गुंतवणुकीसाठी सल्लागार कशाला?

Reading Time: 4 minutesबऱ्याच लोकांना ‘गुंतवणूक सल्लागार’ म्हणजे नक्की काय या विषयी मोठे गैरसमज असतात. त्यांना वाटतं की हे लोक फक्त पैशांची गुंतवणूक करून देतात किंवा फक्त श्रीमंत लोकांनाच त्यांची गरज असते. प्रत्यक्षात एक गुंतवणूक सल्लागार त्याच्या क्लाएन्टना अनेक प्रकारे मदत करत असतो आणि श्रीमंत लोकांपेक्षा त्यांची जास्त गरज मध्यमवर्गीयांना असते. कारण जेवढी आपली संसाधनं मर्यादित तेवढे त्यांचे नियोजन जास्त महत्त्वाचे.

बँका आणि मुदत ठेवींची सुरक्षितता

Reading Time: 3 minutes‘सुरक्षित’ समजल्या गेलेल्या मुदतठेवीमधे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेवर अचानक रिझर्व बँकेने निर्बंध घालून त्यांच्या कर्जवितरणातील घोटाळा उघड केला. त्याचपाठोपाठ शेअर बाजारात सुचीकृत असलेल्या लक्ष्मीविलास बँकेवर देखील निर्बंध लागू झाले. या लागोपाठच्या घटनांनी सामान्य गुंतवणूकदार पुरता भांबावून गेला. 

बनावट वाहनविमा योजनेपासून सावध रहा

Reading Time: 2 minutesबनावट विमा योजना विकून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार विमा उद्योगक्षेत्रात अनेक वर्षांपासून घडत आहेत. विमा व्यवहारातील व प्रक्रियेतील गुंतागुंत, बाह्य यंत्रणावर (थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्स) असणारे मोठे अवलंबित्व यामुळे  विमा कंपन्यांना या धोक्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर ग्राहकांमध्ये विमा योफसजनांबद्दल असलेले अज्ञान आणि विमा ही फायदा नसलेली गुंतवणूक (डेड इन्व्हेस्टमेंट) असल्याचा गैरसमज यामुळे अनेक ग्राहक बनावट योजनांच्या जाळ्यात सापडतात.

विमा पॉलिसी आणि त्यासंबंधीचे तक्रार निवारण

Reading Time: 3 minutesविमा व्यवसाय हा बहुतांशी विक्री प्रतिनिधींमार्फत होत असल्याने, अधिक व्यवसाय मिळवण्याच्या नादात त्यांच्याकडून चुकीची माहिती सांगितली जाण्याची शक्यता असते. यातून तक्रारी निर्माण होवू शकतात. काही दावे विमा कंपन्यांकडून अयोग्य कारणाने नाकारले जाऊ शकतात किंवा अंशतः मंजूर केले जातात. या तक्रारींच्या निवारणासाठी प्रत्येक कंपनीची स्वतःची अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा असून योग्य कालावधीत तक्रार न सोडवली गेल्यास अथवा या संबंधीचा निर्णय मान्य नसल्यास विमा लोकपालाकडे तक्रार करता येते. काही असामाजिक लोकांकडून चुकीचे दावेही केले जातात.

फिटे अंधाराचे जाळे….गुंतवणूक विशेष

Reading Time: 3 minutesLPG म्हणजेच Liberalization, Privatization आणि Globalization. दुर्दैवाने या स्थित्यांतराकडे बघण्याचा दृष्टीकोन सामान्य बचतकर्त्याकडे नसतो. त्याचे कारण वर नमूद केले आहेच. परंतु त्याला छोटीशी का होईना गुंतवणूक सुरु करायची असते. ही सुरुवात मात्र इच्छा, आस की ध्येय हे ठरवता येत नाही. मग पदरी अंधारच पडतो. 

आरोग्यविम्यामधील घोषणेचे महत्त्व

Reading Time: 2 minutesदेशभरात वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तुमच्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य विमा उपयुक्त ठरतो. त्यासाठीच पुरेसे, विनाखंड आरोग्य विमा कवच मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या विमा कंपनीला आवश्यक ती माहिती देणे गरजेचे आहे. 

वैयक्तिक अपघात विमा – काळाची गरज !

Reading Time: 6 minutesएका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. हे पाहता वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे.

गृह विम्याच्या या पाच गोष्टी माहीती असायलाच हव्यात

Reading Time: 3 minutesनैसर्गिक आपत्ती कधीच कोणाला सांगून येत नाहीत. भूकंप,महापूर, वादळे, आग लागणे अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळात स्वतःचा जीव सहीसलामत वाचणे हे महत्वाचे आहेच. सध्या महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यात महापूराने थैमान घातले आहे. धुवांधार पाऊस आणि नद्यांची वाढलेली पाणी पातळी यामुळे गावाच्या गाव महापूराच्या पाण्यात बुडाली आहेत. यामध्ये सर्वात जास्त आणि मोठे नुकसान झाले आहे ते राहत्या घरांचे. घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. ही घरे पुन्हा नव्याने उभी करणे हे तर आव्हान आहेच पण अशा काळात घराचा उतरवणे ही सुद्धा काळाची गरज बनली आहे. 

पुरापासून घराचे संरक्षण

Reading Time: 3 minutesगेल्या काही वर्षात भारतात नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच घराचा विमा उतरवणे हे या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीसारख्या कठीण काळातदेखील आपल्याला आर्थिक पाठबळ मिळून घर पुन्हा उभारता येईल, ही बाब आपल्याला नवी उभारी देऊन जाते.

पिक विमा योजनांचे महत्व

Reading Time: 4 minutesपिक विमा योजनेविषयी उलटसुलट चर्चा होत असली तरी शेतकऱ्यांना संकटात आधार देण्याची त्यातल्या त्यात व्यवहार्य अशी जगात मान्य असलेली ती पद्धत आहे. त्यामुळे अशा योजनांतील त्रुटी दूर करताना शेतकरी अशा योजनांपासून दूर जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली पाहिजे.