म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ९
नमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंड योजनेची मांडणी”.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग ३
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४
-
म्युच्युअल फंडाच्या योजनेचे दोन प्रकार असतात खुली योजना /ओपन एंडेड आणि बंद योजना / क्लोज्ड एंडेड.
- ओपन एंडेड योजनेमध्ये कधीही गुंतवणूक करता येते. ज्या दिवशी आपण गुंतवणूक करतो त्या दिवसाच्या एनएव्ही (NAV) प्रमाणे आपल्याला युनिट्स मिळतात.
- त्यानंतर आपण त्या फंडामध्ये कधीही वाढीव गुंतवणूक करू शकतो किंवा आपण थोडे थोडे पैसे काढूही शकतो.
- क्लोज्ड एंडेड फंड फक्त ठरविक काळासाठी एनएफओ (NFO) उपलब्ध करतात व जे गुंतवणूकदार त्या ‘एनएफओ’च्या काळात गुंतवणूक करतात त्यांनाच फक्त त्या योजनेचा फायदा मिळतो. यात सर्व गुंतवणूकदारांना रु.१० रुपये दर्शनी मूल्याप्रमाणे युनिट्स मिळतात.
- क्लोज्ड एंडेड फंड हे ठराविक मुदतीचे असतात. जसे ३ वर्षे किंवा ५ वर्षे किंवा कधी त्याहून जास्त. क्लोज्ड एंडेड फंडच्या गुंतवणूकदारांना पैसे काढण्यासाठी दुसरा गुंतवणूकदार शोधावा लागतो म्युच्युअल फंडाकडून मुदतपूर्ती पूर्वी त्यांना काढता येत नाहीत. मात्र मुदतपूर्ती नंतर बाजार मूल्य म्युच्युअल फंडाकडून परस्पर मिळते.
- म्युच्युअल फंडामध्ये दोन पर्याय असतात. डायरेक्ट प्लॅन किंवा रेग्यूलर प्लॅन.
- डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूकदार स्वतः थेट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो.
- रेग्यूलर प्लॅनमध्ये गुंतवणूक ही म्युच्युअल फंडच्या वितरकाच्या मार्फत होते.
- योजनेमध्ये गुंतवणूकदारांसाठी मुख्यत्वे दोन गुणवतूक पर्याय असतात. भांडवल वृद्धी (Growth Option) आणि लाभांश पर्याय (Dividend Option).
- भांडवल वृद्धी मध्ये ‘एनएव्ही’ची वाढ होत राहते, तर लाभांश पर्यायात, लाभांश दिल्यावर साधारण लाभांशच्या रकमे एनएव्ही (NAV) खाली येते.
- काही वेळा आणखी एक पर्याय असतो, तो म्हणजे लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment) ह्यात लाभांशाची जी रक्कम आहे ती पुन्हा योजनेमध्ये गुंतवून त्याचे युनिट्स गुंतवणूकदाराला दिले जातात. गुंतवणूकदारांनी आपल्या पुढील गरजेनुसार योग्य त्या पर्यायाची निवड केली पाहिजे.
- सेबीच्या नियमानुसार म्युच्युअल फंडाला योजनेमध्ये जोडल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर प्रवेश शुल्क (Entry Load) लावता येत नाही. परंतु बरेच फंड ठराविक काळाकरीता बाहेर पडू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना काही शुल्क (Exit Load) आकारू शकतात.
- ठराविक काळापूर्वी गुंतवणूकदाराने समजा गुंतवणूक तोडली, तर एक्सिट लोड त्याच्या एनएव्ही (NAV) मधून कमी होतो. हे म्हणजे मुदतीपूर्वी बँकेची एफडी तोडली, तर लागणाऱ्या शुल्क सारखे असते.
म्युच्युअल फंड च्या ह्या लवचिक रचनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकदाराला सामावून घेण्याची क्षमता आहे.
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ५
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ७
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ८
म्युच्युअल फंड सही है l
धन्यवाद!
–निलेश तावडे
9324543832
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/