केंद्र सरकारने आजपर्यंत ८१ लाख आधार कार्ड निष्क्रिय केले असल्याची घोषणा राज्यसभेत इलेक्ट्रॉनिक्स व आयटी राज्यमंत्री पीपी चौधरी यांनी केली. तथापि, ‘यूआयडीएआय’च्या सर्वोच्च अधिकाऱ्यांकडे आधार निष्क्रियतेचा वर्षानुसार, राज्यवार आणि तर्कवार डेटा उपलब्ध नाही. या आधार निष्क्रिय प्रक्रियेत तुमचंही आधार निष्क्रिय होऊ शकतं! आधार निष्क्रिय का होते? ते कसे तपासावे? तुमचं आधार कार्ड निष्क्रिय झालंय का? ते पुन्हा सक्रीय करता येते का? ते कसे करावे? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे या लेखात मिळतील.
आधार निष्क्रिय होण्याची कारणे:-
आधार बऱ्याच कारणांसाठी निष्क्रिय करण्यात येते. आधार लाईफ सायकल व्यवस्थापन (ALCM) मार्गदर्शक यांच्या कलम २७ आणि कलम २८ मध्ये या कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या मार्गदर्शक तत्वांनुसार, प्रादेशिक यूआयडीएआय प्राधिकरणाद्वारे खालील कारणांसाठी एखाद्या व्यक्तीचे आधार निष्क्रिय केला जाऊ शकते:
- समान सांख्यिकीय आणि बायोमेट्रिक तपशील असलेले एकाधिक आधार आढळल्यास, तसे सर्व आधार क्रमांक निष्क्रिय केले जाण्याची शक्यता आहे.
- ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत. पण ५ वर्ष पूर्ण झालेल्या मुलाचा बायोमेट्रिक डेटा २ वर्षांच्या आत सादर करावा. असे झाले नाही तर, त्या मुलाचे आधार प्रादेशिक प्राधिकरणाद्वारे निष्क्रिय केले जाते.
- याचप्रमाणे आधार कार्डधारक १५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना १५ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांचे अंतिम बॉयोमेट्रिक डेटा सादर करावे लागतो. हा डेटा 2 वर्षात सादर करावा लागतो अन्यथा असे आधार निष्क्रिय केले जाते.
- सलग तीन वर्षांपर्यंत आधारचा वापर न केल्यास आपले आधार निष्क्रिय होऊ शकते.
- जर आपला आधार क्रमांक कोणत्याही बँक खात्याशी किंवा पॅनशी जोडला गेला नाही किंवा ईपीएफओ अथवा पेन्शनसाठी अशा व्यवहारासाठी आधार तपशील वापरला गेला नाही तर आपले आधार निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.
- नावनोंदणीच्या वेळी नवीन छायाचित्र घेण्याऐवजी व्यक्तीकडे आधीपासूनच उपलब्ध असलेले छायाचित्र वापरल्यास त्या व्यक्तीचे आधार निष्क्रिय होऊ शकते.
- आधार कार्ड बनवताना अवैध कागदपत्रांचा वापर केला गेला आहे असे आढळ्या नंतर ताबडतोब वैध कागद पत्रांसोबत आपले आधार अद्ययावत करावे असे न केल्यास, ते आधार निष्क्रिय केले जाऊ शकते.
- जर व्यक्तीच्या आधार कार्ड मध्ये एकाहून अधिक नाव ‘उर्फ’ किंवा ‘alias’ चा वापर केला गेला असेल तर असे आधार कार्ड देखील निष्क्रिय होऊ शकते.
आपले आधार सक्रिय आहे की नाही हे कसे तपासावे?
आधार सक्रिय आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी यूआयडीएआयने लोकांना एक सोपा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. आपले आधार सक्रीय आहे की नाही हे घरबसल्या यूआयडीएआयच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तपासले जाऊ शकते.
१. https://www.uidai.gov.in/ या यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. उजव्या कोपऱ्यात भाषा निवडीसाठीचा पर्याय उपलब्ध आहे. त्यानुसार आपली भाषा निवडा.
३. माझा आधार – आधार सेवा – आधार क्रमांक सत्यापित करा वर क्लिक करा.(For English – My Aadhaar – Aadhaar Services – Verify an Aadhaar number)
४. यानंतर आधार सत्यापन (verification) पेज ओपन होईल. या पानावर तुम्हाला १२ अंकी आधार क्रमांका आणि सुरक्षा कोड विचारला जाईल, तो भरून “सत्यापित” बटणावर क्लिक करा. किंवा Https://resident.uidai.gov.in/adhaververification या लिंकद्वारे तुम्ही थेट विभागाकडे देखील जाऊ शकता.
५. जर आपला आधार सक्रिय असेल तर “आधार सत्यापन पूर्णत्व” असे एक पेज दाखवले जाईल. या पानावर आपला आधार क्रमांक तर असेलंच त्याचबरोबरइतर तपशील जसे की आपले वय बॅंड, लिंग, राज्य आणि मोबाइल नंबर इ. चा उल्लेख केला गेला असेल.
आपला आधार निष्क्रिय असल्यास काय करावे?
- जर आपला आधार निष्क्रिय आहे असे समजल्यास जवळच्या आधार नोदणी केंद्राला भेट द्या.
- आपल्याला आधार अपडेशन फॉर्म भरावा लागेल. येथे आपले बॉयोमीट्रिक्स पुन्हा तपासले आणि अद्ययावत केले जातील. अद्यतनासाठी या केंद्रावर 25 रुपये फी देखील भरावी लागेल. या प्रक्रियेदरम्यान वैध मोबाइल नंबर देणे अत्यंत आवश्यक आहे.
- आधार सक्रिय करण्याच्या या प्रक्रियेत आपले बॉयोमीट्रिक्स तपशील यूआयडीएआय डेटाबेसमध्ये पुन्हा तपासून आवश्यकता असल्यास नवीन तपशील द्यावे लागू शकतात, म्हणून आपल्याला नोंदणी केंद्रावर वैयक्तिक भेट देणे आवश्यक आहे.
- ही प्रक्रिया ऑनलाइन किंवा पोस्ट सेवेद्वारे केले जाऊ शकत नाही. त्यासाठी व्यक्तीने स्वतः नोंदणी केंद्रात जाऊन प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे.
- आधार नोंदणी केंद्रातील अधिकारी तुमच्या आधार क्रमांकाबरोबर नवीन बॉयोमेट्रिक्स आपल्या पूर्वीच्या बायोमेट्रिक्सशी जुळत आहे का? हे तपासतील आणि जेव्हा हे दोन सेट जुळतील, तेव्हाच आपले आधार अद्ययावत केले जाऊन ते पुन्हा सक्रीय केले जाईल.
आपल्या आधार कार्डचा गैरवापर कसा शोधाल? , आपलं आधार कार्ड सुरक्षित आहे का?,
आधार बरोबर पॅन लिंक करणे अनिवार्य !, प्लॅस्टिक आधार कार्ड अधिकृत नाही
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |