Arthasakshar ways to success 2
Reading Time: 3 minutes

अपयशाकडून यशाकडे नेणारे मार्ग -भाग २ 

आपण याआधी पाहिलेले यशाचे मार्ग अंगिकारताना अनेक समस्यांना आपल्याला तोंड देऊन मात करावी लागणार आहे पण याचे दूरगामी परिणाम हे नेहमीच उपयुक्त ठरणारे असणार आहेत. “अपयशाकडून यशाकडे नेणारे मार्ग” या लेखमालेच्या दुसऱ्या भागात असेच आणखी काही मार्ग आपण पाहूया.

अपयशाकडून यशाकडे नेणारे १५ मार्ग – भाग १

अपयशाकडून यशाकडे नेणारे मार्ग-

६. संयम: 

  • अनेकजण अनेक स्वप्न पाहतात, खूप मोठी स्वप्न पाहतात पण जेव्हा त्यांच्या उंचीचा अंदाज येतो तेव्हा मात्र ते बिथरतात.
  • प्रयत्नांना यश येत नसेल, तर अनेकजण पटकन निराशदेखील होतात. 
  • मोठी स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही. 
  • बऱ्याचदा तात्पुरते नैराश्य येणे साहजिक असते, परंतु आपण ठरवलेले छोटे छोटे मैलाचे दगड पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरतात.

७. ‘सोडून देण्याच्या’ वृत्तीवर ईलाज: 

  • प्रयत्न करण्याची वृत्ती सोडून देणे अर्थातच अपयशासाठी कारणीभूत ठरते. 
  • अशा वृत्तीचे लोक सातत्याने अपयशी होतात कारण ते पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करतच नाहीत. 
  • फार कष्ट न घेता यश मिळेल अशी धारणा करणाऱ्यांसाठी हे अगदी अशक्य नसले तरी अशी क्वचितच उदाहरणे असतात. 

ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

८. इतरांचे सल्ले ऐकून घेण्याची सवय: 

  • इतरांचे सल्ले ऐकून घेण्याने अनेकदा आपल्याला न उमजलेल्या गोष्टीही उमजतात आणि पुढचे नियोजन अधिक बिनचूक होऊन कार्य सिद्धीस जाण्याची शक्यता वाढते. 
  • इतरांचे मत, सल्ले विचारात न घेता त्यांच्याशी वाद घालून अनेकदा अपयशी ठरवूनही आपणच कसे योग्य आहेत हे सिद्ध करायचा प्रयत्न केला, तर मात्र आपले शुभचिंतक आपल्यापासून नक्कीच दुरावतात. 
  • अशा लोकांना इतर लोकांचे सल्ले म्हणजे ते त्यांच्या चुका दाखवत आहेत असा गैरसमज होत असतो. शक्य तितक्या लवकर अशा वृत्तीवर मात करणे आवश्यक असते. 

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

९. मागच्या चुकांमधून शिकणे: 

  • अनेकदा अपयशातून आलेले नैराश्य असे असते की त्यातून लवकरात लवकर बाहेर पडणे हे एकच ध्येय अपयशी लोक बाळगतात, परंतु त्यामुळे त्या अपयशातून मिळालेला महत्वाचा धडा मात्र विसरला जातो. त्यामुळे त्याच त्याच चुका परत परत केल्या जाण्याची शक्यता मात्र बळावते.
  • चुका विसरण्यापेक्षा त्यांचा नीट अभ्यास करणे, नक्की कुठे व का चूक झाली हे समजून घेणे, पुढचे पाऊल यशस्वी होण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरते.

या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे…

१०. विचलिततेवर विजय मिळवणे: 

  • आजूबाजूच्या विचलित करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती यशासाठी फार फायद्याची. 
  • यांना हाताळण्याची पद्धत एकत्र तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाऊ शकते किंवा अगदी तळागाळाही नेऊ शकते. 
  • विचलित होण्याची अनेक साधने कायम आपल्या सोबत असतात म्हणजे सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर असे अनेक आणि त्यामध्येच गुंतून राहिलं, तर आपल्या ध्येयापासून आपण दूर जाऊ. पण तेच यावर विजय मिळवला तर मात्र आपण जास्तीत जास्त सक्रिय राहून आपल्या ध्येयाच्या जवळ जाऊ शकू.

११. ‘चालढकल’ टाळणे: 

  • चालढकल करण्याची वृत्तीची २ प्रकारची असू शकते, एक म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्यातच काही ना काही निमित्त काढून विलंब करत राहणे. 
  • दुसरी म्हणजे सुरुवात केल्यावर एखादी छोटीशी समस्याही सामोरं आली, तर त्यापुढे माघार घेऊन पुढे जाण्यासाठी चालढकल करत राहणे.
  • सतत येणाऱ्या आव्हानांमुळे आलेली समस्या सोडवून पुढे न जाता चालढकल करण्याची वृत्ती वाढते. 
  • या वृत्तीपासून लांब राहून जोशाने येणाऱ्या अडचणींवर मात करत पुढे जाणे हेच योग्य.

तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?…

१२. माणुसकी: 

  • अनेक यशस्वी लोकांच्या मते, माणुसकी हा अत्यंत महत्वाच्या स्वभावांपैकी एक आहे.
  • एका संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की विनम्र लोक यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.
  • विनम्रतेमुळे आपली शक्तिस्थाने, कमजोरी व मर्यादा समजून घेणे आणि त्यांचा योग्य वापर कारणे जास्त सोपे होते.

१३. जबाबदारी घेणे: 

  • आपल्या आयुष्यात घडणाऱ्या आणि आपण त्याबद्दल घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी जर आपण घेत नसू, तर आपण यशस्वी होणे कठीणच. 
  • सतत प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना समोर करणे नाहीतर परिस्थिती, नशीब यांच्यावर खापर फोडण्याच्या स्वभावामुळे प्रगती थांबते. 
  • आपल्या कृतीची आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी आपण घेण्याची वृत्ती अंगिकारल्यावर मात्र आलेल्या अडचणींवर मात करून पुढे जाणे सहजसाध्य होते.

तुमची कामे वेळेत पूर्ण करण्याचा जादुई मार्ग – हॉफ्सटॅडर सिद्धांत…

१४. प्रवाहाविरुद्ध जाण्याची हिम्मत: 

  • प्रवाहाबरोबर जाणे सर्वांत सोपे, पण त्यामुळे इतरांनी जे अनुभवलं तेच आपल्याही मिळेल.  
  • जर परिणाम वेगळे हवे असतील, तर वाटाही वेगळ्याच निवडाव्या लागतात. 
  • आजूबाजूचा समाज प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्यांसाठी अनेक अडथळे निर्माण करतच असतो, परंतु त्यावर मात करत ठरवलेल्या मार्गावर पुढे चालत राहणे हे गरजेचे.

१५. लोकांच्या संपर्क क्षेत्रात राहणे: 

  • सतत आपल्या उपयोगाच्या लोकांच्या संपर्कात, सान्निध्यात राहण्याने अनेक संधी आपोआपच उपलब्ध होत जातात. 
  • अनेकजण याला महत्व देत नाहीत आणि चांगल्या संधींना मुकतात. यामुळे आपल्याला आवश्यक असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचणे सोपे जाते.

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –