“गुगल” हे एक सर्च इंजिन आहे, म्हणजे इंटरनेटवरील एक संकेतस्थळ ज्यावर कुठल्याही विषयाची माहिती असो किंवा तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर मिळते. खाण्यासाठी उत्तम हॉटेल शोधण्यापासून ते चांगला लाँड्रीवाला भैया शोधण्यासाठी हे गुगल कायम आपल्या मदतीसाठी सज्ज असतं. या हॉटेल्स किंवा या सोयी सुविधांची माहिती गुगलवर येते कुठुन? तर याचं उत्तर म्हणजे व्यावसायिक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, जास्तीचे गिऱ्हाईक खेचण्यासाठी, जाहिरातीसाठी “गुगल माय बिझनेस” या गुगलमार्फतच चालू झालेल्या टूलचा वापर करतात. थोडक्यात सर्व व्यावसायिकांसाठी हक्काचं व्यासपीठ म्हणजे “गुगल माय बिझनेस”.
विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग १
गुगल मॅप हे आपला व्यवसाय अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया सारखंच एक माध्यम आहे. या गुगल मॅपवर व्यवसायिक आपल्या व्यवसायाची माहिती व फोटोज टाकू शकतात. व्यवसाय वाढीसाठी व लोकप्रिय होण्यासाठी गुगल मॅप वापरणे फायद्याचे ठरते.
तुमचा व्यवसाय गुगल मॅपवर सूचिबद्ध करणे का महत्त्वाचे आहे?
- गुगल मॅप हे गुगलमधील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फिचर्सपैकी एक आहे. हल्ली कोणतीही गोष्ट लवकर सापडत नसेल तर लगेच , “ए गुगल मॅपवर बघ रे..! ” असं आपोआप तोंडून बाहेर पडतं . १० पैकी ७ जण गुगल मॅपचा रोज वापर करतात. म्हणून व्यवसाय वाढीसाठी, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी तुमचा व्यवसाय गुगल मॅपवर सूचिबद्ध करणे आवश्यक आहे.
- आज भारतातील लाखो व्यवसाय गुगल मॅपवर दिसतात, त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी गुगल मॅप नक्कीच मदत करते.
विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २
गुगल माय बिझनेस लिस्टिंग –
- गुगल माय बिझनेस हे व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय ऑनलाईन नेण्यासाठी महात्वाचं माध्यम आहे. व्यवसायाचा प्रोफाईल सोशल मीडियावर असणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच गुगल माय बिझनेसवर व्यवसायाची नोंद करून ऑनलाईन लिस्टिंग होणे महत्त्वाचे आहे.
- मात्र सोशल मिडीयाच्या पोस्ट्सप्रमाणे हे ऑनलाईन लिस्टिंग कायम राहत नाही, दर ७ दिवसांनी हे हटवण्यात येऊ शकतं, म्हणून व्यवसायिकांना त्यांनी दिलेल्या माहिती व फोटोंच पुनरावलोकन (updation)करावं लागतं.
- जेव्हा कोणी तुमचा व्यवसाय गुगलवर सर्च करेल त्यावेळी उजव्या कॉलममध्ये व्यवसायाची माहिती दिसते यालाच लिस्टिंग असं म्हणतात.
गुगलवर व्यवसाय लिस्टिंग कसे करतात?
गुगल माय बिझनेसवर व्यवसायाची नोंद करण्यासाठी तुमचं जीमेल अकाऊंट असणं आवश्यक आहे.
भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग १
लिस्टिंग करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या :
- गुगल माय बिझनेस हे गुगलवर सर्च करा व क्रिएट न्यु लिस्टिंग (Create New Listing) ओपन करा.
- साईन-अपवर क्लिक करून तुमच्या व्यवसायाची सर्व माहिती भरा.
- व्यवसायाची सर्व माहिती व पत्ता या गोष्टी नमूद करा.
- व्हेरिफाय युअर बिझनेसवर क्लिक करा.
- गुगलद्वारे सर्व माहिती तपासण्यात येते म्हणून बिझनेस व्हेरिफिकेशन साठी १-२ आठवडे लागू शकतात.
भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २
गुगलवर व्यवसायाची नोंद करणे महत्त्वाचे आहे का?
- गुगलवर लोकल सर्चिंग मोठ्या प्रमाणात होत असते. प्रगत राष्ट्रांबरोबरच भारतातही स्थानिक गोष्टी सर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे. यातले जास्त सर्च व्यवसायाशी निगडित असतात. म्हणून हल्लीच्या व्यवसायिकांना गुगल लिस्टिंग नसणे परवडण्यासारखे नाही.
- गुगल लिस्टिंग करताना आपल्या व्यवसायाची माहिती व फोटो देऊन ग्राहकांना आकर्षित करता येऊ शकते, तसेच ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येतो.
फ्रेंचाइजी व्यवसायाबद्दल सर्वकाही – भाग १
तुमच्या व्यवसायाची गुगल रँकिंग बिझनेस ऑप्टिमायझेशन –
व्यवसायाची ऑनलाइन नोंद असणं ही डिजिटल जगात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या व्यवसायाची माहिती किंवा सेवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी ,व्यवसायाचे नाव गुगलच्या पहिल्या पृष्ठावर येणे अत्यंत महत्वाचे आहे.
बिझनेस ऑप्टिमायझेशन करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या :
- तुमच्या व्यवसायाचं गुगल लिस्टिंग करा -गुगलवर लोकल सर्च करून तुमच्या व्यवसायाचा तपशील दिसतो आहे का तसेच तुम्हाला व्यवसायाचे मालक म्हणून नोंदवण्यात आले आहे का, हे पुन्हा तपासून पहा. काही चूक असल्यास नोंद करून घ्या.
- गुगल माय बिझनेसवर तुमच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती भरा -व्यवसायाची माहिती देताना ,पत्ता,फोन नंबर ,तुम्ही देत असलेली सेवा व सुविधा ,तुमच्या उत्पादनाची अचूक माहिती प्रविष्ट करा.
- व्यवसायाची मोबाईल फ्रेंडली वेबसाईट बनवा – गुगल माय बिझनेसचे काही टूल्स वापरून तुम्ही तुमच्या व्यवसायाची छान वेबसाईट तयार करू शकता तेही काही मिनिटात. हो, याद्वारे तुम्ही विनामूल्य वेबसाईट बिल्डर वापरून मोबाइलवरूनही व्यवस्थित दिसेल अशी मोबाईल फ्रेंडली वेबसाईट तयार करून, या प्रोफाईलद्वारे ग्राहकांना शेअर करू शकता .
- आपल्या ग्राहकांना तुमच्या सेवांविषयी ऑनलाईन रिव्ह्यूज (Reviews) द्यायला सांगा – ग्राहकांना सकारात्मक किंवा नकारात्मक ऑनलाईन रिव्हयुझ देण्यासाठी प्रोत्साहित करा अधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी तुमच्या व्यवसायाचे नळीने रिव्ह्यूज सकारात्मक असणे आवश्यक आहे.
- व्यवसायाच्या संबंधित फोटोज व काही ऑफर्स असतील तर त्याची नोंद करा – खरेदी करताना लोक त्या प्रॉडक्टचे फोटोज पाहूनच आकर्षित होतात. म्हणून तुमच्या व्यवसायाचे फोटोज असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ तुमचं हॉटेल आहे ,तर हॉटेलचे आकर्षित करणारे फोटोज पाहून ग्राहकांचा प्रतिसाद वाढतो.
फ्रेंचाइजी व्यवसायाबद्दल सर्वकाही – भाग २
गुगल माय बिझनेस टूल वापरण्याचे फायदे:
- गुगलचा सपोर्ट – गुगल हे संपूर्ण जगातील एक विश्वासार्ह सर्च इंजिन आहे .कोणत्याही गोष्टीची शहानिशा करण्यासाठी ती गोष्ट गुगलद्वारे तपासण्यात येते, म्हणून तुमच्या व्यवसायाची माहिती सुरक्षितपणे सर्व ग्राहकांपर्यंत पोचवण्याचं काम गुगल करत असते.
- ग्राहकांशी संवाद – तुम्ही प्रविष्ट केलेल्या माहितीनुसार ग्राहकांकडून योग्य प्रतिसाद मिळतो. ग्राहकांना थेट संपर्क साधता येतो. एकाचवेळी अनेक ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी गुगल माय बिझनेस हे टूल अत्यंत उपयोगी आहे.
- व्यवसाय उत्त्पन्न – जास्तीत जास्त ग्राहक मिळाल्यामुळे अर्थातच तुमच्या व्यावसायिक उत्पनात वाढ होते .तसेच ऑनलाईन येणाऱ्या सकारात्मक रिव्ह्यूजमुळे व्यावसायिकाचा आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक रिव्ह्यूजमुळे सुधारणा करण्यास मदत होते.
सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी (One Person Company)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/