म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

Reading Time: 4 minutesशेअर घेऊ की रोखे की कमोडीटी घेऊ याचा गुंतवणूकदाराने विचार करण्यापेक्षा पात्रताधारक फंड व्यवस्थापक गोळा झालेल्या रकमेचे नियोजन करत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक किमान १,००० रुपयांपासून तर मासिक गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरु करू शकतो. काही फंड घराणी मासिक १०० रुपयांपासून देखील गुंतवणूकीची सुविधा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोकड सुलभ असून गरज पडल्यास विना थांबा तुम्ही काढू शकता. म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त इतर गुंतवणूक साधनांमधे एकल जोखीम – एकल परतावा असे धोरण दिसून येते.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी

Reading Time: 3 minutesइक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपला गुंतवणुकीचा कालावधी हा कमीत कमी ५ वर्षे किंवा जास्त असायलाच हवा. अल्पकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी फंडाचा विचार करू नये. गुंतवणूक करताना बाजारातील चढ उताराला न घाबरता इक्विटी फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी. 

शेअर बाजारातील प्राणी

Reading Time: 3 minutesव्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हटले जाते. कोणीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही. त्यामुळे त्यांची गुंतवणूक करण्याची सवय आणि गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असणारच. त्यामुळेच त्यांच्या वर्तनावरून ही नावे दिली असावीत. अर्थात हीच नावे का दिली? ते अगदी ठामपणे सांगता येणार नाही. हे प्राणी म्हणजे बाजारात असलेल्या प्रवाहातील विशिष्ट  गटातील लोकांचा समूह आहे. बाजारातील तेजीचा संबध बैलाशी तर मंदीचा संबंध अस्वलाशी जोडल्याने आणि तेजी मंदीचे चक्र सातत्याने चालू असल्याचे या दोन प्राण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. तेव्हा त्यांच्यासह काही अपरिचित पशु आणि पक्षी या प्रकारांच्या वर्तनांचा गंमत म्हणून मागोवा घेऊयात.

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – दुसरी बाजू

Reading Time: 3 minutesमागील भागात आपण पाहिलं प्रसिद्ध जुळे भाऊ सुरेश आणि रमेश यांचे रस्ते व विचार भाड्याच्या घरात राहायचं की स्वतःच्या; यावरून वेगळे झाले. सुरेशने भाड्याच्या घरात राहून वाचलेले पैसे दुसरीकडे गुंतवण्याचं ठरवलं, तो आपल्या मार्गाने गेला. तर रमेशची कथा मात्र वेगळी होती. रमेशने स्वतःचं घर विकत घेण्याची हिंमत करण्याचं ठरवलं. त्याने गृह कर्ज घेतलं.रमेशने सर्व अभ्यास करून घराचं मासिक भाडं आयुष्यभर देत राहिल्यावर जितका खर्च येईल साधारण तेवढाच किंवा  त्याहून कमी खर्च स्वतःचं घर विकत घेण्यात येईल. सुरवातीला जरी भाड्याच्या घराचं मासिक भाडं इएमआयहुन कमी वाटतं पण येत्या वर्षांत ते भाडं वाढेल. त्यामुळे त्याने गृहकर्जाचा किंवा घरामध्ये रक्कम गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – पहिली बाजू

Reading Time: 3 minutesजर्मनी, इंग्लंड, अमेरिकेत भाड्याच्या घराचं भाडं हे गृहकर्जावरील व्याजापेक्षा जास्त असतं. त्यामुळे या देशांत भाडयाने राहणं परवडत नाही. परंतु भारतात अशी परिस्थिती नाही. भारतात भाड्याच्या घरात राहताना द्यावं लागणारं भाडं गृह कर्जावर भरावं लागणाऱ्या व्याजापेक्षा कमी आहे.

आर्थिक सल्ला न लगे मजला…

Reading Time: 4 minutesबचत अथवा गुंतवणूकीचे पर्याय निवडतांना आपण कुठले निकष लावत असतो? त्यापूर्वी आपली अर्थ-मानसिकता काय आहे, याची पुरेशी कल्पना आपल्याला असते का? गुंतवणूकीचा हवाला कुणावर असतो? स्वतःवर, नशिबावर, देवावर कि सल्लागारावर? गुंतवणूकीतून नेमकं मला काय हवंय? हे ठरवणारे कोण असतं? अशा प्रश्नांची भली मोठी यादी तयार होईल.

भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा

Reading Time: 3 minutesभांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत. या बाबतीत अनेक प्रकारे प्रबोधन होत असूनही एक क्षण असा येतो की व्यक्तिला मोह होतो आणि ती फसते. फसवे दावे करण्यास कायदेशीररित्या बंदी असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.

आयपीएल आणि गुंतवणूक

Reading Time: 3 minutesक्रिकेटच्या तरुण चाहत्यांसाठी गुंतवणुकीच्या काही खास टिप्स. वर्षातून एकदा येणारी आयपीएल मॅच सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. एवढंच काय तर मॅच आपल्याला गुंतवणुकीचे तत्वज्ञान  शिकवून जाते. कशी? अगदी सोपं आहे! आता आयपीएल मॅच दरम्यान तुम्ही खेळाडू ज्या ज्या गोष्टी करतात त्या लक्ष देऊन बघा आणि त्यांना तुमच्या आयुष्यातील आर्थिक घटनांशी जोडून बघा. तुमच्या लक्षात येईल की मॅच मध्ये लागणारी खिलाडूवृत्ती, चिकाटी, आणि  गुंतावूणुकीच्या नियमांमध्ये बरंच साम्य आहे आणि क्रिकेटचा जाणकार एक चांगला नियोजक किंवा गुंतवणूकदार होऊ शकतो.

इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग २

Reading Time: 3 minutesइंटरनेट बँकिंगचा वापर करताना ‘काय करावं’ यापेक्षा ‘काय करू नये’ याची यादी नेहमीच मोठी असते. त्यामुळेच ‘काय करावे?’ या प्रश्नाकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. काही गोष्टी टाळणे जसे महत्वाचे आहे तसेच थोडी अधिक काळजी घेऊन काही गोष्टी केल्या की आपण सुरक्षेच्या वाटेवर अजून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पुढील काही गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असल्याने आवर्जून काळजीपूर्वक करायला हव्यात.

इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा भाग १

Reading Time: 2 minutesसायबर क्राईमच्या (Cyber crime) नोंदींची संख्या आजकाल इंटरनेट वापरकर्त्यांच्या गतीने वाढत चालली आहे, म्हणूनच अधिक अधिक सुरक्षा मिळवत असताना आपण अजून असुरक्षित होतो आहोत! अशा परिस्थितीत सामान्य माणसांनी काय करावं? इंटरनेट बँकिंग सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यातील धोक्यांमुळे बंद करावा? हे सोडून जुन्या, पारंपारिक पद्धतीनेच बँकिंग वापरावी? तर अजिबात नाही!! ‘Prevention is better than cure’  असं म्हटलं जातं. सायबर क्राईम आणि सुरक्षित इंटरनेट बँकिंग च्या पद्धती यांचा थोडासा अभ्यास आणि इंटरनेट बँकिंग वापरताना बाळगलेली जागरूकता खूप मोठी संकटं टाळू शकतात. म्हणूनच जाणून घ्या काय आहेत इंटरनेट बँकिंग च धोके? ते कसे टाळावे? कोणती काळजी घ्यावी?