गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट – आर्थिक नियोजनाची फरफट?

Reading Time: 3 minutes “दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल…” आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानीही झाली, पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही आपण मात करण्यात आपल्याला यश मिळेल.  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरवात होते. अनेकजण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. 

“वर्क फ्रॉम होम”साठी काही महत्वाच्या टीप्स

Reading Time: 3 minutes कोव्हिड-१९ या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत संपर्काने होते. याचे तीव्र व भयानक परिणाम जगातील सर्वच देश भोगत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी अनेक कंपन्यानी त्यांच्या कर्मचा-यांनी घरी बसून म्हणजे वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगितले आहे. घरी बसूनही तुमचं काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी खालील काही टिप्स लक्षात ठेवा. 

कोरोना व्हायरसविषयीचे ८ गैरसमज

Reading Time: 3 minutes सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले असून भारतातही याचे अनेक रुग्ण दिसून येत आहे. जगभरात पसरलेल्या या व्हायरसबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भिती निर्माण झाली आहे. काहींनी याबाबत वेगवेगळे गैरसमजही करून घेतले आहेत.  सोशल मिडियावरून या विषयीच्या बऱ्याच बातम्या किंवा माहिती मिळत असते. पण यामध्ये बरेच गैरसमज देखील पसरवले जात आहेत. याचा चुकीचा प्रसार होऊ नये यासाठी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. 

तरुणांसाठी गुढीपाडवा व नवीन आर्थिक वर्षाचे संकल्प

Reading Time: 3 minutes सर्वसाधारणपणे उच्च शिक्षण पूर्ण होऊन नोकरी व्यवसायास सुरुवात केल्यापाऊन त्यात स्थिरस्थावर होईपर्यंत ३० वे वर्ष चालू होते. तेव्हा या वयोगटातील व्यक्तीने येणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, खरं तर कोणताही मुहूर्त न पाहता लवकरात लवकर काही नवे संकल्प करावेत. 

जीडीपीत वाढ म्हणजेच विकास, ही फसवणूकच!

Reading Time: 4 minutes जीडीपीची वाढ हाच विकास असे मानणारा आणि मानवी आनंदाकडे दुर्लक्ष करणारा पाश्चात्य अर्थविचार हाच महत्वाचा मानला गेल्याने आज देशाच्या विकासात अनेक विसंगती निर्माण झाल्या आहेत. भारत नावाच्या वेगळ्या देशाला त्याच्या प्रकृतीशी सुसंगत अर्थविचार हवा आहे. पण बहुतांश भारतीय अर्थतज्ञ पाश्चात्य अर्थविचारांच्या आहारी गेल्याने त्या विचारात १३६ कोटी भारतीयांना कोंबण्याचे पाप त्यांनी केले आहे. 

कोरोना आणि कायदा

Reading Time: 2 minutes कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. भारत सुद्धा ह्याला अपवाद राहिलेला नाही. ह्या प्रचंड वेगाने फोफावणाऱ्या आजारावर नियंत्रण आणणे हे भारताच्या सरकारपुढे मोठे आव्हान झाले आहे आणि सरकार हे आव्हान मोठ्या शर्थीने पेलताना दिसत आहे. भारतात कुठलेही निर्णय घेण्यासाठी सरकारला कायद्याचे पाठबळ लागते. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कुठले कायदे हाताशी घेतले आहेत हे आपण ह्या लेखातून जाणून घेऊया.

आर्थिक नियोजन आणि स्त्री – आर्थिक सल्लागाराच्या नजरेतून

Reading Time: 3 minutes गेली अनेक वर्षे आर्थिक सल्लागार म्हणून काम करताना लक्षात आले की सर्वसामान्यपणे स्त्रिया आपल्या आर्थिक नियोजनात काहीशा मागे असतात. अर्थार्जन आणि आर्थिक नियोजन ही कामे कौटुंबिक आयुष्यात पुरुषांची मक्तेदारी असल्याचा एक समज नकळतच आपल्या समाजमनात रुजलेला आढळतो आणि स्त्रियादेखील त्यांच्यावरील इतर सर्व जबाबदाऱ्यांची ओझी पेलता पेलता आर्थिक नियोजनाकडे काहीसे दुर्लक्ष करतात. त्यात देखील एकट्या स्त्रियांची अवस्था अजूनच बिकट असते. “महिलांचे आर्थिक नियोजन” या विषयावर थोडक्यात आढावा. 

नोकरी जाण्याची लक्षणे – कसा कराल परिस्थितीचा सामना?

Reading Time: 4 minutes तंत्रज्ञानातील बदल, वाढत्या किमतीचा दबाव या सगळ्या गोष्टींमुळे बीएसएनएल सारख्या कंपनीवर वाईट दिवस आले व याचा परिणाम टेलिकॉम क्षेत्रावर झाला. तसेच आयटी क्षेत्रातही याचे पडसाद दिसून आले .’कॉग्निझेन्ट’ सारख्या मोठ्या कंपनी मधून तब्बल ५०० आयटी कर्मचाऱ्यांना काढण्यात आले. नोकरी गमावणे यामागे केवळ आर्थिक मंदी किंवा त्या क्षेत्रातील घसरण अशी काही करणे नसतात, तर कित्येकदा आपली वैयक्तिक कामगिरी सुद्धा तेवढीच कारणीभूत असते. कर्मचाऱ्यांचे काम चांगले नसेल, तर कोणताही इशारा न देता कामावरून कमी करण्याची कार्यवाही करण्यात येऊ शकते. सतत पुढे जाण्यासाठी ‘जागरूकता’ ही गुरुकिल्ली आहे. म्हणून कंपनीमध्ये चालणाऱ्या घडामोडी,कंपनीचं वित्तीय धोरण, आर्थिक घसरण किंवा सुधारणा याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. 

महिलांचे आर्थिक नियोजन – आर्थिक नियोजनाची सप्तपदी

Reading Time: 4 minutes नियोजन कौशल्य ही महिलांना मिळालेली एक ईश्वरी देणगी आहे. त्याचा वापर करून महिला उत्तम आर्थिक नियोजन व गुंतवणूक नियोजन देखील करू शकतात.  फक्त त्यांनी या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणे महत्वाचे आहे. यासाठी सुरुवात तुमच्या स्वतःच्या घरापासून करा. लग्नामध्ये पतीसोबत ज्याप्रमाणे सप्तपदी चालतात तशीच ही सप्तपदी चाला आर्थिक नियोजनासाठी ! परंतु ही सप्तपदी चालण्यासाठी विवाह करण्याची गरज आहेच असं नाही.

जॅक वेल्श – उद्योग जगतातील एक “हरवलेला तारा”

Reading Time: 3 minutes जॅक वेल्श! कॉर्पोरेट जगतातील एक मोठं नाव. गेल्या दोन दशकांपासून कॉर्पोरेट जगतात ज्यांच्या नावाचा मोठा दबदबा आहे अशा जॅक वेल्श यांचे मंगळवारी २ मार्च २०२० रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते.  वेल्श हे एक यशस्वी व्यवसाय व्यवस्थापक होते. जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीमध्ये सन १९८१ पासून सन २००१ पर्यंत वेल्श यांनी सीईओ म्हणून काम केले आहे. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचून, दोन दशकांपर्यंत अधिराज्य गाजवणे, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद होती.