श्रीमंत मी होणार!

Reading Time: 4 minutesगुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंत होणं ही वेळखाऊ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. त्यात जर आपल्याला काहीतरी थरार किंवा ‘एक्साईटमेन्ट’ची अपेक्षा असेल तर ती योग्य नाही. मात्र लवकर श्रीमंत व्हायची घाई प्रत्येकालाच झालेली असते. कधी एकदा जादूची कांडी फिरतेय आणि मी श्रीमंत होतो असे झालेले असते. मात्र महामार्गांवर जागोजागी लावलेली ‘अति घाई, संकटात नेई’ सूचना इथेही लागू होते. आपल्या आर्थिक उन्नतीच्या स्वप्नाला फुंकर घालून, भुलवून, परताव्याविषयी अवास्तव, फसवी आश्वासने देऊन आपल्याला अजूनच नुकसानीत घालणाऱ्या गुंतवणूक योजनांची या जगात काही कमतरता नाही. मल्टी-लेव्हल मार्केटींग किंवा पिरॅमिड योजना या त्यातल्या प्रमुख योजना.

भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा

Reading Time: 3 minutesभांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत. या बाबतीत अनेक प्रकारे प्रबोधन होत असूनही एक क्षण असा येतो की व्यक्तिला मोह होतो आणि ती फसते. फसवे दावे करण्यास कायदेशीररित्या बंदी असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा

Reading Time: 4 minutesएन्डोमेंट किंवा मनीबॅकसारख्या पारंपरिक आयुर्विमा पॉलिसी आपल्याला कधीच पुरेसं विमासंरक्षण देऊ शकत नाहीत. बहुतांश वेळा त्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करबचतीसाठी म्हणून विकल्या जातात. म्हणून या पॉलिसी गळ्यात बांधण्यासाठी जे दीर्घकालीन गुंतवणूक आणि आकर्षक परताव्याचं गाजर आपल्याला दाखवलं जातं, त्याचा परामर्श घेऊ.

आपलं आधार कार्ड सुरक्षित आहे का?

Reading Time: 2 minutesआधारकार्ड आणि सामान्य माणसाचा मुलभूत अधिकार यांच्या मध्ये दीर्घकाळ वाद सुरु होता. ‘राईट टू प्रायव्हसी (Right to privacy) मुलभूत अधिकार मानायचा तर आधारकार्डला आपली सर्व माहिती जोडणे बंधनकारक केले आहे. अशा वेळी, “सरकार आमची माहिती गोपनिय ठेवण्यास किती समर्थ आहे?” हा सामान्य प्रश्न लोकांकडून आला. आधारकार्ड संदर्भातली माहितीची गोपनीयता जशी सरकारची जबाबदारी आहे तशीच ती आपल्या प्रत्येकाचीही आहे.

सावधान : चक्क चंद्रावर कुणी जागा विकत घेऊ शकतो का ?

Reading Time: 2 minutesचक्क चंद्रावर जागा खरेदी करून देतो म्हणून पुणेकर महिलेची झालेली फसवणूक.

सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना

Reading Time: 2 minutesचायनीज हॅकर्सनी इटलीची सब्सिडीअरी कंपनी असलेल्या ‘टेक्निमोंट एसपीएच्या’ भारतीय यूनिटला १.८६ कोटी डॉलर्स (साधारणतः १३० कोटी रुपये) एवढया मोठ्या रकमेचा गंडा घातला आहे.

“एका घरावर एकदाच स्टॅम्प ड्युटी”च्या व्हायरल मेसेज मागचे सत्य

Reading Time: 3 minutes“जुने घर विकताना आता स्टॅम्प ड्युटी लागू होणार नाही. एका घरावर एकदाच स्टॅम्प ड्युटी”  अशा हेडलाईन दिसल्यावर त्यामध्ये लिहिलेली बातमी व्यवस्थित वाचून त्याचा अर्थ समजून न घेता अनेकांनी, “जुन्या घराची विक्री स्टॅम्प ड्युटी फ्री करता येणार” असा गैरसमज करून घेतला. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे.

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

Reading Time: 2 minutesलोकांना वेगळ्या नंबरहुन फोन येतो, खात्याच्या संबंधित महत्वाची माहिती मागितली जाते. कधी घाबरवलं जातं, कधी धमकी दिली जाते. कधी अत्यंत चांगल्या व्यावसायिक (Professional) भाषेत बोलून खात्याची महत्वाची माहिती मिळवली जाते. यांत सर्वसामान्य लोक फसतात. यामुळे लोकांना जागरूक करण्यासाठी हा लेख प्रपंच.

रिफंडची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आलाय? सावधान

Reading Time: 2 minutes“Salary Credited to Your Account No. xxxxxx .” हा मेसेज सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा आणि आनंद देणारा मेसेज आहे. असाच एक मेसेज सध्या व्हाट्स ऍपवर फिरतो आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून येणारा ‘रिटर्न अमाऊंट क्रेडीटेडचा मेसेज’! दुर्दैवाने ‘सॅलरी क्रेडीटेड’च्या मेसेजप्रमाणे हा मेसेज आनंद देणारा नाही.  इन्कम टॅक्स डिपार्टकडून अशा प्रकारचे कोणतेही मेसेज नागरिकांना पाठविण्यात आलेले  नसून अशा प्रकारच्या मेसेजेसच्या बाबतीत नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

विमा ग्राहकाची फसवणूक: आपण काय काळजी घ्याल?

Reading Time: 3 minutesपॉलिसीधारकाच्या परवानगीशिवाय त्याच्या पाच पॉलिसी बंद करून त्याच्या नावे दोन नवीन पॉलिसी परस्पर उघडून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.