान मासिक हप्त्यात (Equated monthly installments) देण्याचे बंधन कर्जदारावर असते.

कर्जे स्वस्त होणार : रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्याची कपात

Reading Time: < 1 minuteरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज आपले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये, अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आता रेपो दर ६.२५ टक्के व रिव्हर्स रेपो दर ६ टक्के असणार आहे.

वैयक्तिक कर्जाची गरज आणि प्रक्रिया

Reading Time: 3 minutesकाही तातडीच्या अडचणींवर जसे की आजारपण, शिक्षण, लग्नाचा खर्च, घराचे नूतनीकरण, स्थावर मालमत्ता खरेदी, परदेश प्रवास इ अशा तात्कालीक  मोठया खर्चावर मात करण्यासाठी अशी कर्जे घेतली जातात. तर काही जण असे कर्ज सुलभतेने मिळते आहे असे समजल्यावर, ते मुद्दाम घेऊन आपल्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरतात.

नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग

Reading Time: 2 minutesतुम्ही जर मध्यम/उच्च मध्यमवर्गीय असाल आणि नुकतेच उच्चशिक्षण घेतले असेल किंवा घ्यायचा विचार असेल, लहानमोठ्या शहरात एखादे घर असेल, घरासमोर/खाली पार्किंग मध्ये एखादी गाडी असेल, इतकेच कशाला, अगदी एखादा महागडा लॅपटॉप किंवा इतर काही यांत्रिक उपकरण असेल तर या सगळ्या सुबत्तेच्या गुलाबाला कर्जाचे काटे नक्कीच असणार…प्रत्येक वेळी हातात येणाऱ्या प्रत्येक रुपयात त्या सगळ्या कर्जांची वजाबाकी नक्की होत असणार आणि कधी एकदा या कर्जफेडीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेन? या विवंचनेतच आलेला प्रत्येक दिवस जात असणार….तर आज आपण जाणून घेणार आहोत याच तुम्हा आम्हा सर्वांच्या विवंचनेला आटोक्यात आणण्याचे आणि कालांतराने त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे काही खात्रीशीर मार्ग :

पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १

Reading Time: 2 minutesआजच्या काळात कोणावर कुठलं संकट येईल सांगता येत नाही, त्यामुळे व्यक्तीला बरेचदा आर्थिक मदत हवी असते. त्यामुळे ‘पर्सनल लोन’ची अनेकांना गरज पडते. पर्सनल लोनसाठी बँकेकडे अर्ज करावा लागतो. पण तो अर्ज मान्य होण्यास काही अटींची पूर्तता होणे गरजेचे असतं. त्यात काही चुका निदर्शनास आल्यास वैयक्तिक कर्ज  नाकारले जाते. यामुळे वेळेवर अडचण निर्माण होऊ शकते. वैयक्तिक कर्ज नाकारले जाऊ नये म्हणून काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे.