Reading Time: 4 minutes

“झोपेत असतांना सुद्धा पैसा कसा वाढेल, याचा मार्ग शोधला नाही तर मरेपर्यंत काम करावे लागेल.”

– वॉरेन बफे.

काल सायंकाळी आदित्यचा फोन आला. मी निवांत टीव्ही बघत होतो. त्यावर नुकतीच ‘म्युच्युअल फंड्स सही हैं ‘ ही जाहिरात चालू होती.  तिकडून आदित्य वैतागून म्हणाला , “माझी एसआयपी बंद करून टाका. दीड वर्षे बघतोय. कुठलाही आकर्षक परतावा दिसत नाही. किमान भरलेले पैसे तरी कमी होऊ नयेत, तेही नाही. कशाला हवी अशी गुंतवणूक? त्यापेक्षा पोस्टल आरडी  बरी!”

आदित्यची मानसिकता बघता मी त्याला, “दुसऱ्या दिवशी कार्यालयात ये असे सुचविले.” दुसऱ्या दिवशी आदित्यला पुन्हा एसआयपी नक्की कशी काम करते, हे सांगणे क्रमप्राप्तच होते.

आदित्य पुण्याच्या एका नामवंत आयटी कंपनीत मानवी संसाधन विभाग व्यवस्थापक (HR Manager) म्हणून उत्तम पगारावर कार्यरत होता. मात्र आर्थिक नियोजनभान त्याला अजिबातच नव्हते.

आदित्य समजा तू दर महिन्याला  दहा हजार रुपयांची सोने खरेदी ठराविक तारखेला करतोय . उदाहरणार्थ जानेवारी (सोने भाव  रु..२९,००० तोळा), फेब्रुवारी ( रु. ३०,००० तोळा), मार्च (रु.२६००० तोळा) व एप्रिल (रु. २७५०० तोळा) अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर तुझी खरेदी झालेय. यात तुझी सर्वात आकर्षक खरेदी कोणती? 

“अर्थातच २६००० रुपये तोळा! ही खरेदी सर्वात फायद्याची.” आदित्यने उत्साहाने उत्तर दिले.

“कारण? ” मी प्रश्नार्थक पध्दतीने विचारले.

“सरळ आहे , गोल्ड मार्केट डाउन असले तर कमी भावात झालेली खरेदी जास्त सोने (grams) देईल. “आदित्य.

“येस आदित्य , एकदम बरोबर , त्याच प्रमाणे शेअर बाजारही डाउन असेल तर त्याचा परिणाम म्युच्युअल फंड युनिट एनएव्ही (NAV) वर होतो व हे युनिट्स कमी भावात खरेदी करणे ही सुद्धा एक सुवर्णसंधी असते. आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्याकरिता योग्य वेळ दिली की संपत्ति निर्माण होते.”

“मला उदाहरणांसह सांगा.” आदित्यने पुन्हा बाऊन्सर टाकला.

  • “एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ‘एचडीएफ इक्विटी फंड’ ही योजना १ जानेवारी १९९५ रोजी सादर करण्यात आली. त्यावेळी तिचा एनएव्ही (एका युनिटची किंमत / Net Asset Value ) रु. १० होता. आज ३१ मे २०१९ रोजी या योजनेचा एनएव्ही रु. ६९६.४७१० आहे.
  • जर एखादया व्यक्तीने दरमहा ५००० रुपयांची सीप या योजनेत २४ वर्षांसाठी केली असेल तर त्यांना योजनेच्या सुरुवातीपासून आजपर्यंत या योजनेने चक्रवाढ व्याजदराने  २०.२७ % या दिलेल्या परताव्याने रु. ५००० प्रतिमाह याप्रमाणे २४ वर्षांच्या रु. १४,४०,००० /- या गुंतवणूकीचे मूल्य आज रु. २,७१,५७,९०३ /- एवढे झाले आहे.”
  • मी ‘तो सूर्य , हा जयद्रथ ‘ या अभिनिवेशात ऑनलाईन आकडेवारी आदित्यला सादर केली. आता मात्र आदित्यच्या सर्व शंकांना सविस्तर उत्तर मिळाले होते. मी आदित्यच्या आर्थिक नियोजनाचा पुन्हा एकदा आढावा घेतला व त्याला त्याच्या दोन्ही मुलांमुलींचे शिक्षण, लग्न व त्याची सेवानिवृत्ती याचा प्लॅन सादर केला.

एसआयपी बंद करायला आलेल्या आदित्यने याच मिटिंग मध्ये  ‘इएलएसएस (ELSS) या कर वाचविणाऱ्या ‘एसआयपी’मध्येही गुंतवणूकीचे निर्णय घेतले.

सिपमध्ये पैसे गुंतवण्याचे फायदे :

  • चक्रवाढ गतीची शक्ती (Power of Compounding): नियमित गुंतवणूक होत असल्यामुळे मिळणाऱ्या फायद्याची पुनर्गुंतवणूक होत असते. गुंतवणूक अधिक फायदा, या दोन्हीवर पुन्हा उत्पन्न चालू होते. म्हणून शक्यतो लवकर गुंतवणुकीस सुरुवात करा म्हणजे चक्रवाढ गतीचा फायदा मिळेल.
  • आर्थिक उद्दिष्ट गुंतवणुकीस शिस्त (Discipline): दर महिन्याला आपण विशिष्ट रक्कम सिपच्या मध्यमातून गुंतवणूक करत असतो. याचा अर्थ आपल्या गुंतवणुकीस एक विशिष्ठ शिस्त लागते. कारण दर महिन्याला ही रक्कम भरणे बंधनकारक असते त्यामुळे गुंतवणूकीस प्राधान्य मिळते.
  • सरासरीचा फायदा (Rupee Cost Averaging): म्युचुअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारा जोखमीच्या अधीन असते. म्हणजे त्यात चढ- उतार होत असतो. प्रत्येक गुंतवणुकीत आपणास त्या फंडाचे युनिट्स मिळतात. प्रत्येकवेळी समान गुंतवणुकीस युनिट्सची एनएव्ही (NAV) ही वेगळी असल्यामुळे युनिट्स कमी- अधिक मिळतात.
  • कर बचत (Tax saving):  दीर्घ मुदतीच्या ‘इएलएसएस’ गुंतवणूक योजनेमध्ये कर लाभ मिळतो.
  • सुलभता  (Convenience): यामध्ये मार्केटच्या वेळेतच गुंतवणूक करावी असे काही बंधन नसते. आपण ही रक्कम आपल्या बचत खात्याला जोडून घेऊ शकतो.  Electronic clearance – ECS (Auto debit facility) म्हणजे प्रत्येकवेळी भरणा करण्याची किंवा भरणा चुकण्याची चिंता राहत नाही. आपण पोस्ट डेटेड चेकनेही सिप करू शकतो.
  • छोट्या गुंतवणुकदारासहि फायदा: यामध्ये अगदी ५०० रुपये दर महिन्याला भरून सहभागी होता येते.
  • पद्धतशीर गुंतवणूक योजना: “थेंबे थेंबे तळे साचे” याप्रमाणे चांगले जीवन जगण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याकडे गरजेइतकी संपत्ती निर्माण व्हावी यासाठी आपण सिप योजना अंगिकारली पाहिजे. दर महिन्याला येणाऱ्या उत्पन्नातून गुंतवणूक करून परतावा चांगला मिळावा यासाठी हे गरजेचे आहे.  रुपये ५०० किंवा १००० इतक्या कमी रकमेची सिप (SIP) चालू करून आपण गुंतवणूक करू शकतो.

यामधून नियमित गुंतवणुकीची शिस्त लागते. आणि कमी रकमेमध्ये आपला पोर्टफोलिओ तयार व्हायला सुरुवात होते. यामध्ये गुंतवणूक करण्याआधी आपले आर्थिक उद्दिष्ट काय आहे? आपण दर महिन्याला किती रक्कम गुंतवणार आहोत? हे ठरवा. मगच गुंतवणुकीला सुरुवात करा.

एसआयपी गुंतवणूकीचे महत्वाचे टप्पे :

१. आपले आर्थिक उद्दिष्ट ठरवा.

२ .त्यासाठी दर महिन्याला किती रक्कम भरणार आहोत, हे आर्थिक नियोजकाच्या मदतीने ठरवा.

३. विविध योजनाचा अभ्यास व मागील परतावा तपासून योग्य योजना निवडा.

४. या योजनेचा अर्ज  आणि एसआयपी मॅनडेट अर्ज, रक्कम आणि तारीख नक्की करा.

५. पेमेंट पर्यायाची निवड करा. (चेक किंवा ECS)

६. दीर्घकालिन संपत्ती निर्माणसाठी गुंतवणूक करा. यामध्ये चक्रवाढगतीचा आणि सरासरीचा फायदा होतो.

७. एकापेक्षा अधिक योजना  निवडल्यास पोर्टफोलिओमध्ये विविधता येते.

८. वर्षातून किमान एकदा तुमच्या आर्थिक नियोजकाबरोबर मिटिंग करा व आपले उद्दिष्ट्ये व योजना यांचा आढावा घ्या.

जागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. आपण बँकांच्या मुदतठेवी, बँक व पोस्टल आरडी, विमा या पारंपरिक बचतीला आर्थिक ज्ञान नसल्याने गुंतवणूक समजतो. अशा प्रकारची गुंतवणूक महागाई निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देऊ शकत नाहीत. म्हणूनच या बचत गुंतवणुकीत परावर्तित केल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल. आपण विमा पॉलिसीसाठी वीस वर्षे सहज देतो . मग असा कालावधी “म्युच्युअल फंड्स सही हैं..” साठी का देत नाही?

बिल गेट्स म्हणतात ,

“गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यात तुमचा दोष नाही. परंतु गरीब म्हणून मेलात तर मात्र, दोष तुमचाच आहे.”

एकंदरीत, संपत्ति निर्माण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यासाठीचा राजमार्ग मात्र म्युच्युअल फंड्स – एसआयपी हाच आहे. शेवटी, “म्युच्युअल फंड्स सही हैं !”

– सुनील कडलग.

9881327686 / 9422855786

[email protected]

(लेखक हे संगमनेर येथे पूर्णवेळ आर्थिक नियोजक म्हणून  कार्यरत असून आपल्या सल्ल्यासाठी आपण वरील ई-मेल वर किंवा भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधू शकता.)

म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती,

एस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय,

डायरेक्ट वि. रेग्युलर म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना,

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved. 
Share this article on :
You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…