“Life without Smartphone” म्हणजे स्मार्टफोन शिवाय आयुष्य !’ अशक्य वाटतेय ना ही संकल्पना? नुसतं वाचूनही दडपण आल्यासारखं झालं असेल ना? मग हीच ती वेळ आहे हे ‘थ्रिल’, ‘ऍडव्हेंचर’ अनुभवायची !
एके काळी मोबाईल हा कोणालातरी कॉल करणे आणि आलेले कॉल्स घेणे याव्यतिरिक्त जास्तीत जास्त म्हणजे मेसेजेस करणे किंवा आलेले मेसेजेस वाचणे आणि ही गोष्ट फार जुनी नाही, अवघ्या १०-१५ वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे.
विश्वास ठेवा मोबाईल व्यतिरिक्तचं आयुष्य खूप सुखी आणि आनंदी होतं. आजही आपण तसा निर्धार केला, तर आपल्याला ते आयुष्य पुन्हा नक्कीच अनुभवता येऊ शकेल.
सध्या बरेच मोठमोठे कलाकार, नावाजलेल्या व्यक्तीही साध्या फोनचा वापर करू लागले आहेत.
उदाहरणच द्यायचं म्हणाल तर एड शिरन आणि सिमॉन कॉवेल. असा निर्णय घेणाऱ्या अनेक यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे व्यावसायिक रुद्रदेब मित्रा, यांनी त्यांचा स्मार्टफोन शिवाय राहण्याचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे. (एड शिरन आणि सिमॉन कॉवेल वाचवण्यासाठी येथे क्लिक करा.)
रुद्रदेब मित्रा यांनी आत्तापर्यंत १४ देशांमध्ये ४० पेक्षा अधिक ठिकाणी आपला अनुभव सांगितलं आहे. वीसहूनही अधिक देश फिरले आहेत आणि हे सर्व स्मार्टफोन शिवाय! यांनी ४ देशांमध्ये ६ नवीन व्यवसायही सुरु केले आहेत.
अशा श्री रुद्रदेब मित्रा यांच्या म्हणण्यानुसार स्मार्टफोनचा वापर बंद केल्यामुळे, “मला खूप मनःशांती मिळाली, माझ्या कामांवर मी जास्त लक्ष केंद्रित करू शकलो, लोकांशी संवाद करताना मी एक चांगला श्रोताही होऊ शकलो, माझी स्मरणशक्ती वाढली, विविध देशांमध्ये मला फिरावे लागत असल्याने मी नकाशे लक्षात ठेवू शकलो, माझ्या नातेसंबंधात सुधारणा झाली, मानसिक अस्वास्थ्य निघून गेले.”
अर्थात काही ठिकाणी माझी गैरसोय झाली खरी पण म्हणून माझे कोणतेही काम नाही अडले. विशेषतः बँकेचे व्यवहार करताना, मी त्यांना जेव्हा सांगितले की मी फोन वापरत नाही तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नव्हता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्याकडे फोन असणे अनिवार्य आहे म्हणून मी साधा फोन घेतला ज्यामध्ये काही पायाभूत सुविधा उपलब्ध असतात.
Life before & after smartphone
https://bit.ly/2YzsTbI
कसं असेल स्मार्टफोनशिवायचं आयुष्य:
आपण आपल्या ‘सोयी’ला प्रमाणापेक्षा जास्त ,महत्व देऊ लागलो आहोत आणि त्यामुळे टेलिव्हिजन, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन, माइक्रोवेव्ह शिवाय सुखी आणि आनंदी आयुष्याची आपल्यातील अनेकजण कल्पनाही करू शकत नाहीत.
असे अनेकजण आपल्याही माहितीत असतात जे टेलिव्हिजन पाहत नाहीत, हातांनी कपडे धुतात आणि ते खूप सुखी जीवन जगतात.
स्मार्टफोन शिवायचं आयुष्य का आणि कसं तुमच्या फायद्याचं आहे:
आभासी जगातून बाहेर येऊन तुमचा तुमच्या आसपासच्या खऱ्या जीवनाशी, त्यात मिळणाऱ्या आनंदाशी जोडले जाऊ शकाल, त्याची मजा अनुभवू शकाल.
तुमच्या लक्षात येईल की फोनवर एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड होत नसेल किंवा नीट चालत नसेल, तर तुम्ही अस्वस्थ होता. पण प्रत्यक्षात ते ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे नसेल तरीही फार काही फरक पडत नाही.
इतरांच्या जीवनात काय सुरु आहे हे बघून तुम्ही तुमच्या जीवनाची तुलना करून निराश होता, ते नैराश्य तुमच्या जवळही फिरकणार नाही कारण तुम्ही तुमच्या सुखी आयुष्यात रमलेले असाल.
फोन हरवला तर आपल्याकडील खूप महत्वाची माहिती जाण्याचं दडपण नकळत का होईना सतत आपल्यावर असत, स्मार्टफोनचा वापर बंद केल्यावर या दडपणातून आपोआप तुमची मुक्तता होईल.
तुमचे प्रियजन, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सगेसोयरे यांच्यासोबत तुम्हाला अधिक वेळ घालवता येईल आणि त्यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतील.
तुमच्या लक्षात येईल की फोनचा वापर बंद केल्यापासून तुमचे शारीरिक, मानसिक आरोग्यामध्ये कमालीची सुधारणा झालेली आहे आणि तुम्ही जास्त वेळ आनंदी राहत आहात.
एखाद्या व्यक्तीचा रिप्लाय येण्यासाठी वाटणारी उतावीळ भावना, अस्वस्थता निघून जाईल.
तुमची ठरवलेली कायम वेळेत किंबहुना वेळेआधी पूर्ण होतील आणि त्याचा दर्जाही उत्तम असेल.
ज्या गोष्टींना खऱ्या जीवनात फार महत्व नाहीये अशा विनाकारण वाटणाऱ्या भावनिक गुंत्यातून तुमची सुटका होईल.
Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.
सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी
Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –