Credit Score: आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल ?

Reading Time: 3 minutes कर्ज घेताना प्रत्येक बँक आपली आर्थिक पार्श्वभूमी पाहते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण क्रेडिट कार्डद्वारे किती व कसा व्यवहार केला आहे हे पाहिले जाते. आपला क्रेडिट स्कोअर पुन्हा तपासून पाहिला जातो. आपण कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घेत असतो. हे कर्ज मिळवण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. 

मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?

Reading Time: 2 minutes अनेकवेळा आपल्याला  क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कॅाल येत असतो. काही वेळेस आपण तो टाळतो, तर काही वेळेस कार्डवर चांगल्या आफर्स असतील तर कार्डसंबधी माहिती देखील घेता. काही वेळेस मागणी न करताच मिळालेल्या क्रेडिट कार्डमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. विचार करा की, तुम्ही न केलेल्या व्यवहारांचे, लाखो रूपयांचे बिल तुम्हाला भरावे लागले तर? अनेक वेळा क्रेडिट कार्डची मागणी केली गेली नसली तरीही आपल्या नावावर क्रेडिट कार्ड पाठवले जाते.

Credit Card: क्रेडिट कार्ड बंद करताय? मग हे वाचाच.

Reading Time: 3 minutes नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाकिटात आजकाल एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड असतात. अर्थसाक्षर नसलेल्या लोकांच्या मते, क्रेडिट कार्ड वापरणं हे बेजबाबदरीचं लक्षण असतं. पण, आर्थिक सल्लागारांचं मत ऐकलं तर एक लक्षात येतं की, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि वेळच्या वेळी त्याचं बिल भरत असाल, तर बँक तुमच्याकडे एक जबाबदार  ग्राहक म्हणून बघते. क्रेडिट कार्ड योग्यपणे वापरण्याने तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजेच ‘कर्ज घेण्याची आणि ती फेडण्याची’ ऐपत वाढत असते. हा क्रेडिट कार्ड वापरण्याचा फायदा सुद्धा आहे. क्रेडिट कार्डची वाढती उधारी जर तुमचं टेन्शन वाढवत असेल आणि क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुम्ही दुसरं कर्ज घेणार असाल तर आधी हे ५ मुद्दे वाचा आणि मगच आपला निर्णय घ्या: 

Bank and Credit Card: क्रेडिट कार्ड व्यवसायातून बँकेला नक्की काय फायदा होतो?

Reading Time: 3 minutes क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आजकाल प्रत्येकालाच सतत फोन येत असतात. तुम्ही कोणत्याही बँकेत गेल्यावर तिथली एक व्यक्ती लगेच तुम्हाला क्रेडिट कार्ड साठी विचारणा करते. तुम्ही पेट्रोल पंपावर जरी गेलात तरी तिथे काही बँकांनी आपले क्रेडिट कार्ड विक्री प्रतिनिधी तिथे नेमले आहेत. कोणतीही बँक क्रेडिट कार्ड विकण्यासाठी, ती सेवा आपल्याला देण्यासाठी इतकी का आग्रही असते ? तुमच्या एका क्रेडिट कार्डमुळे बँकेचा नेमका काय फायदा होतो ? जाणून घेऊयात. 

Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे

Reading Time: 3 minutes आयुष्यात कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घ्यावेच लागते, कर्ज घेताना अर्थातच काही अटी असतात ज्यांची पूर्तता करणे आवश्यक असते. कर्जासाठी अर्ज केल्यानंतरही कर्ज मिळेल की नाही याबाबतची भिती वाटते कारण बऱ्याचदा सगळी कागदपत्रे असूनही कर्ज नामंजूर होऊ शकते. कर्ज मंजूर होताना तुमच्या भूतकाळातील किंवा वर्तमानकाळातील अनेक घटकांचा विचार केला जातो. गोष्टी पडताळून पाहिल्या जातात. त्या कदाचित आपल्याला माहितही नसतात. 

Credit Card Mistakes: क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा

Reading Time: 3 minutes सध्या क्रेडिट कार्डचा वापर वाढत चालला आहे.  क्रेडिट कार्डचा वापर करताना काही चुका होऊ शकतात (Credit card Mistakes) आणि यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. ऑगस्ट २०१८ पर्यंत भारतात क्रेडिट कार्डधारकांची संख्या सुमारे ४ कोटी एवढी होती. मागील २ वर्षात भारतात क्रेडिट कार्ड वापरात कमालीची वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या साहाय्याने व्यवहार करताना अगदी डोळसपणे काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे व्यवहारात पारदर्शकता व सुरक्षितता राखण्यात येईल. तसेच होणारी फसवणूक किंवा आर्थिक नुकसानही टाळता येईल. 

Types of Credit Card: क्रेडिट कार्डचे हे विशेष प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 4 minutes क्रेडिट कार्डचा वापर तर अनेकजण करत असतील पण आपल्यासाठी योग्य क्रेडिट कार्ड कोणतं हे ठरविण्यासाठी क्रेडिट कार्डचे प्रकार (Types of Credit Card) माहिती असणं आवश्यक आहे. 

Credit Card and CIBIL: क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

Reading Time: 3 minutes आपल्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवरून बँक आपला क्रेडिट स्कोअर ठरवत असते (Credit Card and CIBIL). आपल्याला असा प्रश्न पडला असेल की एखाद्या महिन्यात न भरलेल्या किंवा भरूनही अयशस्वी झालेल्या बिल पेमेंटमुळे क्रेडिट स्कोअर खरंच कमी होतो का? तर याचं उत्तर “हो” असं आहे. “आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहोत”, असं एखाद्या सावकाराला सांगितलं, तरी तो आपली पत किंवा क्रेडिटकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो. तसंच क्रेडिट कार्डच्या बाबतीतही आहे. 

Credit Card: क्रेडीट कार्ड देणारे कसे पैसे मिळवतात आणि आपण काय काळजी घ्याल?

Reading Time: 3 minutes क्रेडीट कार्डच्या आकर्षक ऑफर्स सगळीकडे तुमचे लक्ष वेधत असतात. बँकेत गेले असताना, एटीएममधून पैसे काढताना, तुमचे बँक खाते नेटबँकिंगद्वारे वापरताना, अशा अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डच्या आकर्षक ऑफर्स तुमच्या नजरेस पडत असतात. एवढेच काय तर बँकेचे महिन्याचे स्टेटमेंटसुद्धा क्रेडीट कार्डच्या ऑफर्सने भरलेले असते आणि तुमचं मन तिकडे नकळतपणे ओढलं जात असतं. 

क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने कसे वापराल?

Reading Time: 3 minutes क्रेडिट कार्ड कसे वापरावे? क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर तुम्ही त्याचा कसा आणि किती…