Financial Planning & Diwali
Reading Time: 2 minutes

Financial Planning & Diwali

आजच्या लेखात आपण दिवाळीमध्ये आर्थिक नियोजन (Financial Planning & Diwali) कसे करायचे याविषयी महत्वाची माहिती घेऊया.

“दिवाळी म्हणजे बोनस, दिवाळी म्हणजे खरेदी 

दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे  फटाक्यांची माळ” 

दिवाळी जवळ आली की वेध लागतात ते गुलाबी थंडीचे. दिवाळीच्या मंगलमय दिवसांमध्ये एक वेगळेच उत्साहाचे वातावरण असते. 

व्यापाऱ्यांसाठी लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्वाचा दिवस. एरवी अमावस्येला अशुभ मानलं जात असलं, तरी दिवाळीतील अमावस्येला येणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. अनेक जण या मुहूर्तावर जमा खर्चाची नोंद करण्यासाठी नवीन वही/फाईल/डायरी तयार करून त्याची पूजा करतात आणि नवीन आर्थिक नियोजनाची सुरवात करतात. अर्थात प्रत्येकाचे आर्थिक नियोजन दिवाळीलाच सुरू होते असं नाही. आर्थिक नियोजन करण्याची प्रत्येकाची पद्धत व वेळ ही वेगवेगळी असू शकते. 

काही जण नवीन वर्षांपासून म्हणजेच १ जानेवारीपासून आर्थिक नियोजन सुरु करतात, तर काही जण हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून, काही जण वाढदिवसाला आर्थिक नियोजनाची प्रतिज्ञा करतात, तर काही जण अजून एखादा शुभ दिवस निवडून आर्थिक नियोजनाचा संकल्प करतात. 

आर्थिक नियोजनाची वेळ जरी वेगळी असली तरी आपल्या आर्थिक नियोजनाचा आढावा घेण्यासाठी लक्ष्मीपूजनासारखा दुसरा शुभ दिवस कुठला असू शकेल?

हे नक्की वाचा: आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

Financial Planning & Diwali: दिवाळी आणि आर्थिक नियोजन 

१. नवीन आर्थिक संकल्प 

  • दिवाळीच्या खरेदीमध्ये बराचसा खिसा रिकामा झालेला असतो. पण मिळालेल्या बोनसमुळे खर्चाचा भार थोडा हलका होऊन काही प्रमाणात तरी दिलासा मिळालेला असतो. 
  • नातलगांच्या भेटीगाठी, सलग मिळालेली सुट्टी, फराळाची रेलचेल आणि फटाक्यांची आतिषबाजी यामुळे मनामध्ये कुठेतरी सकारात्मक विचारसरणी आकार घ्यायला लागलेली असते. अशामध्ये जर तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाचा संकल्प केलात, तर तो पूर्णत्वाला नेण्याची इच्छाशक्ती आपोआपच तुमच्या मनात जागृत होईल. 
  • त्यामुळे या दिवाळीला संकल्प करा नव्या आर्थिक नियोजनाचा ! शुभ कामासाठी कधीही उशीर झालेला नसतो. 

२. आर्थिक नियोजनाचा आढावा 

  • जर तुम्ही तुमचे आर्थिक  नियोजन आधीच सुरु केले असेल, तर या दिवाळीला ते कितपत यशस्वी झाले आहे याचा आढावा घ्या.
  • जर तुमचे आर्थिक नियोजन अगदी १००% नाही पण ६०% जरी यशस्वी झाले असेल तरी तुमचे अभनंदन!
  • जर तुमच्या आर्थिक नियोजनाला जेमेतेम पास होण्यासाठी आवश्यक असणारी ३५% टक्केवारीची गाठता आली नसेल, तरी हरकत नाही निराश होऊ नका. तुमच्या हातात जो काही वेळ उरला आहे. त्यामध्ये नियोजन यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. 
  • लक्षात ठेवा तुमच्या डोक्यातील हजार विचारांपेक्षा तुम्ही केलेली एक कृती लाखमोलाची असते. अनेक प्लॅन्स कागदावर उतरतात. पण प्रत्यक्षात मात्र ते चित्र बनूनच राहतात. 
  • “क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.” त्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन हे कागदावरील लेखाजोगा नको, तर त्याचे यशस्वी आचरणही तितकेच आवश्यक आहे. 

विशेष लेख: आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम

आर्थिक नियोजन यशस्वी करण्यासाठी महत्वाच्या टिप्स

सुयोग्य आर्थिक नियोजन करण्यासाठी  व ते यशस्वी करण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करा.

  • आपली सद्य आर्थिक स्थिती तपासणे.
  • आर्थिक उद्दीष्टे निश्चित करणे.
  • ध्येयपूर्तीचा कालावधी निश्चित करणे
  • दररोज नियोजनानुसार आपल्या उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद ठेवणे.  
  • नियोजन यशस्वी होण्यासाठी निश्चित अशी योजना तयार करणे आणि अंमलात आणणे
  • दर ३ महिन्यांनी अथवा तुमच्या सोयीनुसार वेळ निश्चित करून आपल्या नियोजनाचा आढावा घेणे. जर आपले नियोजन यशस्वी होताना आढळले, तर ध्येयपूर्ती लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
  • जर आर्थिक नियोजन अयशस्वी होतंय असे वाटत असेल, तर त्याची कारणे तपासणे. आवश्यकता वाटल्यास नियोजनात अथवा अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये योग्य ते बदल करणे. 

लक्षात ठेवा श्रीमंत माणसे इतरांपेक्षा बाकी कुठल्या गोष्टीत वेगळे नसतात. पण त्यांचे नियोजन, ते यशस्वी करण्याची जिद्द आणि प्राप्त परिस्थिती घेतले जाणार सुयोग्य निर्णय या गोष्टींमुळे त्यांना यशाचा मार्ग गवसतो. 

प्रत्येक जण वॉरेन बफेट होत नाही. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही आर्थिक नियोजन, गुंतवणूक याचा विचारच करायचा नाही. तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुमची ध्येय निश्चित करा. कोणी सांगावं, कदाचित उद्या फोर्बज मासिकातील श्रीमंतांच्या यादीत तुमचेही नाव आलेलं असेल!

टीम अर्थसाक्षरतर्फे सर्व वाचकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –