Browsing Tag
fraud
12 posts
फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवाल? लक्षात ठेवा हे तीन सुवर्ण नियम
Reading Time: 4 minutesफसवणुकीचे गुन्हे अनेक प्रकारचे असतात. फसवणुकीला बळी पडणाऱ्या व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अडाणी अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाच्या समस्याही वेगळ्या. प्रत्येकालाच वाटत असतं की माझंच दुःख मोठं आहे. पण दुःखाची ही भावनाच गुन्हेगारांचे प्रमुख हत्यार आहे. सावज हेरताना गुन्हेगार सर्वात आधी त्याची दुखरी नस ओळखतो आणि बरोबर त्यावरच फुंकर मारतो. या लेखात आपण समस्यांचे प्रकार, त्यामुळे होणारी फसवणूक, फसवणुकीचे विविध मार्ग, त्याची करणे व त्यासाठीचे खबरदारीचे उपाय याबद्दलची माहिती घेणार आहोत.
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
Reading Time: 3 minutesकोविड-१९ मुळे सध्या सर्व कामकाज ठप्प आहे, अनेक लोक आपापल्या घरी गेल्याने, तसेच त्यातील काही पुन्हा न येण्याच्या शक्यतेने, तात्पुरत्या कंत्राटी / कायम स्वरुपात अनेक रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याविषयी संस्थेच्या कार्यकर्तीला आलेल्या अनुभवातून काळजी कशी घ्यावी व फसलो तर काय करावे याविषयी थोडे मार्गदर्शन.
बनावट वाहनविमा योजनेपासून सावध रहा
Reading Time: 2 minutesबनावट विमा योजना विकून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार विमा उद्योगक्षेत्रात अनेक वर्षांपासून घडत आहेत. विमा व्यवहारातील व प्रक्रियेतील गुंतागुंत, बाह्य यंत्रणावर (थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्स) असणारे मोठे अवलंबित्व यामुळे विमा कंपन्यांना या धोक्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर ग्राहकांमध्ये विमा योफसजनांबद्दल असलेले अज्ञान आणि विमा ही फायदा नसलेली गुंतवणूक (डेड इन्व्हेस्टमेंट) असल्याचा गैरसमज यामुळे अनेक ग्राहक बनावट योजनांच्या जाळ्यात सापडतात.
खरंच का मी अर्थसाक्षर?
Reading Time: 3 minutesगुंतवणूक क्षेत्रात अनेक क्लिष्ट संज्ञा वापरल्या जातात, त्यांचा अर्थ बऱ्याचशा लोकांच्या डोक्यावरून जातो, त्या सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न फारसा होत नाही, परिणामी गुंतवणूकदाराच्या मनात नेहेमीच काहीशी धाकधूक असते, गुंतवणूक प्रक्रियेवर आपले नियंत्रण नाहीये, समोरच्याचं म्हणणं, त्याचा युक्तिवाद आपल्याला ऐकून घ्यावा लागतोय अशी भावना निर्माण होत असते. आर्थिक साक्षरतेचा आणि अनुभवाचा अभाव ही जरी त्याची लगेच जाणवणारी कारणे असली, तरी ती दूर करण्याबाबतची अनास्था ही अनेकदा गुंतवणूक क्षेत्राविषयीच्या अविश्वासामुळे निर्माण होत असते.
कर्जाच्या नावाने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक !
Reading Time: 3 minutes‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात बिपाशा बसू, राजूला (अक्षयकुमार) एक गुंतवणूक योजना सांगते. गोड बोलून, खोटं चित्र निर्माण करून त्याच्याकडून मोठी रक्कम घेऊन त्याला आणि त्याच्यासह बाबू भैय्या आणि शाम यांनाही फसवते. त्या खोट्या बोलण्याला फसून मोठी ‘रक्कम’ देण्याची ‘किंमत’ तिघेही भरतात. चित्रपटात बघताना हे सगळं गंमतीदार, विनोदी वाटतं. कारण परदुःख शीतल आणि पर-घटना विनोदी वाटतात.चित्रपटातील ‘हेराफेरी’ ही कितीही विनोदी वाटो पण वास्तविक आयुष्यात त्यातील एक टक्का जरी घटना घडली वा प्रसंग उद्भवला तरीही होत्याचं नव्हतं होतं. वास्तविक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळतात. ज्याने विश्वास टाकला, ज्याची प्रत्यक्ष फसगत झाली त्याचं आयुष्य उध्वस्त होत. त्याच्या कुटुंबियांचं, जे प्रत्यक्ष निर्णयात सहभागी नसतात पण त्याच्याशी संबंधित असतात त्यांनांही मोठी झळ पोचते. अशीच एक फसवेगिरीची घटना घडली महाराष्ट्रातच नेवासा, श्रीरामपूर आणि राहूरीमध्ये. येथील अनेक लोकांची फसगत झाली.