तरुणांनो यशस्वी नियोजन करून ४० व्या वर्षी निवृत्त व्हा. चाळीशी ओलांडलेल्यांनी पन्नाशीत निवृत्ती घेऊन ती आनंददायी कशी करता येईल? हा विचार करा. या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
चाळीशीतील गुंतवणूकदारांनी जर त्यांच्या करिअरच्या सुरवातीपासून गुंतवणूक केली असेल तर निश्चित त्यांना ५०-५५ वर्षी निवृत्ती घेता येईल. मात्र बऱ्याच जणांच्या बाबतीत दीर्घकालीन गुंतवणूक न होता, आपली नजीकच्या काळातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची बचत झाली.
या बचतीमधून काही लोकांनी आपल्या नवीन घराचे, गाडीचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या बचतीतून मुलांच्या शिक्षणावर खर्च केला. ही सर्व स्वप्ने पूर्ण करीत असताना एक छोटीशी एसआयपी (SIP) दीर्घकाळासाठी चालू ठेवली असती, तर त्यांना निवृत्तीसाठी चांगला निधी उभा करता आला असता. काही ज्ञानी गुंतवणूकदारांनी तशी एसआयपी केलीही असेल. ज्यांनी नाही केली त्यांनी काय करावे? ते पाहूया.
- आपली नोकरीच्या ठिकाणी असलेली दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे आपला भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपल्या वेतनामधून भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा होत असते. जेव्हा आपली नोकरी ३०-३५ वर्षे होते तेव्हा आपल्या भविष्यनिर्वाह निधीच्या रक्कमेमध्ये चांगली वाढ होते. नोकरीतील शेवटच्या ८-१० वर्षांमध्ये भविष्य निर्वाहनिधीमध्ये अधिक जोमाने वाढ होते.
- भविष्य निर्वाहनिधीचा व्याजदर हा साधारण ८-९% च्या आसपास असतो. मात्र चक्रवाढ वाढीचा फायदा आपल्याला दीर्घकाळामध्ये दिसून येतो. जर आपण आपल्या निवृत्तीसाठी इतर काही दीर्घकालीन गुंतवणूक केली नाही, तर आपल्याला निवृत्ती पश्चात मिळणाऱ्या लिव् एनकॅशमेंट / भविष्य निर्वाहनिधी किंवा पेंशन तसेच ग्रॅज्युइटी यावर आपला उदरनिर्वाह करावा लागेल, महागाई विचारात घेता आपले सेवानिवृत्ती लाभ हे तोकडे पडू शकतात.
- आज ज्यांचे वयोमान ४५ आहे त्यांनी जर रु. २०,००० ची एसआयपी पुढील १५ वर्षे साठी केली व जर दरवर्षी त्यात रु २००० ची वाढ केली तर वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्तीला आपण रु. १.९५ करोड चा निधी उभा करू शकू. जर रु १५,००० ची एसआयपी पुढील १५ वर्षांसाठी केली व त्यात दरवर्षी रु १५०० ची वाढ केली, तर वयाच्या ६० व्या वर्षी साधारण रु. १.४६ करोड चा निधी उभा राहील. ज्यांचे वयोमान ५० असेल त्यांनी शक्य असल्यास मोठ्या रकमेची एसआयपी चालू करावी.
- चक्रवाढ वाढीचा फायदा मिळण्यासाठी आपली गुंतवणूक जास्तीत जास्त वर्षे लांबवणे आवश्यक असते. अशा वेळी आपली एसआयपी वयाच्या ६५ वर्ष पर्यंत चालू ठेवावी. निवृत्तीनंतर पुढील ५ वर्षे साधारणतः सेवानिवृत्ती लाभ आपल्याला एसआयपी चालू ठेवण्यास मदत करतील. (इथे ‘एसआयपी’मधून मिळणारा परतावा १५% गृहीत धरला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेच्या अधीन असते , गुंतवणुकीपूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा).
- प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे पूर्णपणे वेगवेगळे असते. प्रत्येकाचे उत्पन्न, खर्च, जबाबदाऱ्या या वेगळ्या असतात. या सर्वांचा विचार करून प्रत्येकाने आपल्या निवृत्तीसाठी एक तरी कमीत कमी १५ ते २० वर्षे दीर्घकालीन एसआयपी करावी. त्याचबरोबर योग्य विमाछत्र असलेला आरोग्य विमा आणि गंभीर आजाराचे विमाछत्र असणे आवश्यक आहे.
- योग्य आरोग्य विमा असला की विमा कंपनी कडून दरवर्षी आपल्याला मोफत वैद्यकीय चाचणीची सेवाही मिळू शकते. जेणेकरून आपण आपल्या निवृत्ती नंतर आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहणार नाही. उलट आपण आपल्या नातवंडांसाठी आपल्या आवडीच्या बऱ्याच गोष्टी करू शकतो. आपल्या पश्चात आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला वारसा सोडून जाऊ शकतो.
- मध्य वयोगटातील लोकांसाठी अजूनही वेळ गेलेली नाही, लवकर आपली दीर्घकालीन एसआयपी चालू करा आणि आपले निवृत्ती नंतरचे जीवन आनंददायी बनवा.
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा!!
– निलेश तावडे
– ९३२४५४३८३२
(लेखक हे २० वर्ष्ये म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते , सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)
एस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय , गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?,
निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे, गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.