Reading Time: 3 minutes
“I fear the day that technology will surpass our human interaction. The world will have a generation of idiots.”
(“मला भीती वाटते की एक दिवस तंत्रज्ञान मानवी सुसंवाद संपवेल आणि त्यानंतर जगात मूर्ख लोकांची पिढी तयार होईल.”)
वरील वाक्य अलबर्ट आईन्स्टाईन यांनी लिहिले आहे की नाही हा वाद जुना आहे, पण हे वाक्य ज्यांनी कोणी लिहिले असेल त्यांच्या चाणाक्ष नजरेला झपाट्याने वाढणाऱ्या टेक्नॉलॉजिचा होणारा दुष्परिणाम आधीच जाणवला होता. आज मोबाईल किंवा स्मार्टफोन नावाचं यंत्र ही भीती सार्थ ठरवीत आहे.
कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?
जिंदगी मोबाईल हैं-
- सकाळच्या गजरापासून अगदी रात्रीच्या जेवणाच्या ऑर्डरपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण मोबाईलवर अवलंबून असतो.
- तिकीट बुकिंग असो वा कपडे खरेदी, बँकिंग असो व ग्रोसरी शॉपिंग, गाणी ऐकणं असो वा चित्रपट पाहणे आजकाल सगळं मोबाईलच्या एका क्लिकवर होत असतं. यामुळे पूर्वीच्या काळी ज्या गोष्टींसाठी गर्दीतून वाट काढत किंवा रांगेत उभं राहून ताटकळावं लागायचं, त्याच गोष्टी आज एका क्लिकवर सहज शक्य होत आहेत.
- तुम्ही बाहेर असलात, तरी मोबाईलवरून ऑफिसची कामं मॅनेज करू शकता. तसंच, ऑफिसमधून मुलांशी किंवा कुटुंबातील जवळच्या व्यक्तींशी, तुमच्या मित्र मैत्रिणींशी सहज संवाद साधू शकता.
- एक मोबाईल घड्याळ, कॅमेरा, म्युझिक प्लेअर, टीव्ही, रेकॉर्डर, फोन, रस्तादर्शक, कॅल्क्युलेटर, इत्यादी कितीतरी यंत्रांची कामे करत असतो.
कसे कराल कामाच्या वेळेचे नियोजन? वाचा हे ६ नियम
‘म’ मोबाईलचा का मजेचा?
- मोबाईल नावाच्या जादुई यंत्राच्या आहारी गेलेला माणूस फक्त मोबाईलच्या दुनियेत वावरत असतो.
- ऑफिसमध्ये रंगणारे खरेखुरे गप्पांचे फड, गॉसिप्स आता व्हाट्स अप ग्रूपवर रंगतात.
- कॉलेज कट्ट्यांवर गप्पा मारणारे घोळके आता मोबाईलमध्ये डोकावून पब्जी खेळत किंवा कुठल्यातरी सोशल मीडिया साईटवर ‘चॅट’ करत एकमेकांशी बोलत असतात.
- बसस्टॉप, सरकारी ऑफिस, बँका, हॉस्पिटल अशा सार्वजनिक ठिकाणी जिथे हमखास नवीन ओळखी व्हायच्या. पण अशा ठिकाणी जवळपास प्रत्येकजण आपआपला मोबाईलमध्ये गर्क असल्याचं चित्र बघायला मिळतं. अगदी आपल्या बाजूला बसलेली व्यक्ती स्त्री आहे का पुरुष हे सुद्धा माहिती होत नाही.
- अगदी मिटिंग किंवा घरगुती गप्पा गोष्टी चालू असतानाही अर्ध लक्ष मोबाईलमध्ये असतं. मोबाईल मॅनर्स हा एक स्वतंत्र लिहावा एवढा मोठा मुद्दा आहे.
- हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा घरी काही नवीन खाद्यपदार्थ बनवल्यावर आधी ‘फोटोबा’ केला जातो मग तो पदार्थ खाल्ला जातो. त्याचा आस्वाद घेतलाच जात नाही, कारण त्याचवेळी सोशल मीडियावर आलेल्या लाईक्सची गणती आणि कमेंट्सना रिप्लाय देणं चालू असतं.
- बाहेर फिरायला गेल्यावर त्या ठिकाणाचा आनंद लुटण्यापेक्षा पटापट मोबाईल क्लीक्स घेतले जातात. फोटोमध्ये आठवणी नाही तर सोशल मिडियावरचे लाईक्स आणि कमेंट्स सेव्ह होत जातात.
तुमची कामे वेळेत पूर्ण करण्याचा जादुई मार्ग – हॉफ्सटॅडर सिद्धांत
मोबाईल एक व्यसन:-
- मोबाईलमुळे “दुनिया मुठ्ठीमें” आली आहे, पण हातातून बरंच काही निसटून चाललं आहे. मोबाईलचं व्यसन दारू, सिगारेटपेक्षाही भयंकर स्वरूप घेत आहे. दर १५ मिनिटांनी सोशल मीडिया चेक करायचं व्यसन नाही, अशी व्यक्ती सापडणं जरा कठीणच.
- ऑफिसमध्ये काम करताना, जेवताना, टीव्ही बघताना इतकंच काय तर, अनेकांना रात्री झोपेतून जाग आल्यावरही मोबाईल बघायची सवय असते.
- मोबाईल हरवला या कल्पनेचाही धक्का घेणारे कमी नाहीत.
- मोबाईलमुळे अपघात होतात, मोबाईलमुळे आरोग्यावर परिणाम होतो. नॅशनल सेफ्टी कौन्सिलच्या रिपोर्टनुसार वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्याने दरवर्षी जवळपास १.६ दशलक्ष अपघात होतात.
- या साऱ्याचा परिमाण कळत नकळत आपल्या कार्यक्षमतेवरही होतो आहे. या साऱ्यात माणसातले माणूसपण हरवत चालले आहे.
काय आहे पॅरेटो सिद्धांत? (८०/ २० चा नियम)
टेक्नोफिअरन्स (Technoference):-
- मोबाईलने जिथे प्रत्येकाचं आयुष्य व्यापून टाकलं आहे तिथे नातेसंबंधाची सुटका कशी होणार?
- विवाहित जोडप्यांमध्ये वादाच्या मुख्य कारणांच्या लिस्टमध्ये सेक्स, पैसा आणि मुलं यासोबत आता मोबाईल हे एक प्रमुख कारण बनलं आहे.
- घरात बाजूला बसलेल्या माणसांशी बोलायला वेळ नसतो पण आभासी जगातील व्यक्तींशी तासन् तास चॅटिंग केलं जातं.
- मुलांचा त्रास नको म्हणून त्यांच्याशी संवाद साधला जात नाही, तर त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो.
- फक्त पती पत्नीमध्येच नाही, तर इतर नात्यांमध्येदेखील मोबाईल हे वादाचं मुख्य कारण ठरतंय
- एकत्र बसून खाण्याचा, चर्चा करण्याचा, फिरण्याचा अगदी टीव्ही बघण्यातला आनंदही मोबाईलमुळे हरवत चालला आहे.
मोबाईल ही एक चमत्कारी टेक्नॉलॉजी आहे. पण त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा मोबाईल माणसांसाठी आहे, माणूस मोबाईलसाठी नाही.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Share this article on :