प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या अर्थात वेगळी असते.रोजच्या साध्या साध्या गोष्टीही आपण वारंवार करत असतो. रोज पुरेसे पाणी, मुबलक प्रमाणात झोप ,रोजचं जेवण अशा गोष्टी आपण सवयीप्रमाणे न चुकता करत असतो. पण हो महिन्याची कमाई किंवा पगार यांचही नियोजन असणे बंधनकारक झालं आहे.
वाढती महागाई आणि पगार यांच योग्य संतुलन असणं बदलत्या काळाची गरज आहे.म्हणूनच पैशाचंही रोज पुनरावलोकन करणं महत्त्वाचे आहे. दिवसभराच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी ‘गुगल ॲनेलिटिक्स’चा वापर करू शकता. रोजचा खर्च आणि त्याचं नियोजन व्यवस्थापन मॅट्रिक्स द्वारे करता येते. पैशाचं पुनरावलोकन करण्याची एक पद्धत आहे. ज्यात प्रत्येक दैनंदिन खर्चाचा किंवा बचतीचा मागोवा घेता येतो.
हीच ती वेळ आर्थिक नियोजनाची …
पैसे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत? रोजच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी आपण किती वेळ घालवला आहे?
- याबद्दल विचार केला, तर असे लक्षात आले की,काही नियमित चेक्स किंवा धनादेश किंवा पैशाचं नियमित मोजमाप होणे गरजेचे असते.
- त्यातील काही चेक मासिक असतात, बहुतेक तिमाही असतात, तर काही वार्षिक असतात. पण चेक्स किंवा पैशाचं मोजमाप किंवा व्यवस्थापन दररोज करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता या काही चांगल्या सवयींची यादी देत आहे, ज्यांच्यामुळे पैशाचं पुनरावलोकन होईल.
- तुमच्याकडे जर पुरेसा वेळ नसेल, तर तुम्ही एखादा मदतनीस किंवा व्यवसायिक शोधायला हवा.
तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…
१. दैनंदिन पुनरावलोकन –
- खर्चाचं नियोजन : दिवसभरात होणा-या खर्चाचा योग्य आढावा घेणे ही एक चांगली सवय आहे.
- पैशाचं व्यवस्थापन : पैशाचं व्यवस्थापन करण्यासाठी खर्चाचं नियोजन ही सवय असणे आवश्यक आहे. हल्लीच्या संगणकीय युगात काही मोबाइल किंवा कॉम्रुटरवर चालणारे ॲप्स तयार केले आहेत, जिथे तुमचा डेटा किंवा माहिती सुरक्षित राहू शकते. तसेच माहितीच वर्गीकरण ही करता येते.महिनाभराच्या खर्चाचं पुनरावलोकन करायचे असल्यास असे ५ ॲप्स आपल्याला माहिती हवेत.
आर्थिक नियोजनाचे ५ सुवर्ण नियम
२. मासिक पुनरावलोकन –
- मासिक पगार किंवा उत्पन्न: आपल्यापैकी किती जण आपल्याला दरमहा मिळणा-या पगाराची अचूक नोंद ठेवतात? वेतनपुर्तीचे पुनरावलोकन केले जाते का? उद्योजक किंवा फ्रीलान्सर लोकांसाठी हे अजूनच महत्त्वाचे आहे.
- खर्च: दररोजच्या खर्चाचा रोज तपशील ठेवला असेल, तर महिन्याच्या शेवटी एकूण महिनाभराच्या खर्चाचा आढावा घेणे शक्य होते. या महिन्यात किती आणि कशासाठी खर्च झाला आहे हे पाहण्यासाठी किमान ५ मिनिटे वेळ द्यायला हवा.म्हणजे या महिन्यात नियमित खर्चाशिवाय इतर काही खर्च झाला आहे का याची ही नोंद ठेवायला हवी.
- बचत: बचत दोन प्रकारे होऊ शकते. एक म्हणजे मॅन्युअली आणि दुसरी म्हणजे ऑटोमॅटिक. त्यासाठी काही पर्याय आहेत.उदाहरणार्थ ‘एसआयपी’द्वारे ऑटोमॅटिक पद्धतीने बचत करता येते. या पद्धतीचा फायदा म्हणजे बचत करण्यात सातत्य राहते व बचतीची रक्कमही समजू शकते. या उलट मॅन्युअल पद्धतीत बचतीचे प्रमाण प्रत्येक महिन्यात वेगळे असल्यास त्याची नोंद ठेवण्यासाठी विशिष्ट ‘मॅट्रिक सिस्टिम’चा वापर केला जाऊ शकतो. आपण या योजनेनुसार बचत केली आहे का? नसेल तर, पुढच्या करणार का?
- बजेट: वैयक्तिकरीत्या सर्वजण महिन्याच्या सुरुवातीला पैसे खर्च करतात आणि उर्वरीत पैशांमधून बिले भरली जातात. याच पद्धतीने बहुतांश लोकांचं आर्थिक नियोजन असतं. पण जे बजेटचा विचार करतात, त्यांच्यासाठी मात्र गोष्टी वेगळ्या असू शकतात. महिन्यापूर्वीच काही जणांच नियोजन ठरलेलं असतं. बजेटनुसार खर्चाची रक्कम निश्चित करून त्याचा मागोवा घेणे अधिक चांगलं परिणामकारक ठरते.
- तुमच्याकडे असणाऱ्या स्टॉक्सचे (समभाग) बाजार मूल्य: या क्षेत्रात गुंतवणूक कमी करण्याचा सल्ला दिला जातो, याचे कदाचित आश्चर्य वाटू शकते.पण आपल्या सर्वांना माहित आहे की स्टॉक्सची किंमत स्थिर नसते, क्षणात वाढते आणि क्षणात कमी देखील होते. यासाठी पुरेसे संशोधनही केले आहे. आपण जितकं उतावीळपणे स्टॉक्सचे मूल्य सतत बघत असतो तितकीच शक्यता काही भावनिक निर्णय घेण्याचीही असते. त्यामुळे महिन्यातून एकदा स्टॉक्सचे बदलणारे बाजारमूल्य लक्षात घ्या.मागील महिन्यात त्याची किंमत किती होती? त्या कंपनीविषयी काही नकारात्मक बातमी आहे का? याचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो? याचा पूर्ण विचार करायला हवा.
- क्रेडिट कार्ड आदी बिले भरणे: बिल किती आहे व कधी भरावयाचे आहे हे माहित करून घ्या. एखाद्या बिलाची रक्कम खूप जास्त असू शकते किंवा खूप कमीही असू शकते. सरासरी महिन्याच्या बिलाचा विचार करून वेळेवर पैसे दिले का? याचा विचार करायला थोडा वेळ घ्या. भविष्याचा विचार करून बिले भरण्याचा क्रम निश्चित करा. क्रेडिट कार्डचं बिल भरताना, आपण केलेल्या खरेदीची पुर्नतपासणी करा.
तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?
३. तिमाही पुनरावलोकन –
- बाँड्स चे बाजार मूल्य आणि म्युच्युअल फंड: स्टॉक्सच्या तुलनेत म्युच्युअल फंड आणि बाँड्सच्या किमती जास्त स्थिर असतात. मालमत्तेच्या उत्पन्नाचं दर तीन महिन्यांनी ट्रॅकिंग करणे जास्त प्रभावी ठरते.
- थकित कर्ज: महिन्याचा ईएमआई किंवा कर्जाचा हप्ता भरण्यासोबतच कर्जाची थकीत रक्कम देखील पहायला हवी. एखादी गोष्ट व्यवस्थित माहित असल्याशिवाय ती बदलता येत नसते. कर्जाचंही तसेच आहे. थकीत रकमेचा आढावा घेतल्याशिवाय त्याची परतफेड कधी होईल किंवा लवकर होऊ शकते का? याचा आढावा घेणे गरजेचे आहे. दर तीन महिन्यांनी ही रक्कम पाहिली, तर आपण जास्त प्री-पेमेंट करू शकतो त्यामुळे कर्ज लवकर फेडले जा़ईल.
- निव्वळ किंमत: हा एक चांगला पर्याय आहे ,एकरकमी केलेला व्यवहार केव्हाही चांगलाच. यामुळे आर्थिक पत सुधारते. सहसा पश्चिमेकडील भागात ही पद्धत लोकप्रिय आहे.
- आर्थिक ध्येये: काही आर्थिक ध्येय किंवा उद्दिष्टे निश्चित केली, तर त्यानुसार पुढे जाणे फायद्याचे ठरते. ध्येयाचा मागोवा घेतला की साध्य करणे ही शक्य होते. पैशाचं योग्य नियोजन होण्यासाठी आर्थिक ध्येय हा एक उपाय आहे असं आपण म्हणू शकतो.
पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का?
४. वार्षिक पुनरावलोकन –
- विमा योजना: जीवन विमा योजना आणि आरोग्य विमा योजना असे दोन प्रकारचे विमा आहेत. अर्थात हे दोन्ही विमे उतरवण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य प्रमाण ठरवलं पाहिजे. म्हणजे विमा कधी व किती घ्यावा याची माहिती ठेवावी. बदलत्या जीवनशैलीनुसार विम्याच्या धोरणातही बदल करायला हवा. उदाहरणार्थ बाळाच्या जन्माच्या खर्च आरोग्य विमा योजनेत समाविष्ट करणे शक्यतो विम्याच्या कालावधीत वाढ करणे असे काही बदल करावे लागतात.
- कर भरण्याचे नियोजन: बहुतेक उद्योजक मंडळींसाठी ही त्रैमासिक प्रक्रिया आहे. उद्योजकांना जीएसटीचं नियोजन करावं लागतं. पगारदार लोकांनी आपण किमान रक्कम कर म्हणून भरत आहोत, याची खात्री करावी. यासाठी सरकारने प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना व उपाय सुचविले आहेत, त्याचा आधार घ्यावा. आपल्याला शक्य होईल तितक्या लवकर कर भरण्यासाठी फाईल करा व दंडाची रक्कम वाचवून बचत करा.
- आर्थिक तपशिलाचा सारांश: वर्षभराचा आर्थिक तपशील व सर्व महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित ठेवला आहे का, याची वर्षातून एकदा तपासणी करा. आपलं बँक खाते बंद केल्यास किंवा नवीन खाते उघडले असल्यास याचीही वार्षिक तपशिलात नोंद ठेवायला हवी. पासवर्ड अपडेट करायचे विसरल्यास ही अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व शक्यतांची चाचपणी होणे महत्त्वाचे आहे.
आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब
– अपर्णा आगरवाल
(वरील लेख अपर्णा आगरवाल यांचा https://elementummoney.com/ या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद आहे. अपर्णा या प्रमाणित आर्थिक योजनाकार (Certified Financial Planner) असून विविध आर्थिक विषयांवर तज्ञ ब्लॉगर म्हणून ओळखल्या जातात.त्यांना तुम्ही [email protected] या ईमेल आय.डी. वर आणि Elementum Money या फेसबुक पेजवर संपर्क करू शकता.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/