बचत आणि गुंतवणूक हे तराजूचे दोन पारडे आहेत. आपल्यापैकी बहुतांश लोकांचे बचतीचे पारडे जड असते आणि गुंतवणुकीच्या पारडे जवळपास रिकामे असते. काही लोकं असतात जे बचत आणि गुंतवणूक दोन्ही करत असतात पण त्यातही त्यांची बचतीचे प्रमाण जास्त असते.
गुंतवणुकी ऐवजी खूप बचत करण्याच्या मार्गावर जाणे म्हणजे आपला पैसा वाया घालवण्यासारखे आहे. हे कसं काय? असा प्रश्न अनेक जणांना पडला असेल. या लेखात आपण याचीच चर्चा करणार आहोत की, बचत करण्यापेक्षा गुंतवणूक करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.
बचत करणे हे गुंतवणूक करण्यापेक्षा कसे फायदेशीर आहे. हे आपण पुढील तीन मुद्द्याच्या आधारे समजून घेऊया.
नक्की वाचा – बचत करा, बचत करा! पैसे वाचवायच्या ११ महत्त्वपूर्ण टिप्स
बचत खात्यावरील व्याजदर आणि महागाई –
- आपल्या देशातील जवळपास १०० टक्के लोकं बचत करायची म्हणून बँकेतील बचत खात्यात रक्कम ठेवत असतात. या बचत खात्यावर ४% टक्के दराने व्याज मिळत असते. त्या मिळणाऱ्या व्याजामुळे लोकं खुश असतात. आपली रक्कम सुरक्षित राहते आणि काही प्रमाणात व्याजही मिळत राहते. या प्रमुख कारणामुळे बहुतांश जनता बँकेच्या बचत खात्यावर आपले पैसे ठेवत असते.
- आपल्या देशात असेही अनेक लोकं आहेत. जे मोठी रक्कम बँकेच्या बचत खात्यात ठेवतात आणि त्याच्या व्याजावर जीवन जगत असतात. काही संस्था आपल्या बचत खात्याच्या व्याजातून जे पैसे मिळतात. ते पैसे पुरस्कार म्हणून देत असतात. बचत खात्याच्या पैशातून लोकांनी असे अनेक मार्ग काढले आहेत.
- आता असे मार्ग चालेनासे झाले आहेत. त्याचे महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे बचत खात्यावर मिळणारे व्याजदर. सध्याच्या चालू स्थितीत देशाच्या बहुतांश बँकेत ३ ते ४ टक्क्याच्या दरम्यान बचत खात्यावर व्याजदर मिळतो. बहुतांश लोकांना ४ % व्याजदर चांगला वाटेल पण यात भाववाढीच्या दराचा विचार करत नाहीत.
- आपल्या देशात कमीत- कमी ७ ते ८ % महागाई दर असतो. बऱ्याच वेळेला तो ९ ते १० टक्क्यापर्यंत देखील जातो. आपण कमीत- कमी म्हणजे ७ % महागाई दराचा विचार केला तरी हा दर बचत खात्यावरील मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ हा आहे की, आपले बचत खात्यात ठेवलेले पैसे कमी होत आहेत.
- बचत व्याजदराचा आणि महागाई दराचा मुद्दा आपण उदाहरणाने समजून घेऊया –
समजा आपण बँकेच्या बचत खात्यात एक लाख रुपये ठेवले आहेत. त्या एक लाखावर आपल्याला वर्षाला बँकेकडून चार हजार रुपये व्याज उलट आपले तीन हजार कमी होतील. आपण वर्षभर ते पैसे नुसते बँकेच्या बचत खात्यात ठेवले तर ते पैसे न वाढता दरवर्षी कमी होत राहतील. या कारणामुळे बँकेच्या बचत खात्यात पैसे ठेवले तोट्याचा सौदा आहे.
महत्त्वाचा लेख – दरमहा 50 हजार रुपये पेन्शन मिळवायचे आहे? मग हे गुंतवणुकीचे पर्याय नक्की वाचा !
पैसा खर्च करण्याची सवय –
- कोणत्याही बँकेच्या बचत खात्यावर ठेवलेला पैसा काढणे सर्वात सोपे असते. तुम्ही तो पैसा शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवला असेल तर तो तुम्हाला लगेच काढता येत नाही. त्यासाठी वेळ लागतो.
- पैशाचा एक गुणधर्म आहे, तो म्हणजे पैसा हा पाण्यासारखा असतो. जमिनीवर पाणी जमा झाले की लगेच ते स्वतःचा मार्ग काढत असतो. कोठेना- कोठे वाहत जातो. तसे पैशाचे आहे.
- पैसा बचत खात्यात असल्यास तो अनेक मार्गाने खर्च होत राहतो. कसलीही गरज पडली किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, मित्रांना काही उधार किंवा गिफ्ट द्यायचे असेल तर लगेच पैसे काढून खर्च केले जातात.
- पैसे जर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले असतील तर त्यातून काढणे अवघड असल्याने व त्या पैशातून आपल्याला चांगला फायदा होत असल्याने किंवा भविष्यात लाभ होण्याची अपेक्षा असल्याने हे पैसे सहसा काढले जात नाहीत.
हेही वाचा – Bank FD – व्याजदर वाढींमुळे मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याची सध्या योग्य वेळ आहे का?
गुंतवणूक करण्याची संधी वाया जाते –
- सामान्य माणसालाही सध्याच्या जगात गुंतवणूक करण्याच्या अनेक संधी आहेत. आपल्या आजूबाजूला चांगली जागा आहे. जी विक्रीला निघाली आणि आपण ती विकत घेण्याचा प्रयत्न न करता पैसे तसेच बचत खात्यात ठेवले तर ती मोठी संधी आपल्या हातातून जाते.
- तसेच एखाद्या चांगल्या कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात आला आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केले आणि बचत खात्यात पैसे ठेवण्यास महत्व दिले तर ही देखील संधी वाया जाते.
या तीन मुद्द्याच्या निष्कर्ष हाच आहे की, बचत खात्यात तेवढेच पैसे ठेवा जेवढे एक दोन – तीन महिने पुरतील. बाकी पैसे गुंतवा. बचत खात्यातील पैसे कमी होणार आहेत, त्यापेक्षा गुंतवणे काय वाईट आहे. आपत्कालीन परिस्थितीत क्रेडीट कार्डचा वापर करा पण अशा परिस्थितीसाठी बँकेत पैसे ठेवून त्या पैशाचे महत्व कमी होऊ देऊ नका.