Reading Time: 3 minutes

मुलाखती साठी जाणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक मोठी सुरुवात ! तुम्ही आजपर्यंत शिकलेत ते पुस्तकी ज्ञान प्रत्यक्षात उतरवण्याची संधी तुमच्यासमोर आहे. तुम्ही मुलाखतीसाठी जाताना त्यात यश मिळणे हे तुम्ही त्या संधीकडे कसे पाहताय यावर अवलंबून असते. तुम्हाला या महत्वाच्या वळणावरून जातांना आजच्या लेखाचा नक्कीच उपयोग होईल.  (Interview Tips in Marathi / Important Interview tips)

मुलाखतीची तयारी कशी कराल? (Basic Preparation for Interview) 

  • तुम्ही जी नोकरी शोधत आहात, ती कुठल्या प्रकारची असेल, तिथे काम कुठल्या स्वरूपाचे असेल? तुमच्या कलागुणांना संधी मिळणे अपेक्षित असेल तर तशाच प्रकारच्या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करताय का? या सर्वांचा विचार तुम्ही आधी केलेला पाहिजे.
  • कंपनीमधील अधिकारी तुम्हाला मुलाखती दरम्यान तुमच्या कार्यक्षेत्रातील तसेच विविध विषयातील प्रश्न विचारू शकतात. 
  • कंपनी बद्दल तुम्हाला काय माहिती आहे, हे सविस्तरपणे विचारू शकतात. यासाठी तुम्हाला मुलाखतीसाठी विशेष तयारी करून जाणे गरजेचे असते.
  • ज्याप्रमाणे नोकरी वर रुजू झाल्यावर त्यासाठी लागणारे कौशल्य आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो तसेच नोकरी मिळण्यासाठी देखील तयारी करणे आवश्यक असते.
  • तुमच्या बोलण्यातील आत्मविश्वासावरून तुम्ही तयारीनिशी आले आहे की नाही हे दिसून येते  त्यामुळे मुलाखतीमध्ये यश मिळण्याची संधी अधिक असते. (Interview preparation for freshers in marathi)

  • सरावाचे महत्व ! 

Practice Makes A Man (And A Woman) Perfect

  • कुठल्याही गोष्टीचा सराव तुम्हाला प्राविण्य मिळवायला मदतच करतो.
  • तुम्ही मुलखतीला जाण्यापूर्वी देखील घरी सराव (practice ) केला तर तुम्ही कुठे चुकत आहे, कुठे अजून चांगल्या प्रकारे बोलू शकता हे लक्षात येईल.
  • कुठले प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देणार हे काही ठोकताळे आधीच बंधता आले तर त्याचा उपयोग तुम्हाला निश्चित होईल.( futuristic approach )

हे वाचा : मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

 

  • मुलाखतीमध्ये तुमच्या चांगल्या – वाईट गोष्टींचे विश्लेषण करा- (SWOT analysis in interview) 
  • यालाच आपण SWOT पद्धत म्हणतो ज्यात

SStrength  

WWeakness

O Opportunity 

T Threat

या वरील गोष्टींचा समावेश होतो. 

  • यावरून तुम्ही मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याला तुमच्या मधील गुण ,दोष सांगू शकता जेणेकरून त्यांना तुमच्या वर जबाबदारीची कामे सोपवू शकतो की नाही याचा अंदाज येतो.
  • Opportunity  आणि Threat  यावरून तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही किती चांगल्या प्रकारे हाताळू शकता तसेच भविष्यात कुठल्या गोष्टी करायला तुम्ही अजून तयार नाही या सर्व गोष्टींची कल्पना येते.

 

  • कंपनी बद्दल माहिती कुठून मिळेल? (Source of information)
  • आजकाल इंटरनेट मुळे फेसबुक,इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती मिळते.
  • कंपनीची वेबसाईट यासाठी तुम्हाला अगदी सोपा मार्ग आहे. यामध्ये तुम्हाला कंपनीची स्थापना कधी झाली, कोणी केली, कोणत्या हेतू साठी झाली इथपासून ते त्याचे कुठले उत्पादनं आणि सुविधा बाजारात उपलब्ध आहेत ही माहिती सविस्तरपणे दिलेली असते.
  • कंपनीचे मालक,वरिष्ठ अधिकारी यांची नावे आणि त्याची कामाचे स्वरूप हे देखील वेबसाईट वर दिलेले असते.
  • कंपनीचे मुख्यालय कुठे आहे, कंपनीचा विस्तार किती आहे, कुठल्या देशात अथवा राज्यात आहे ही  माहिती असणे गरजेचे आहे.( Company’s head office and branches )

 

  • तुमच्या कामाच्या स्वरूपाशी संबंधित असलेले ज्ञान- (Facts related to interview)
  • तुमच्या कामाबद्दल तुम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही, त्याचा वास्तविक जीवनात कसा आणि कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो हे तुम्हाला समोरच्या व्यक्तीला समजून सांगता आले पाहिजे. 
  • आधुनिक तंत्रज्ञानाशी (modern technology and interview) निगडित तुमच कार्यक्षेत्र असेल तर त्याच प्रात्यक्षिक करून दाखवण्यावर भर असला पाहिजे.
  • बाजारात असणाऱ्या नवीन नवीन कल्पना आणि तंत्र तुम्ही आत्मसात केलेले आहे का हे सांगणे अपेक्षित असते.
  • कुठल्या एका प्रकारात प्राविण्य मिळवलेले असेल तर ते आवर्जून सांगावे यामुळे तुम्ही इतर सहभागी उमेदवारा मध्ये उजवे ठरू शकतात. 

महत्वाचे : वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

  • मुलाखतीच्या दिवशी ही काळजी घ्या. ( points to be remembered ) 
  • तुमची सर्व कागदपत्रे, मूळप्रत आणि फोटोकॉपी (म्हणजे झेरॉक्स) व्यवस्थित क्रमवारीने लावलेले आहेत का याची काळजी घ्या, जेणेकरून मुलाखतीदरम्यान काही कागदपत्रांची विचारणा केल्यास अगदी सहजपणे तुम्ही काढून देऊ शकता. यावरून तुमचा व्यवस्थितपणा दिसून येईल.( Original certificates and its photocopies for Interview)
  • गोंधळलेल्या अवस्थेत चुकीची कागदपत्र हातात आली तर ती वेळेवर शोधात बसणे आणि

कागदपत्र अस्ताव्यस्त होणे हे समोरील अधिकाऱ्यास असभ्य वर्तन वाटू शकते.

    • मुलाखतीच्या वेळेस मोबाईल बंद ठेवा. प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये तुमचे वर्तन योग्य असेल याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
    • तुमचा पोशाख हा मुलाखतीसाठी साजेसा असेल याची खात्री करून घ्या.रंग, ड्रेस वरील प्रिंट अशा बारीक सारीक गोष्टीचा विचार करणे गरजेचे असते. ( suitable dress for the interview )
  • बाह्यरूप हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो.तुम्ही कसे बोलता, काय पोशाख घालता याचे निरीक्षण केले जाते आणि तुमच्या बद्दल काही अंशी मत बनवले जाते.

 

  • मुलाखतीचे प्रकार – (Types of interview)
  • आजकाल प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मुलाखत म्हणजेच टेलिफोन किंवा विडिओ यांचा उपयोग करून मुलाखत घेतली जाते. ( Telephonic interview )
  • तेव्हा अशा वेळेस तुम्ही अधिक सतर्कतेने मुलाखतीस सामोरे जाणे आवश्यक असते. तुमचे बोलणे, तुमचे विचार योग्य प्रकारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असते.
  • कमी वेळेत,मोजक्या शब्दात तुमचे म्हणणे समजून सांगता आले पाहिजे. जेणेकरून तुमच्या बद्दल निर्णय घेताना मुलाखत घेणारा ठामपणे निर्णय घेऊ शकेल. (Tips for telephonic interview )
  • तुमचा आवाज – आवाजातील चढ-उतार , आवाजाची तीव्रता , बोलण्याची स्पीड ह्या गोष्टी नक्कीच तुमच्या फोन वरील संभाषणाचा महत्वाचा भाग होऊ शकतात. 

 

निष्कर्ष : 

  • मुलाखत देणे आणि त्याचा अनुभव घेणे यातून बरेच काही शिकता येते.
  • आत्मविश्वास (confidence) आणि कष्टाला ( hard working ) सामोरे जाण्याचे धाडस यश नक्की मिळवून देते.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutesआजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.