शेअर्स खरेदीचं सूत्र

Reading Time: 4 minutesगुंतवणूकदारांचे विविध प्रकार आपण यापूर्वी पाहिले आहेत यात गुंतवणूक कालावधीनुसार रोजच्या रोज व्यवहार करणारे ते डे ट्रेडर्स, मध्यम कालावधी साठी गुंतवणूक करणारे त्यांना पोझिशनल ट्रेडर्स, तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्याना लॉन्ग टर्म ट्रेडर्स असे संबोधण्यात येते. आपल्या  जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार  गुंतवणूकदार व्यवहार करीत असतात.

उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक

Reading Time: 3 minutesबहुसंख्य सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक योजना, दीर्घकालीन महागाईची गृहितके आणि त्याचे परिणाम, आर्थिक उद्दिष्टे इत्यादी संकल्पना आणि त्यासाठी करावी लागणारी आकडेमोड यांचा मनस्वी तिटकारा किंवा अनामिक भीती (Phobia) असते. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे समजूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष किंवा चालढकल करणे चालू राहते. त्यातून चुकीचे पर्याय गुंतवणूक म्हणून निवडले जातात.

आली निवडणूक.. सांभाळा गुंतवणूक …

Reading Time: 2 minutes‘Attack is the best Defence’ या बहुतेकांना माहित विधानाचा व्यत्यास (metathesis) ‘Defence is the best Attack’ असा दृष्टिकोन मांडणारा सदर पोस्ट आहे.  झालेले नुकसान भरुन येणे ही एक नैसर्गिक बाब आहे..मात्र असे नुकसान भरुन येण्याकरिता अतिरिक्त शक्ती खर्च करावी लागते. हे सत्य बाजारालाही लागु होते.

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

Reading Time: 3 minutesसर्व अर्थसाक्षर वाचकांना आता थोडं का असेना हायसं वाटत असेल. कारण कर वाचवा, कर वाचवा असे सारखे येणारे मेसेजेस आणि फोन कॉल्स आता बंद झाले असतील. आर्थिक स्वयंशिस्त असणारे किंबहुना त्याहूनही नसणारे सल्लागार समाज माध्यमातून किती तरी मोठया प्रमाणात ह.भ.प. असल्यासारखे प्रबोधन करत असतात. या समाज माध्यमी मंडळीच बर असतं पहिली पोस्ट राजकीय विषयावर, दुसरी दुष्काळावर, तिसरी प्रेरणादायक चित्रफितीची आणि मग एखादी आर्थिक गुंतवणुकीची… जनजागृती केल्याचं तेवढंच समाधान मिळतं एवढीच यांची शुद्ध भावना.

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा

Reading Time: 4 minutesएन्डोमेंट किंवा मनीबॅकसारख्या पारंपरिक आयुर्विमा पॉलिसी आपल्याला कधीच पुरेसं विमासंरक्षण देऊ शकत नाहीत. बहुतांश वेळा त्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करबचतीसाठी म्हणून विकल्या जातात. म्हणून या पॉलिसी गळ्यात बांधण्यासाठी जे दीर्घकालीन गुंतवणूक आणि आकर्षक परताव्याचं गाजर आपल्याला दाखवलं जातं, त्याचा परामर्श घेऊ.

म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती

Reading Time: 2 minutesआपण अजूनही ठराविक व्याज देणाऱ्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करता का?  मग थांबा हे वाचा, जरा विचार करा आणि म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार हे चुकीचे आहे. म्युच्युअल फंड मध्ये तब्बल ३६ प्रकारच्या योजना असतात. त्यातील १६ योजना शेयर बाजाराशी अजिबात संबंधित नसतात. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य म्युच्युअल फंड योजना निवडा.आपली संपत्ती पुढील ३० वर्षात ३० पट बनवण्यासाठी आपली गुंतवणूक फक्त १२% चक्रवाढ व्याजाने वाढीची आवश्यकता आहे. हे शक्य होऊ शकते म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून.

आयपीएल आणि गुंतवणूक

Reading Time: 3 minutesक्रिकेटच्या तरुण चाहत्यांसाठी गुंतवणुकीच्या काही खास टिप्स. वर्षातून एकदा येणारी आयपीएल मॅच सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. एवढंच काय तर मॅच आपल्याला गुंतवणुकीचे तत्वज्ञान  शिकवून जाते. कशी? अगदी सोपं आहे! आता आयपीएल मॅच दरम्यान तुम्ही खेळाडू ज्या ज्या गोष्टी करतात त्या लक्ष देऊन बघा आणि त्यांना तुमच्या आयुष्यातील आर्थिक घटनांशी जोडून बघा. तुमच्या लक्षात येईल की मॅच मध्ये लागणारी खिलाडूवृत्ती, चिकाटी, आणि  गुंतावूणुकीच्या नियमांमध्ये बरंच साम्य आहे आणि क्रिकेटचा जाणकार एक चांगला नियोजक किंवा गुंतवणूकदार होऊ शकतो.

‘आयपीएल’मधून शिका आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesएक नवीन उत्साहपूर्ण आर्थिक वर्ष सुरु झालंय आणि या वर्षाच्या सुरवातीलाच दोन अत्यंत महत्वाचे उत्सव देशात सुरु आहेत. एक लोकसभा निवडणुका आणि दुसरं आयपीएल मॅचेस! खरंतर यातील एक घटना राजकीय आणि दुसरी संपूर्णपणे क्रीडा किंवा मनोरंजन विश्वातली आहे. मग याचा संबंध नवीन आर्थिक वर्षाशी कसा काय? जरा विचार करा, तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही घटनांमागे ही काही आर्थिक धागे आहेत. या घटना आपल्या आणि पर्यायाने देशाच्या नवीन आर्थिक वर्षाला एक दिशा देऊ शकतात. कसं? हे जरूर वाचा.

नववर्षासाठी ५ महत्वाचे गुंतवणूक पर्याय

Reading Time: 2 minutesआज चैत्र पाडवा! हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या नवीन वर्षात पंचांग पूजनासोबत आपल्या भविष्याच्या तरतुदीचाही संकल्प करा. पारंपरिक सणाच्या मुहूर्तावर गुंतवणुकीच्या आधुनिक, आवश्यक आणि स्मार्ट पर्यायांचाही विचार करा. नवीन आर्थिक वर्षात गुंतवणुकीचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतीलच. नववर्षात गुंतवणूक करताना खालील साध्या, सोप्या पण आवश्यक पर्यायांना प्राधान्य द्या.

संकल्प जुनेच आर्थिक वर्ष नवे

Reading Time: 3 minutes१ एप्रिल २०१९ ला नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पानी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.