Reading Time: 5 minutes

भारत हा प्रगतिशील देश आहे.भारतात प्रतिभावान अशी तरुण पिढी आहे,ज्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवायचे आहे.स्वतःच्या पायावर उभे राहून आदर्श निर्माण करायचा आहे.कदाचित म्हणूनच आजकाल बरेच जण चाकरगिरी न करता स्वतःच्या हिमतीवर नवीन नवीन प्रयोग करताना दिसतात.

“बिसनेस इज नॉट माय कप ऑफ टी” आधी असे म्हणणारे आजकल धोका पत्करायला मागे पुढे पाहत नाही.हीच आपल्या भारतातील तरूण पिढी ची ताकद आहे.

कोविड नंतर बऱ्याच जणांच्या नोकरी गेल्या, त्यानंतर अनेकांनी सावरून व्यवसाय सुरु केले आणि त्यातुन काही उत्तम उदाहरण ही समोर आले.बऱ्याच जणांना व्यवसाय करायचा असतो पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाही.आज आपण या लेखातून छोटीशी मदत यानिमीत्ताने करणार आहोत,व्यवसायाच्या काही वाटा शोधणार आहोत. 

1. डिजिटल मार्केटिंग :

तुमचं उत्पादन किती ही चांगल असो ते लोकापर्यंत पोहोचलं नाही तर तुमचा व्यवसाय वाढणार कसा? एखाद्या दुकानात जाऊन किती जण उत्पादन विकत घेणार? मात्र तेच तुम्ही तुमची कक्षा वाढवून अजून 50-60 हजार लोकांपर्यंत गेलात तर ते तुमच्या साठी फायद्याचं च आहे. हे काम केलं जात डिजिटल मार्केटिंग मध्ये! 

तुमचं उत्पादन हजारो लोकापर्यंत आकर्षक पद्धतीने मांडलं तर ते विकायला नक्की सोपं जाईल.त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मधील मार्केटिंग ची कला बाहेर आणलीत आणि सध्याच्या इंटरनेट- कॉप्युटर चा वापर केला तर तुम्ही घर बसल्या हा व्यवसाय करू शकता. तेही कुठलीही गुंतवणूक न करता!

 2. शिकवणी

सध्याच्या व्यस्त जीवन पद्धतीत सर्वाकडे पैसे आहे पण वेळ नाही! आई -वडील जॉब करणारे असल्यामुळे मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे वाटत असूनही वेळ देणे शक्य होत नाही.अशा पालकाच्या मुलांसाठी तुम्ही शिकवणी देऊ शकता,आजकाल ऑनलाईन पद्धत सर्रासपणे वापरली जाते,आपल्या आवाक्यातील परिसरामध्ये जाऊन मुलांच्या घरी शिकवणी देऊ शकता.

हे पण वाचा : Job or Business: नोकरी करू की व्यवसाय?

3. खाद्य पदार्थांच्या ऑर्डर घेणे:

स्वतःच्या घरातूनच तुम्ही खाद्य पदरच्या ऑर्डर घेऊ शकता, यात अगदी रोजच्या जेवणाच्या पोळी भाजी पासून सुरवात करू शकता. फक्त घडीच्या पोळ्या बनवून देऊ शकता. आजकाल घरी बनवलेले केक याला खूप मागणी आहे,विविध कार्यक्रमांना केक ची ऑर्डर हमखास असते. 

छोट्या मेजवानी साठी पाव-भाजी,मिसळ,भेळ,पुरी भाजी असे अनेक पदार्थ बनवून देऊ शकता.

या मध्ये तुमच्या हातची चव च तुम्हाला ग्राहक जोडायला मदत करते. माऊथ पब्लिसिटी द्वारे अनेक लोक पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. 

4. विविध प्रकारचे आर्ट क्लास

तुमच्या मध्ये कुठले कलागुण असतील तर त्याच्याकडे तुम्ही व्यवसायाचा भाग म्हणून नक्कीच बघू शकता. 

  • चित्रकला 
  • वारली पेंटिंग,ग्लास पेंटिंग,फॅब्रिक पेंटिंग
  • रांगोळी
  • कागदी आणि इतर कलात्मक गोष्टी बनवणे
  • मेहेंदी
  • सॉफ्ट टॉय बनवणे
  • एम्ब्रॉडरी
  • शिवणकाम 
  • संगीत 
  • नृत्यकला 
  • वादन कला 
  • योगा 

याव्यतिरिक्त बऱ्याच कलागुणांचा उपयोग तुम्ही नियमित उत्पन्नाचे साधन म्हणून करू शकता. 

5. कन्टेन्ट रायटर/ब्लॉग रायटींग  : 

तुमचं कुठल्याही एका प्रादेशिक भाषेवर प्रभुत्व असेल, तुम्ही तुमचे विचार उत्तम पणे मांडू शकत असाल. तुम्हाला अवांतर वाचन लिखाणाची आवड असेल तर नक्कीच तुम्ही कन्टेन्ट रायटर किंवा ब्लॉग रायटर  म्हणून काम करू शकता.यात तुम्हाला तुमचे मत,विचार सोप्या भाषेत लोकापर्यंत पोहोचावे यासाठी लिहायचे असते. आजकाल सर्वांच्या घरी कॉम्पुटर आणि वायफाय असते ,याचा उपयोग तुम्ही फुल्ल टाईम करिअर म्हणून करू शकता. 

6. डे केअर सर्विस : 

आजकल अगदी लहान म्हणजे 1 वर्षाच्या बाळाना देखील दिवसभर सांभाळणे यासाठी डे केअर सर्विस तुम्ही देऊ शकता.10-12 वयापर्यंत मुलांना सांभाळू शकता. आठवड्याचे 7 दिवस किंवा केवळ शनिवार-रविवार मुलांचे संगोपन करण्याची सुविधा तुम्ही देऊ शकता तेही अगदी तुमच्या राहत्या घरातून!

7. रिअल इस्टेट

फेसबुक व्हाट्सअप या सोशल मीडियामुळे बऱ्याच लोकांच्या एकमेकांशी ओळखी असतात. तुमचा मित्रपरिवार खूप मोठा असेल आणि तुमच्यात बोलण्याचे कौशल्य असेल तर लोकांच्या गरजेप्रमाणे तुम्ही घर विकत किंवा भाडेतत्त्वावर देणे घेणे म्हणजेच रियल इस्टेट चा व्यवसाय सुरू करू शकतात.सुरुवात  तुमच्या राहत्या परिसरात पासून केली तरी  हळूहळू यात कौशल्य येऊन तुम्ही हा व्यवसाय वाढवू शकता. सुरुवातीला तुम्हाला कुठल्याही भांडवलाची गरज यासाठी लागणार नाही.  

8. ब्युटी पार्लर

महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ब्युटी पार्लर.आपल्या घराजवळ एक तरी ब्युटी पार्लर असावे असे  प्रत्येक महिलेला वाटते.ब्युटी पार्लर साठी तुम्हाला प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.यात आवड असेल तर तुम्ही थोड्याशा भांडवलात स्वतःच्या घरी पार्लर उघडू शकता. आज काय बरेच जण होम सर्विस देतात त्यामुळे कमी भांडवलात देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

9. पुष्प सजावट

आजकाल प्रत्येक समारंभासाठी जेवढा खर्च कपडे, दागिने, खाणे-पिणे यावर होते तेवढाच खर्च हॉलच्या सजावटीसाठी होतो.त्यामुळे पुष्प सजावट हा देखील व्यवसायाचा चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्ही छोट्याशा बुके पासून सुरुवात करून वाढदिवस, बारसे असे घरगुती सजावटीचे पर्याय उपलब्ध करून देऊ शकता.  मुंज, लग्न ,वास्तुशांती ,फेअरवेल पार्टी अश्या अनेक ठिकाणी तुम्ही तुमची पुष्प सजावटीची ची कला दाखवून व्यवसाय करू शकता.

 10. फोटोग्राफी

तुम्हाला जर फोटो काढण्याची आवड असेल तर फोटोग्राफी हा एक सुंदर पर्याय व्यवसायासाठी तुम्ही निवडू शकता.समारंभ छोटा असो वा मोठा,प्रत्येक जण समारंभाची छोट्यातील छोटी आठवण  कायमस्वरूपी लक्षात राहावी यासाठी फोटोग्राफीची निवड नक्कीच करतो. 

फोटोग्राफी मध्ये देखील नेचर,बर्ड,वाईल्ड फोटोग्राफी असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.स्पर्धेमध्ये भाग घेऊन तुम्ही प्रदर्शन देखील भरू शकता. 

11. ऑनलाईन बिझनेस

सोशल मीडियाचा वापर करून ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक न करता  दागिने, कपडे, भेटवस्तू, खाण्याचे पदार्थ या सर्व गोष्टी विकू शकता. तुमचा मित्र परिवार मोठा असेल आणि तुम्ही विकत असलेल्या वस्तूंचा दर्जा चांगला असेल तर तुम्हाला चांगल्या ऑर्डर्स मिळू शकतात.

महत्वाचे :  बिझनेस आयडिया ज्या कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देतील !

12. वेबसाईट बनविणे

आजकाल स्वतःचे प्रॉडक्ट जगभर पोहोचण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक स्वतःची वेबसाईट तयार करून घेतो.तुम्ही कॉप्युटर क्षेत्रातील असाल तर आकर्षक वेबसाईट बनवून देणे, कमीत कमी पैशात जास्तीत जास्त सुविधा देणे,वार्षिक देखभालीची सुविधा देणे  या गोष्टी  करू शकता. या व्यवसायात तुम्ही अनेक ग्राहक जोडू शकतात.यामध्ये तुम्हाला विशेष भांडवलाची गरज लागत नाही. मात्र  व्यावसायिक म्हणून वावरताना स्वतःचे छोटे का होईना ऑफिस असणे म्हणजे तुमच्या प्रगतीसाठी ते उत्तमच!

13. शेअर मार्केट क्लासेस

आजकाल बरेच लहान मोठे वयाचे व्यक्ती शेअर्समध्ये ट्रेडिंग करताना दिसून येतात.तुम्हाला जर शेअर मार्केट बद्दल आवड आणि ज्ञान असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे क्लासेस घेऊ शकता.

14. म्युच्युअल फंड सल्लागार:

गुंतवणूक क्षेत्र यामध्ये तुमचा हातखंड असेल तर तुम्ही नक्कीच म्युच्युअल फंड सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू करू शकता.कुठे गुंतवणूक करावी, कुठे गुंतवणूक केल्यास लवकरात लवकर परतावा मिळेल या सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट होतात. 

15. फॅशन डिझायनिंग किंवा स्वतःचे बुटीक:

तुम्हाला नवनवीन येणाऱ्या कपड्यांच्या फॅशन बद्दल जाण असेल. तुम्हाला कपड्यांबद्दल माहिती असेल. कपड्यांचे वेगवेगळ्या प्रिंट्स,कपड्याचे सूत,रंगसंगती  याचे ज्ञान असेल तर  तुम्ही स्वतःची बुटीक टाकू शकता.वेगवेगळ्या डिझाईनचे कपडे तयार करून बाजारात विकू शकता.स्वतःच्या कौशल्यावर आधारित हा व्यवसाय तुम्ही निवडू शकता.

16. गृहसजावट

घराच्या सजावटीला ही आजकाल बरीच मागणी आहे. घरामध्ये  फर्निचरची योजना कशी असावी, घरातील भिंतींचा रंग,पडद्यांचा रंग कसा असावा,कुठली गोष्ट कुठे असावी आणि नसावी या सर्व गोष्टी गृह सजावटी अंतर्गत येतात.अर्थात यासाठी तुम्हाला याचे शिक्षण घेतलेले असावे.

17. मागणीप्रमाणे भेटवस्तू तयार करून देणे

बऱ्याच जणांना वेगळेपण व नवीन असे काहीतरी भेटवस्तू देण्यात रस असतो. तुमच्यामध्ये नाविन्यता आणि वेगळेपण यांना एकसंध करून नवीन भेटवस्तू बनवण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही याचा व्यवसाय म्हणून विचार करू शकता.यामध्ये वस्तूवर, कपड्यांवर ग्राहकाचे नाव असावे अशी बऱ्याच वेळा मागणी असते. तुमच्यामध्ये जेवढी अधिक सर्जनशीलता असेल ,तेवढ तुमच्या व्यवसायाला तुम्ही मोठे करू शकता. 

18. आर्टिस्ट :

तुमच्यामध्ये मेहंदी, मेकअप, केशभूषा, वेशभूषा  यापैकी कुठलीही कला अवगत असेल तर तुम्ही समारंभाप्रमाणे ऑर्डर घेऊ शकता.यामध्ये देखील तुम्हाला विशेष अशी भांडवलाची आवश्यकता लागत नाही. 

 

19. पापड-लोणची,मसाले पॅकेज फूड व्यवसाय:

दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले,पापड लोणचे, वाळवणाचे पदार्थ अशा अनेक गोष्टी ग्राहकांना कायम हव्या असतात.त्यामुळे अशा पॅक असलेल्या वस्तूंच्या व्यवसायाचा नक्कीच विचार करू शकता.

20. आहारतज्ज्ञ

तुम्ही जर आहार विषयी शिक्षण घेतले असेल तर तुम्ही नक्कीच आहार तज्ञ म्हणून व्यवसाय सुरू करू शकता.यात मधुमेह,लहान मुले, तरुण स्त्रिया, जेष्ठ नागरिक,गर्भवती स्त्रिया या सर्वांसाठी विशेष आहार कसा असावा याचा अभ्यास करून डायट प्लान बनवू शकता.डायट प्लान चे महत्व आजच्या काळात किती आवश्यक आहे हे समजून सांगणं ही तितकेच महत्वाचे आहे.

याशिवाय आजकाल असे कुठलेच क्षेत्र राहिले नाही जिथे नवीन नवीन गोष्टी जगासमोर येत आहे.लोक स्वतः मधील कौशल्य सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्षानुवर्ष एकच वाट धरायची आणि त्यावर चालत राहायचं हे आता हळूहळू बदलू लागले आहे.नवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutes आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.