कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “ईपीएफ” संदर्भात मोठा निर्णय

Reading Time: 2 minutes कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी दिलासा देणारे अनेक निर्णय जाहिर केले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (EPF) साठीही सवलतीच्या घोषणा केल्या आहेत.त्यातली दरमहा भरावी लागणारी भविष्य निधीची रक्कम पुढील तीन महिन्यासाठी केंद्र सरकार भरणार आहे. पण हा लाभ लघु, मध्यम स्वरूपाच्या उद्योग व्यवसायांना व्हावा असा सरकारचा उद्देश आहे. म्हणून भविष्य निर्वाह निधी लागु असलेल्या ज्या संस्थेत शंभर पर्यंत संख्या आहे आणि सदस्यांपैकी नव्वद टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन पंधरा हजार च्या मर्यादेत आहे त्या सर्व संस्थाना केंद्र सरकारचा हा लाभ मिळणार आहे..

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती

Reading Time: 2 minutes रिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.  कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ? यासाठीचा कालावधी कोणता आहे ? कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

कोरोना – रिझर्व्ह बँकेचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याचे परिणाम

Reading Time: 3 minutes रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिनांक २७ मार्च २०२० रोजी पत्रकार परिषद घेऊन कोविड १९ मुळे उद्भवलेल्या सध्याच्या कठीण परिस्थितीत अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत हे निर्णय कोणते व  त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल विचार करूयात.

कोरोना, शेअर बाजार आणि एसडब्लूपी गुंतवणूक

Reading Time: 4 minutes साधारण गेल्या ४-५ वर्षांपासून, जेव्हा बँकांचे व्याजदर घसरणीला लागल्यापासून, बऱ्याचशा जेष्ठ नागरिकांनी आपली सेवानिवृत्तीनंतरची मोठी रक्कम म्युच्युअल फंडाच्या इक्विटी हायब्रीड फंडात गुंतवण्यास सुरवात केली. ह्या कॅटेगरीचे त्या वेळचे आकर्षण म्हणजे दर महिन्याला नियमित दिला जाणारा करमुक्त लाभांश.  सध्या कोसळलेल्या शेअर बाजारामुळे आपल्या गुंतवणुकीतील घट पाहून आपल्याला चिंता किंवा भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे, मात्र आपली ही भीती किंवा चिंता दूर करून  म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतला आपला विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी काही माहिती देतो. 

“करोना” –  यातील काही आपण विसरलोय का?

Reading Time: 3 minutes हा लेख प्रकाशित होईल तेव्हा हे आर्थिक वर्ष (Financial Year) संपायला ४/६ दिवस उरले असतील. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षाची मुदत वाढवली आहे म्हणजेच हे वर्ष जून २०२० ला संपून, पुढील वर्ष हे ९ महिन्यांचे असेल व ते ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. त्यापुढील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असेल. हे लक्षात ठेऊन काही गोष्टी सर्वांनी अग्रक्रमाने करणे आवश्यक आहे याला मी ‘करो ना’ म्हणतोय, नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, त्या कोणत्या ते पाहुयात.

गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट – आर्थिक नियोजनाची फरफट?

Reading Time: 3 minutes “दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल…” आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानीही झाली, पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही आपण मात करण्यात आपल्याला यश मिळेल.  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरवात होते. अनेकजण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. 

कोरोना आणि कायदा

Reading Time: 2 minutes कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. भारत सुद्धा ह्याला अपवाद राहिलेला नाही. ह्या प्रचंड वेगाने फोफावणाऱ्या आजारावर नियंत्रण आणणे हे भारताच्या सरकारपुढे मोठे आव्हान झाले आहे आणि सरकार हे आव्हान मोठ्या शर्थीने पेलताना दिसत आहे. भारतात कुठलेही निर्णय घेण्यासाठी सरकारला कायद्याचे पाठबळ लागते. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कुठले कायदे हाताशी घेतले आहेत हे आपण ह्या लेखातून जाणून घेऊया.

आर्थिक नियोजन – भाग ४

Reading Time: 3 minutes दरवर्षी जगभरात खाद्यपदार्थांच्या ३०,००० जाहिराती फक्त लहान मुलांना आकृष्ट करण्यासाठी बनविल्या जातात. यांत मग रेडी टू इट(फ्रोझन) पासून दुधातून घेण्याच्या सो कॉल्ड हेल्दी ड्रिंक्सपर्यंत या जाहिराती असतात. त्याचे विपरित परिणाम आता सर्वत्र जाणवू लागले आहे. ओबेसिटी (लठ्ठपणा) हा आजार आहे, हे आता जगन्मान्य झाले आहे. १९७५ साली १ कोटी बालकांना असलेला लठ्ठपणा हा विकार आज ११ कोटी बालकांना झाल्यावर त्याचे आजारात रुपांतर झाले आहे. आजच्या लेखात तुम्ही कुठल्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा? यापेक्षा तो असणे आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे, हे सांगणे जास्त उचित आहे असे मला वाटते.