लॉकडाऊन काळात जपा मानसिक आरोग्य
कोव्हिड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारला लॉकडाऊन सारखं कठोर पाऊल उचलणे भाग पडले. यामुळे बऱ्याच कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले. कोरोनाच्या संक्रमणावर कुठल्याही मर्यादा ठेवण्याचं काम फक्त “लस”च करू शकते, मात्र अद्याप तरी यावर कुठलाही लस शोधण्यात आली नाही म्हणून दैनंदिनआयुष्यावर मर्यादा घालून या विषाणूला स्वत:पासून दूर ठेवणे आपल्या आणि सरकारी यंत्रणेच्या हाती उरले आहे. अशा परिस्थितीत, आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे कदाचित मानसिक तणावही वाढू शकतो. आजच्या लेखात आपण वाढलेलं लॉकडाऊन आणि त्याचे मानसिक आरोग्यावर होत असणाऱ्या परिणामांची आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी काय करावे, याबद्दल माहिती घेऊ.
संकटकाळातील आर्थिक नियोजन
स्वत:ला कुठल्यान् कुठल्या कामात व्यस्त ठेवा –
- बेंगलोरमोधील निमहन्सच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सचे संचालक डॉ. बी.एन.गंगाधर यांच्या मते, मानसिक आरोग्य या विषयावर उघडपणे चर्चा करून मार्ग शोधायला हवे, सध्याच्या काळाची ती नितांत गरज आहे. विशेष म्हणजे या लॉकडाऊन काळात वृद्ध आणि लहान मुलांना व्यस्त ठेवणे आव्हानात्मक असू शकतं.
- बाहेर असणारं दुषित वातावरण पाहता घरातच बसून राहणे सोयीचे आहे, परंतु घरात थांबून वारंवार कोरोना उद्रेकाच्या बातम्या ऐकणं तुमच्या डोक्याचा ताप वाढवू शकतं. म्हणून सतत तेच तेच न पाहता/वाचता डब्ल्यूएचओच्या आरोग्यदायी सुचनांचे पालन करा, शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार घ्या, व्यायाम करा.
- सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हे मानसिक आरोग्यासाठी एक टॉनिक आहे.
आमुलाग्र बदलांना रोखणारी दुर्मिळ संधी !
अशांत घर मन सुद्धा अस्वस्थ करते –
- आपल्या सभोवतालच्या गोष्टींचा आपल्या मनावर चांगला-वाईट परिणाम होत असतो.
- सध्या घराबाहेर अगोदरच भीषण परिस्थिती आहे. म्हणून निदान घर शांत,नीचनेटके व स्वच्छ ठेवून मन प्रसन्न ठेवू शकतो.
कोरोनाविषयीची जास्त माहिती घेऊ नका –
- दिवसभरात टीव्ही किंवा मोबाईलवर आपल्याला नव्या रूग्णांपासून ते मृतांपर्यंत सर्व माहिती मिळत असते, यामुळे अर्थातच एक प्रकारची भिती वाटू शकते.
- खोकला किंवा शिंकल्यावरही आपल्या मनात शंका येऊ शकतात , अशावेळी अफवांवर लक्ष न देता सल्ला घेण्यासाठी काही विश्वासार्ह वेबसाइट्स पाहू शकता. उदाहरणार्थ – who.int किंवा cdc. gov
असा करा लॉकडाऊनचा सदुपयोग
सकारात्मक कामे करा –
- जगभरात सर्वत्र निराशाजनक वातावरण पसरले आहे, लॉकडाऊनमुळे घरी बसून आहोत म्हणून जास्त कंटाळूवाणं वाटू शकतं पण असं होऊ न देता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काही गोष्टी करा, आपल्याला महत्त्वाची वाटणारी कामे लिहून ठेवा त्यानुसार नियोजन करा.
- ऑफिसच काम वेळेत पूर्ण करून राहिलेल्या वेळेत काही नवीन गोष्टी करा, गाणी म्हणा, वाचा, लिहा, अगदी डान्स सुद्धा करून पहा, मुलांसोबत बैठे खेळ खेळा, रेसिपी बनवून पहा. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम, योगासने करा.मन:शांतीसाठी मेडिटेशन करा. तुम्हाला आनंद देणा-या सर्व गोष्टी करून बघा यामध्ये एक विलक्षण आनंद व सकारात्मक उर्जा मिळते.
कृतज्ञता दाखवा –
- कोरोना ही जागतिक महामारी आहे. याच्यापासून सामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करणं गरजेचं होतं. मात्र यामुळे कित्येक लोकांचं नोकरी व व्यवसायात बरंच नुकसान झालं असेल. आर्थिक मंदीमुळे ब-याच लोकांना आपली नोकरी ही गमवावी लागली.
- मात्र या आजाराचा होणारा आपल्यावर व आपल्या कुटुंबियांवर होणारा प्रभाव आपण टाळला, आपण सर्वजण आपापल्या घरात सुरक्षित आहोत यासाठी देवाप्रती कृतज्ञता दाखवा. एक आंतरिक समाधान वाटेल.
- तसेच या संकटातून देशाला सोडविण्यासाठी प्रत्येक स्तरांवर प्रयत्न होत आहेत. हजारो डॉक्टर्स, पोलिस सदैव सेवेसाठी तत्पर आहेत त्यांचे आभार व्यक्त करा.
कोरोना व्हायरसचे पृथ्वीवर झालेले परिणाम
शक्य झाल्यास घरा भोवतालच्या परिसरात जा –
- निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवणं हे शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी चांगलं असतं. यामुळे मनातील नैराश्य कमी होण्यास मदत होते.
- लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर जाणं शक्य नसलं तरी घराची गच्ची, अंगण, सोसायटीचे पार्किंग/ गार्डन अशा ठिकाणी जात येईल. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे.
मानसिक आरोग्याचे महत्त्व –
- समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तींचे मानसिक आरोग्य याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. कोरोनामुळे ओढवलेलं हे संकट पूर्णपणे अनपेक्षित व अनिश्चित आहे.
- झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी दररोज एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. काही ठिकाणी डिजिटल सोयी सुविधा कामी येत नाहीत मग अशा ठिकाणी प्रत्यक्षात स्वंयसेवकांच्या मदतीने परिस्थिती हाताळली जाते.
- फक्त मानसिक चिंता च नाही तर अशा लोकांना तंबाखू, मद्यपानासारखं व्यसन देखील असतं. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर तर होतोच पण मन सुद्धा अस्वस्थ व निराश होत जाते. या लोकांच्या ज्यांच्या अगोदरच आरोग्य समस्या आहेत अशा लोकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या घातक सवयीच आपलं मानसिक आरोग्य बिघडवू शकतात.
कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा
योग्य आहार व व्यायामाद्वारे आपण शारीरिक आरोग्याची काळजी घेतच आहोत मात्र वर दिलेल्या गोष्टी लक्षात घेऊन आपण आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकतो. लॉकडाउनच्या कालावधीतही शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपा. घरी राहा, सुरक्षित राहा.
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/