अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग १

Reading Time: < 1 minute जगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते. देशाचा सर्वागीण विकास करायचा असेल तर, देशाची अर्थव्यवस्था चांगली असणे असणे अत्यंत आवश्यक किंबहुना त्यावरच देशाची प्रगती अवलंबून असते. रोजच्या वापरात, बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रात वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ अनेकांना माहिती नसतात. या शब्दांचे अर्थ समजावण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे  करत आहोत. 

भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय – भाग १

Reading Time: 4 minutes सामान्यतः प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक वेळ येते जेव्हा आता पुढे काय करायच? असा प्रश्न स्वत:ला विचारावा लागतो. हल्ली करिअर मार्गदर्शन या नावाखाली अनेक कार्यक्रम होतात. १० वी १२ वी करून बाहेर पडलेली मुले अशा कार्यक्रमांना भरपूर फी भरून हजेरी लावतात. तिथे अनेक पर्याय सांगितले जातात, तेव्हा त्यांचा संभ्रम अजुनच वाढतो.  साधारण दशकापूर्वी परिस्थिती वेगळी होती, संधी कमी असल्या तरी पात्र असणा-यांची संख्याही जेमतेमच असायची. मग कोणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा सरकारी नोकरी पत्करणे असे पर्याय निवडून अगदी यशस्वी आयुष्य जगू शकत असे. पण “पारंपरिक प्रसिद्ध”  पर्यायांशिवाय अनेक ऊत्तम करियर पर्याय सध्या उपलब्ध आहेत.  

Parkinson law: वेळेच्या नियोजनासाठी पार्किन्सनचा सिद्धांत

Reading Time: 3 minutes सन १९५५ साली, प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक ‘सिरील नॉर्थकोट पार्किन्सन यांनी, “काम पूर्ण होण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ दिला तर काम वाढलं जातं व कामाची चालढकल होते” सिद्धांत जगासमोर मांडला. याचा प्रमुख फायदा उत्पादन क्षेत्रात असणाऱ्यांना झाला. कारण वेळेत काम पूर्ण झालं नाही तर आपली उत्पादकता कमी होते व याचा परिणाम गुणवत्तेवर होऊ शकतो. पुढे अनेक अर्थतज्ञांसाठी सुद्धा हा सिद्धांत मोलाचा ठरला. 

आयटीआर दाखल केला नाही? ३१ डिसेंबर पूर्वी फाइल करून दंडाची रक्कम वाचवा

Reading Time: 3 minutes कलम २४F नुसार आयकर कायदा २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून जास्त कडक करण्यात आला आणि मूल्यांकन वर्ष २०१८-१९ पासून तो जास्त प्रभावीपणे अंमलात आला. आपले उत्पन्न जर करपात्र मर्यादित रकमेपेक्षा कमी असेल तर आपण वेळेत उत्पन्न कर भरून उशीराची फी भरणे टाळू शकतो. ३१ ऑगस्ट ही तुमची  इन्कम टॅक्स  रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याची शेवटची तारीख होती. पण तरीही आपण रिटर्न भरला नसेल, तर दंड टाळण्यासाठी आपण ३१ डिसेंबर पूर्वी भरणे आवश्यक आहे. 

तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का?

Reading Time: 3 minutes अलबर्ट आईन्स्टाईन यांना कोण ओळखत नाही? जगातील या थोर शास्त्रज्ञाला वाटणारी भीतीही अनाठायी नव्हती. कारण त्यांच्या चाणाक्ष नजरेला  झपाट्याने वाढणाऱ्या टेक्नॉलॉजिचा होणारा दुष्परिणाम आधीच जाणवला होता. आज मोबाईल किंवा स्मार्टफोन नावाचं यंत्र अलबर्ट आईन्स्टाईन यांची भीती सार्थ ठरवीत आहे. 

नोकरी सोडल्यावर तुमचे पूर्ण आणि अंतिम देय आता मिळवा २ दिवसांत

Reading Time: < 1 minute नोकरी सोडल्यानंतर आपले पूर्ण आणि अंतिम देय (full and final payment ) मिळविण्यासाठी साधारणत: एक महिना लागतो.  परंतु, वेतन अधिनियम२०१९ नुसार, आपले पूर्ण आणि अंतिम देय दोन दिवसात मिळणार आहे. हा नियम ८ ऑगस्ट २०१९ रोजी अधिसूचित करण्यात आला आहे. 

नोकरी जाईल याची सारखी भीती वाटते? मग हे वाचा…

Reading Time: 3 minutes सध्या एकूणच आर्थिक, औद्योगिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेतला तर, आहे ती नोकरी टिकेलच याची शाश्वती फारशी राहिलेली नाही. जागतिक मंदीने भारतालाच नाही तर, जगाला वेढलेलं आहे. अशात हवं तेवढं उत्पादन करण्याची क्षमता घटलेली आहे, त्यामुळे कामगार किंवा कर्मचा-यांची गरज आणि मागणी कमी झालेली आहे. नोकरी कशी आहे, कुठे आहे, यापेक्षाही नोकरीच्या संधी किती आहेत, याला जास्त महत्त्व आलं आहे. अशात आपली चालू नोकरी, ज्यावर आपली उपजिविका चालते, ती गमावून बसतो की काय? या मानसिक तणावामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. 

आजपासून NEFT चोवीस तास उपलब्ध!

Reading Time: < 1 minute सध्या ऑनलाईन बँकिंगचा वापर झपाट्याने वाढला आहे. बँकेकडूनही ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध ऑफर्स व सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. आता यामध्ये भर पडली आहे एका नवीन नियमाची! नवीन नियमाप्रमाणे आता एनईएफटी (NEFT) सुविधा आता २४× ७ तास वापरता येणार आहे. यामुळे दिवसभरात केव्हाही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील. 

व्यायाम – आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा भाग

Reading Time: 3 minutes नियमित व्यायाम केल्याने तुम्ही केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तचं नव्हे तर आर्थिक स्थितीनेही श्रीमंत ही होऊ शकता. हे विधान अविश्वसनीय वाटले ना? पण होय, व्यायाम तुम्हाला आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बनवू शकतो. ते कसे, याच्या ८ क्लृप्त्या पाहुयात.

प्रॉव्हिडन्ट फंडचे ५ महत्वाचे फायदे

Reading Time: 2 minutes कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) देशातल्या पगारदारांसाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. ईपीएफचा लाभ २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मिळतो. दुर्दैवाने, मागील काही वर्षे व्याजदरात सातत्याने घट होत होती. परंतु,सध्या व्याजदर वाढून ८.६५% झाला आहे. पगारामधून ईपीएफ कपात केली जात असल्यामुळे, या लोकप्रिय गुंतवणूक योजनेचा अवलंब करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नाही. तसेच इथे कर्मचारी व नियोक्ता (Employer) दोघांचेही ५०-५०% योगदान असल्यामुळे, एकूण गुंतवणुकीच्या निम्मी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते व निम्मी रक्कम नियोक्ता भरत असतो.