बजाज फायनान्स- मंदीमधली संधी

Reading Time: 3 minutes भारतीयांची क्रयशक्ती कमी आहे, पण लोकसंख्येचा बोनस घेतला तर त्यात प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता ओळखणारे मंदीच्या वातावरणात चांगला व्यवसाय करत आहेत. सर्वसामान्यांना सोबत घेतल्यास आजच्या आर्थिक वातावरणात मोठा बदल होऊ शकतो. ती क्षमता आपण एक समाज म्हणून कधी ओळखणार आहोत? 

‘फास्टॅग’विषयी सारे काही…

Reading Time: 2 minutes टोलनाक्यावरची ट्रॅफिकची भलीमोठी लाईन हा अनेकांचा नित्य अनुभव असेल. अनेकदा सुट्टे पैसे आणि सुट्ट्या पैशांच्या ऐवजी दिली जाणारी चॉकलेट्स हा वादाचा आणि विनोदाचाही मुद्दा झाला होता. पण या साऱ्या गोष्टी टाळण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना करण्यात आली आहे. ती म्हणजे फास्टॅग! काय आहे फास्टॅग, त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याचे फायदे काय, या साऱ्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊ. 

बँक व्यवहार आणि तक्रार निवारण

Reading Time: 3 minutes बँकिंग व्यवसाय कसा चालतो, ते आपल्याला माहीत आहेच. जनतेकडून व्याजाने ठेवी स्वीकारून भांडवलाची जरुरी असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना अधिक व्याजाने देणे, हा कोणत्याही व्यापारी बँकेचा मुख्य व्यवसाय. या बँका सहकारी, सरकारी व खाजगी स्वरूपाच्या आहेत. तसेच, नव्याने अस्तित्वात आलेल्या पेमेंट बँक याही बँकांच असून रिझर्व बँकेचे त्यांच्यावर नियंत्रण आहे. मुख्य व्यवसायाशिवाय ग्राहकांना लॉकर पुरवणे, पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध करून देणे, क्रेडिट कार्ड देणे, गुंतवणूक विमा यासंबंधी सेवा पुरवणे यासारखी अनेक कामे बँका करतात यातील काही सेवा विनामूल्य तर काही सेवा मूल्य आकारून देण्यात येतात. 

बँका आणि मुदत ठेवींची सुरक्षितता

Reading Time: 3 minutes ‘सुरक्षित’ समजल्या गेलेल्या मुदतठेवीमधे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेवर अचानक रिझर्व बँकेने निर्बंध घालून त्यांच्या कर्जवितरणातील घोटाळा उघड केला. त्याचपाठोपाठ शेअर बाजारात सुचीकृत असलेल्या लक्ष्मीविलास बँकेवर देखील निर्बंध लागू झाले. या लागोपाठच्या घटनांनी सामान्य गुंतवणूकदार पुरता भांबावून गेला. 

आर्थिक साक्षरता शिबिर: जन निवेश अभियान

Reading Time: 3 minutes आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी, सीएफए सोसायटी इंडियातर्फे १५ ते  २९ नोव्हेंबर या कालावधीत जन-निवेश अभियान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी एकूण १४ दिवसांचा “सायकल” प्रवास  दौरा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ५००० स्वयंसेवकांनी भाग घेतला असून, या दौऱ्याची सुरुवात  १५ नोव्हेंबर रोजी एकत्रितपणे गुडगाव व मुंबई पासून करण्यात आली आहे. यानंतर  दोन्ही भागातील स्वयंसेवक अहमदाबाद येथे भेटतील व इंदोरला या दौऱ्याची आणि अभियानाचीही सांगता करण्यात येईल. 

मिलियन, बिलियन म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes अनेकदा मिलियन, बिलिअन आणि ट्रीलिअन मधले आकडे गोंधळून टाकणारे असतात. १०० बिलिअन डॉलर्स म्हणजे नक्की किती रुपये? असे प्रश्न आपल्या मनात येतात आणि अनेकवेळा उत्तरे न मिळताच ते विरुनही जातात. या लेखात आपण मिलियन, बिलिअन म्हणजे काय? या शब्दांचे भारतीय मूल्य किती? अशा प्रशांची उत्तरे समजून घेणार आहोत.

मुलांना अर्थसाक्षर कसे बनवाल?

Reading Time: 3 minutes आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा दोष नक्कीच आहे की वैयक्तिक आर्थिक नियोजन किंवा गुंतवणूक विश्वाची साधी तोंडओळख देखील त्यात करून दिली जात नाही. त्यामुळे अगदी कॉमर्स, फायनान्स, इकॉनॉमिक्स अशा ‘आर्थिक’ विषयांमधून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली मुलं देखील याविषयी अनभिज्ञ आणि काही प्रमाणात अनुत्सुक देखील दिसतात. इतर विषयाचे शिक्षण घेतलेल्यांची तर बातच सोडा. अर्थातच अशा परिस्थितीमुळे महागड्या घोडचुका होण्याची शक्यता वाढते. पालक म्हणून आपल्यातल्या प्रत्येकालाच असे वाटत असतं की आपल्या मुलांना जगात आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी सक्षम बनवलं पाहिजे. त्यासाठी त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आपण उचलतो. त्याचबरोबर गुंतवणूक विषयाची देखील प्राथमिक प्रशिक्षण त्यांना मिळते आहे ना, हे बघणं गरजेचं आहे.

विमा पॉलिसी आणि त्यासंबंधीचे तक्रार निवारण

Reading Time: 3 minutes विमा व्यवसाय हा बहुतांशी विक्री प्रतिनिधींमार्फत होत असल्याने, अधिक व्यवसाय मिळवण्याच्या नादात त्यांच्याकडून चुकीची माहिती सांगितली जाण्याची शक्यता असते. यातून तक्रारी निर्माण होवू शकतात. काही दावे विमा कंपन्यांकडून अयोग्य कारणाने नाकारले जाऊ शकतात किंवा अंशतः मंजूर केले जातात. या तक्रारींच्या निवारणासाठी प्रत्येक कंपनीची स्वतःची अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा असून योग्य कालावधीत तक्रार न सोडवली गेल्यास अथवा या संबंधीचा निर्णय मान्य नसल्यास विमा लोकपालाकडे तक्रार करता येते. काही असामाजिक लोकांकडून चुकीचे दावेही केले जातात.

चिट फंड म्हणजे नक्की काय?

Reading Time: 3 minutes चिट म्हणजे वचनचिठ्ठी! असंघटित क्षेत्रातील लोक, ज्यांचा बँकिंग व्यवहाराशी अत्यंत कमी संबंध येतो, अशा समान उत्पन्न असलेल्या गरजू लोकांना आपल्या आर्थिक गरजा ताबडतोब भागवण्यासाठी या फंडाचा उपयोग होतो. भिशीच्या जवळपास जाणारा हा बचतीचा प्रकार असून, त्यास अनेक वर्षांची परंपरा आहे. काही चिट फंड कंपन्या १०० वर्षाहून जुन्या असून अजून व्यवस्थित चालू आहेत. 

सरकारी कंपन्यांवरील विश्वास की खासगी कंपन्यांची कार्यक्षमता?

Reading Time: 4 minutes सरकारी उद्योग, व्यवस्था कार्यक्षम नाहीत, हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्या विश्वासार्ह आहेत. आणि खासगी कंपन्या जेवढ्या कार्यक्षम आहेत, तेवढ्या त्या विश्वासार्ह नाहीत! खासगीकरणाचे लोण जगभर आणि भारतात वेगाने पसरत असताना हे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. खासगीकरणाचा एक टप्पा पूर्ण झाला असताना त्याच्या अपरिहार्य रेट्यात भारत यापुढे कोणता मार्ग निवडतो, हे नजीकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईल.