Browsing Tag
आरोग्य विमा
36 posts
Health Insurance Renewal: आरोग्य विमा नूतनीकरण करताना तपासा या ९ गोष्टी
Reading Time: 3 minutesआरोग्य विमा हा स्वतःसाठी व कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असतो. यामुळे आरोग्य खर्चामुळे होणारे वित्तीय त्रास कमी होण्यास मदत होते. आरोग्य विमा मात्र हा काही विशिष्ट काळासाठीच असतो. कालावधी संपल्यावर त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक असतं. स्वास्थ्य विम्याचे नूतनीकरण करणे अगदी सोपं आहे. परंतु, नूतनीकरण करताना काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक असते.
कोरोना – “देवाची करणी” आणि विमा योजना
Reading Time: 4 minutesकोरोना विषयक माहितीच्या महापुरात आयआरडीए ने कोरोनाचे क्लेम्स मान्य करण्यासंबंधी एक सर्क्युलर काढले आहे. अशी माहिती समाज माध्यमांतूनही फिरत होतीच. या बाबत अनेकांचा गोंधळ उडाल्याने माझे आकलन येथे स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते. आयआरडीएने प्रसिद्ध केलेले, कोरोनाचे क्लेम्स मान्य करणेसंबंधीचे परिपत्रक हे प्रामुख्याने ‘आरोग्य विमा’ (Medical Insurance) सेवांबाबत आहे.
गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट – आर्थिक नियोजनाची फरफट?
Reading Time: 3 minutes“दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल…” आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानीही झाली, पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही आपण मात करण्यात आपल्याला यश मिळेल. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरवात होते. अनेकजण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका.
आर्थिक नियोजन – भाग ४
Reading Time: 3 minutesदरवर्षी जगभरात खाद्यपदार्थांच्या ३०,००० जाहिराती फक्त लहान मुलांना आकृष्ट करण्यासाठी बनविल्या जातात. यांत मग रेडी टू इट(फ्रोझन) पासून दुधातून घेण्याच्या सो कॉल्ड हेल्दी ड्रिंक्सपर्यंत या जाहिराती असतात. त्याचे विपरित परिणाम आता सर्वत्र जाणवू लागले आहे. ओबेसिटी (लठ्ठपणा) हा आजार आहे, हे आता जगन्मान्य झाले आहे. १९७५ साली १ कोटी बालकांना असलेला लठ्ठपणा हा विकार आज ११ कोटी बालकांना झाल्यावर त्याचे आजारात रुपांतर झाले आहे. आजच्या लेखात तुम्ही कुठल्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा? यापेक्षा तो असणे आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे, हे सांगणे जास्त उचित आहे असे मला वाटते.
सरते आर्थिक वर्ष आणि करनियोजन – २०१९/२०
Reading Time: 4 minutesचालू आर्थिक वर्ष (२०१९/२०) आता संपत आले. हा हा म्हणता ते कधी संपेल ते कळणारही नाही. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन, वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून, आज आपण त्यांना यावर्षात मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊयात, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी गोंधळ उडणार नाही.
अर्थसाक्षर कथा – संकट दुर्धर आजारांचे
Reading Time: 4 minutesआरोग्य खर्च ही समस्या अनेकांसमोर आवसून उभी असेल. त्यात आरोग्य विमा नसल्यामुळे अजिबातच आर्थिक मदत होत नाही. पण अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका.असाध्य किंवा गंभीर आजार, ऑपरेशन/ औषधोपचार करूनही काहीच फायदा न होता बळावत जाणारा आजार आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, अशा परिस्थितीत आरोग्य विमा नसल्यामुळे हतबल झालेला रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्या मदतीला असतात त्या शासनाच्या विविध योजना व सेवादायी संस्था. या संस्था आर्थिक मदत तर करतातच, पण काही संस्था रुग्णाला व त्याच्या कुटुंबियांना पुनर्वसनासाठीही मदत करतात.
आरोग्यविम्यामधील घोषणेचे महत्त्व
Reading Time: 2 minutesदेशभरात वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तुमच्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य विमा उपयुक्त ठरतो. त्यासाठीच पुरेसे, विनाखंड आरोग्य विमा कवच मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या विमा कंपनीला आवश्यक ती माहिती देणे गरजेचे आहे.
आरोग्य विम्यावर बोलू काही…
Reading Time: 5 minutesसर्वच लोक आर्थिक दृष्टीने सक्षम नाहीत, की जे मोठ्या वैद्यकीय उपचारांचा खर्च पेलू शकतील. दुर्दैवाने मग लोक आपले सोने, शेती (प्रॉपर्टी) आणि इतर मौल्यवान गोष्टी विकतात, भविष्य काळासाठी केलेल्या गुंतवणुकीला अशा प्रकारे हात लावला जातो. वेळप्रसंगी इतरांकडून कर्ज घेतले जाते. अतिशय किरकोळ प्रीमियम भरून घेतलेला आरोग्य विमा तुमची जिद्दीने केलेली बचत व भवितव्य सुरक्षित करू शकतो.