वेबिनार – “पडत्या शेअर बाजारात SIP बंद करावी का?”

Reading Time: < 1 minuteमंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वा.  Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/89865210901?pwd=TZ-IGeNfmzc Meeting ID: 898 6521 0901 Password: 444444

बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक

Reading Time: 4 minutesगेले काही दिवस भांडवल बाजारात अस्थिरता आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक आपल्या ४२,२७४ वरून २५,६३९ तर, राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १२,४३० वरून ७,५११ पर्यंत तळ गाठून आला. जवळपास ४०% घट ही एकदम अत्यल्प कालावधीत झाली. यापूर्वीही अनेकदा ही वेळ आली आहे त्यातून बाजार सावरला आणि त्यांने पुन्हा उभारी घेतली. यातील सन २००८ मधील मंदीमध्ये निर्देशांकात ६०% घट झाली होती. देशी आणि परदेशी वित्तसंस्थाचा कल बाजारास हेलकावे देत असतो. त्यांना आपल्या गुंतवणुकीवर फक्त नफाच मिळवायचा असल्याने उपलब्ध सर्व मार्गांचा  वापर त्यांच्याकडून केला जातो. 

कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?

Reading Time: 3 minutesएस.आय.पी मार्फत गुंतवणूक केल्यास आपण जोखीम कमी करू शकतो. मात्र त्या जोडीला चांगला परतावा मिळविण्यासाठी आणखी काय करता येईल ते आपण पाहू. एस.आय.पी मार्फत म्युच्युअल फंडात जोडल्या गेलेल्या नवनवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाबद्दल विश्वास आणखी कसा वाढेल, हा या लेखामागचा उद्देश. 

मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट ! 

Reading Time: 3 minutesकोरोना विषाणू चीनमध्ये कसा उत्पन्न झाला, तो जगात आणखी किती जणांचे बळी घेणार, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था उध्वस्त होणार का, या साथीतून जगाची सुटका कशी होणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घनतेचा (दर चौरस किलोमीटरला ४२५ माणसे) विचार करता जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताचे या संकटात काय होणार, या चिंता सध्या प्रत्येकाला सतावत आहेत. मानवजातीला या अभूतपूर्व चिंतेतून दूर करण्यासाठी आणि जगाची चाके पुन्हा फिरण्यासाठी माणूस प्रयत्नशील आहे आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपला नजीकच्या काही दिवसांचा दिनक्रम ठरविणे, एवढेच आज आपल्या हातात आहे. 

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग २

Reading Time: 3 minutesमागील भागात आपण शेअर बाजाराच्या इतिहासाची माहिती घेतली. या भागात आपण स्टॉक एक्सचेंज आणि ट्रेडिंग व शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. शेअर बाजाराचा गुंतवणूकदारांशी थेट व्यवहार होत नाही. स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ट्रेडिंगचा परवाना असलेल्या व्यक्तीला स्टॉकचे शेअर्स खरेदी किंवा करण्याची परवानगी दिली जाते. आपल्याला एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करावयाचे असतील, तर आपल्या ब्रोकरशी संपर्क साधावा लागतो. 

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग १

Reading Time: 3 minutesसध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्व देशांच्या शेअर बाजाराची अवस्था बिकट झाली आहे. गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. बाजाराची पडझड सातत्याने चालू आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल अगोदरपासूनच नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या आपल्या समाजात याबद्दल गैरसमज वाढत चालले आहेत. पण परिस्थिती समजून घेऊन, पूर्वग्रहदूषित विचारांना बाजूला सारून, शांत राहून बाजार वर येण्याची वाट बघत राहणे एवढेच गुंतवणूकरांच्या हातात असते. लक्षात ठेवा परिस्थिती सतत बदलत असते. उंच शिखरावर गेल्यावर खाली येण्याशिवाय पर्याय नसतो. बाजाराचेही तसेच असते. त्यामुळे घाबरून न जाता बाजार वर येण्याची वाट बघा.  

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

Reading Time: 3 minutesकोरोना व्हायरस भारतात चीन, इटली व इराण सारखा पसरू नये व रुग्ण संख्येत वाढ होऊ नये म्हणून सरकारने मॉल्स, शाळा, कॉलेजेस व गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. साहजिकच आर्थिक उलाढाल थंडावणार आहे. शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांची विक्री कमी होऊन नफ्यावरचा विपरीत परिणाम नक्की आहे. याचाच धसका शेअर बाजाराने घेतला असून, गेल्या काही दिवसांपासून निफ्टी व सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक कोसळत आहेत.

मन तळ्यात मळ्यात “निर्देशांकांच्या” सापळ्यात….

Reading Time: 3 minutesकोविड -१९ (कोरोना व्हायरस) च्या प्रसारामुळे आणि त्याच्या प्रभावांसह जगातील सर्वच बाजारपेठा कमी अधिक प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसत आहे. अद्याप संक्रमणाच्या वेगाने, संक्रमित देशांमध्ये आणि त्या संक्रमणांच्या तीव्रतेशी संबंधित बाजारपेठांवर परिणाम त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे आढळत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून (फेडकडून) अर्ध्या टक्क्याच्या व्याजदर कपती बरोबरच इटालियन सरकारने जाहीर केलेल्या घोषित टाळेबंदीमुळे भांडवली बाजारांना आश्चर्यचकित केले.

प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुंतवणूक करणे झाले अधिक सुरक्षित

Reading Time: 2 minutesउद्योगातील तज्ञांच्या मते, भांडवली बाजारपेठेत यशस्वीरित्या मजल मारण्याची गुरुकिल्ली म्हणजे डेटा आणि त्यातील खाचखळगा समजून घेणे. पण हेच मुद्दे गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे कारण ठरू शकतात. कारण कोणत्याही सामान्य माणसाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरील वर्तमान आणि इतिहासातील डेटाचा अभ्यास करणे कठीण आहे. मात्र तंत्रज्ञानामुळे हा गुंता सोडविण्यास मदत झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक वित्तीय मंच गुंतवणुकीचे जग अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाणून घेऊयात या विविध मार्गांबद्दल.

आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसचा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध

Reading Time: 2 minutesस्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीच्या एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसचा आयपीओ (IPO) २ मार्च ते ५ मार्च पर्यंत विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे.  कंपनी एकूण १३.७१ कोटी शेअर्सची विक्री करून १०,३४१ कोटी रुपयांपर्यंत भांडवल जमा करू शकेल. प्रति शेअर ७५० – ७५५ एवढी किंमत असून किमान १९ शेअर्सची खरेदी करावी लागेल. म्हणजेच किमान १४,२५० रुपयांचे शेअर्स खरेदी करावे लागतील. अँकर, पात्र संस्थागत खरेदीदार, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार, किरकोळ, एसबीआय शेअरधारक आणि कर्मचारी अशा सहा वेगवेगळ्या प्रकारातील गुंतवणूकदारांसाठी स्वतंत्र समभाग कोटा ठेवण्यात आला आहे.