गुंतवणुकीमधला राम
https://bit.ly/3jqEtxk
Reading Time: 3 minutes

मी ‘रावण’ असतो तर?

गुंतवणुकीमधला ‘राम’

गुंतवणुकीमधला राम आणि रावण समजून घ्यायचा तर आपल्या वर्तनाचा अभ्यास करायला हवा. कारण गुंतवणुकीमध्ये ‘राम’ हवा असेल तर, आपल्यातल्या रावणाचे दहन करणे आवश्यक आहे. रामायण, हा खरंतर पौराणिक ग्रंथ नसून वाल्मिकी ऋषींनी जीवन जगण्याचे विविध कांगोरे विषद करणारा दिलेला महान ठेवा आहे. पण दुर्दैवाने आपण या महान ग्रंथाला श्रद्धास्थानी ठेवून पूजन करणे एवढेच इतिकर्तव्य समजत आलो आहोत. रामायण ज्या विभूतींवर चितारलेले आहे त्या “व्यक्ती” नसून “वृत्ती” आहेत. ज्यांचा वावर आपल्यात देखील कायम असल्याचा अनुभव येत असतो. मनुष्य हा भावनाशील प्राणी आहे. कारण त्याला विचार करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. विचार – भावना – निर्णय यांच्या साखळीची शेवटची कडी म्हणजे कृती असते. रामाने केली तशी कृती रावणाने देखील केली, फरक मात्र दोघांच्या उद्देशांचा होता.

हे नक्की वाचा: नवरात्र विशेष: आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय? 

नवरात्र विशेष लेख क्र. २: आर्थिक नुकसानाचा ‘फोबिया’

गुंतवणुकीमधला ‘राम’ विरुद्ध ‘रावण’

  • आर्थिक निर्णय घेतांना प्रत्येकाला रामराज्यात वास्तव्य करण्याची इच्छा असते. पण रामाने स्विकार केलेला १४ वर्षांचा वनवास विसरून
  • समजा रामाच्या काळी सध्या उपलब्ध आहेत तशी उपयोजनं (Apps) असती, तर आपण जसे दररोज गुंतवणूकीवर किती परतावा मिळाला, हे पाहत असतो तसे रामाने किती दिवस शिल्लक राहिले आहेत पडताळून पहिले असते का?
  • रावणाने कपटाने सीतेचं हरण केलं म्हणून उद्विग्न होऊन लंकेवर आक्रमण करायचे ठरवले असते, तर रामाने तसे केले असते का?
  • रामाने स्थितप्रज्ञ होऊन वायूपुत्र हनुमानाला परिस्थितीचा आढावा घेण्यास पाठविले. कारण समुद्र ओलांडण्यासाठी साकव किंवा वायू वाहनाची (विमान) आवश्यकता होती.

या दोन्ही गोष्टी रामाकडे उपलब्ध नव्हत्या पण त्या गुणवत्तेचा विश्वासू साथीदार होता. अचानक बाजार अल्पकालावधीकरिता कोसळल्यावर आपण काय करतो?

नवरात्र विशेष लेख क्र. ३:  आर्थिक शिस्त लावणारी “काह-केह-बोह” 

नवरात्र विशेष लेख क्र. ४: मी श्रीमंत कसा होऊ? 

रावण -नकारात्मक भावनांचा अधिपती 

  • रावणाच्या दशानन अवताराबाबत वेगवेगळी आख्यायिका सांगितली जाते.
  • रावण अतिशय कुशाग्र बुद्धीचा वेदांचा उपासक व कवी मनाचा राजा होता.
  • त्याचा दशावतार ४ वेद व ६ शास्त्रांचा मिलाफ होता. परंतु पराक्रम गाजवण्याच्या हव्यासापोटी बेभान झालेल्या रावणाचे १० मुख म्हणजे मनुष्याच्या १० नकारात्मक भावना प्रतिबिंबित करतात, अशी पण एक आख्यायिका आहे. याच नकारात्मक भावना गुंतवणूकदाराच्या वर्तनात कुठल्या सकारात्मक सुधारणा घडवून आणू शकतील?
  • लंकाधिपती रावण खऱ्या अर्थाने “श्रीमंत” होता. हनुमानाने लंका जाळली तेव्हा दिवे ठेवण्यासाठी तयार केलेले खांब वितळून रस्त्यांवर सुवर्ण विखुरले होते. परंतु रावणाच्या “अहंकाराने” त्याला चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त केले.
  • याउलट रामाने आईने दिलेल्या शापास आशिर्वाद मानून वनवास पत्करण्याचे मान्य केले.
  • रावणाकडे सर्व काही विपुल प्रमाणात असून देखील “मोह” त्याला अशांत ठेवत होता, तर राम कंद-मुळं खाऊन देखील शांत होता.
  • प्रचंड “हव्यास” असलेला रावण बहुभार्या असलेला कलंकित राजा म्हणवला जातो, तर राम संपूर्ण आयुष्यभर एकपत्नीक राहिला ज्यामुळे त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून मान मिळतो.
  • कुबेराचा भाऊ असलेल्या रावणाला आयुष्याच्या उत्तरार्धात “पश्चात्ताप” करण्याची वेळ आली, तर वनवासी रामाला आयोध्येचा राजा म्हणून गादी मिळाली.
  • सुशासन करण्याऐवजी कुशासन करण्याच्या वृत्तीमुळे रावण नेहमीच “क्रोधीत” असायचा, तर स्वतःत देवत्व असून देखील विनम्रपणे सर्वांशी वागणारा राम समाधानी होता.
  • इतरांबद्दल कायमच “घृणा” बाळगणारा रावण गर्विष्ठ होता, तर आपल्या सहकाऱ्यांचा यथोचित मानसन्मान राखणाऱ्या रामाचा सर्वांना अभिमान होता.
  • माझ्यापासून माझे काही हिरावले तर नाही जाणार ना? या विवंचनेत असणारा रावण “भित्रा” होता, तर सर्वांच्या सहयोगाने राज्य कारभार चालविणारा आदर्श राजा राम होता.
  • कायम मनात “इर्षा” ठेवून व्यवहार करणारा रावण राव असून देखील रंक झाला, तर चांगल्या संघमित्रांच्या सहवासात राहून रामाने दिग्विजय मिळविला.
  • रावणाने “नशीब” आजमावण्यासाठी देवी देवतांची आराधना केली तर स्वकष्टाने राज्य उभारणारा राम आजही मंदिरात देव म्हणून पुजला जातो.
  • यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे हीच एक बाब आपल्या हाती असते. आर्थिकदृष्टया गुंतवणूकदार म्हणून सक्षम होण्यासाठी आपण पुढीलपैकी काय प्रयत्न करतो, याचा थोडक्यात उहापोह करण्याचा प्रयत्न करा.

नवरात्र विशेष लेख क्र. ५: पैशाचे व्यवस्थापन: खर्च आणि गुंतवणुकीचा ताळमेळ 

नवरात्र विशेष लेख क्र. ६:  Guaranteed Return: खात्रीशीर परताव्याचा अट्टाहास…

गुंतवणुकीमधला ‘राम’ आणि सक्षम गुंतवणूकदार 

१. तुम्ही काय वाचता?

माहितीच्या अतिरिक्त भडीमारामुळे संभ्रमावस्थेत राहण्यापेक्षा उपयुक्त ज्ञान संवर्धनाचा प्रयत्न करा.

२. काय टाळाल?

मोह. राष्ट्रीयीकृत बँकेची मुदत ठेव ६% वार्षिक व्याज देत असेल आणि कोणी वर्षभरात १२% परतावा मिळवून देणारी गुंतवणूक सुचवत असेल तर नक्कीच विचारपूर्वक निर्णय घ्या.

३. खर्चातून बचत कशी?

प्रत्येक वेळी काह-कि-बोह करा.

४. कृती करण्यापूर्वी काय?

आर्थिक निर्णय मग तो कोणताही असो खर्चाचा अगर गुंतवणूकीचा त्यातून काय साध्य करायचे आहे, हे स्वतःला स्पष्टपणे विचारा.

५. स्व-अध्याय कसा?

आपली आर्थिक क्षमता व जोखीम घेण्याची क्षमता तपासून मगच निर्णय घ्या. उगाचच गर्दीचा भाग बनू नका.

६. श्रीमंत कसे व्हाल?

श्रीमंतीला कुठलाही शॉर्ट कट नसतो.

७. गुंतवणूक कसली?

फक्त पैसे गुंतविले म्हणजे झालं असं कधीच नसतं. त्यासोबत वेळ घालविणे तितकेच महत्वाचे असते. 

पैसे जीवन जगण्यासाठी लागणारे सर्वंकष माध्यम आहे आणि संपत्ती जीवनमान उंचावण्याची शिदोरी आहे. 

नवरात्र विशेष लेख क्र. ७: DIY: गुंतवणूक कितपत फायद्याची?

नवरात्र विशेष लेख क्र. ८: आर्थिक नियोजनासाठी सल्लागाराची खरंच गरज असते का? 

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

अतुल प्रकाश कोतकर

94231 87598 

[email protected]

(लेखक म्युच्युअल फंड व विमा वितरक आहेत.)

टीम अर्थसाक्षरतर्फे सर्व वाचकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…