गुंतवणुकीचा आधुनिक पर्याय: एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड

Reading Time: 2 minutes प्रगत देशांमध्ये साधारण ७०-८० % गुंतवणूक शेअर बाजार, कर्जरोखे, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड मध्ये होते, अमेरिकेत १२०० पेक्षा अधिक प्रकारचे एक्सचेंज ट्रेडेड इंडेक्स फंड आहेत. आपल्याकडे गुंतवणुकीच्या साधनांची मूलभूत अर्थसाक्षरता नसल्याने बहुतेक गुंतवणूकदार पारंपरिक गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करतात.

शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

Reading Time: 4 minutes शेअर बाजार म्हटलं की जोखीम आली. पण बहुतेक सामान्य गुंतवणूकदार केवळ ‘सुखाचे सोबती’ असल्याप्रमाणे वागतात. सुखाच्या काळात, म्हणजेच बाजार वरवर जात असताना, गुंतवणूकदारांच्या तोंडी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असे शब्द असतात. पण दुःखाच्या काळात, म्हणजेच बाजारातील पडझडीच्या काळात, तेच ‘हम आपके है कौन?’ असं विचारायला लागतात. अशा चढउतारांना एक समस्या म्हणून नव्हे तर शेअर बाजाराचा गुणधर्म म्हणून स्वीकारले पाहिजे. हीच मार्केट मधील रिस्क किंवा जोखीम आहे आणि तिला तोंड देण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे असते. 

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ३

Reading Time: 4 minutes म्युच्युअल फंड आस्थापनांना विविध स्वतंत्र नियंत्रकांसोबत काम करावे लागते. जसे की रिझर्व्ह बँक ही रोखे बाजार तसेच आंतरराष्ट्रीय विनिमय बाजाराचे स्वतंत्र नियंत्रक म्हणून काम पाहत असते. त्यामुळे म्युच्युअल फंडांना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांना अधीन राहूनच रोखे, आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुका, परदेशी गुंतवणूकदार यांच्यासोबत काम करता येते.

शेअर बाजार: ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!

Reading Time: 3 minutes शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जास्तीची जोखीम. ही थिअरी आजकाल सर्वांना तोंडपाठ असते. मात्र बहुसंख्य गुंतवणूकदारांमध्ये ही जोखीम उचलायची तयारी फक्त बाजार वर जातानाच असते. बाजारात पडझड सुरु झाली की या लोकांची चुळबुळ सुरु होते. मार्केट पुन्हा कधी वर जाणार, पुन्हा जागतिक मंदी येणार का? अमक्या चॅनेल वर पुढील दोन वर्षे खराब जातील सांगितलं मग गुंतवणूक थांबवूया का? अशा विचारणा सुरु होतात. 

म्युच्युअल फंड क्या है? – भाग २

Reading Time: 3 minutes श्रीगणेशाची स्थापना करण्याची एक विधिवत पद्धती आपल्याकडे परंपरेनुसार चालत आली आहे. त्यासाठीची संहिता प्रत्येक घरात पाळण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या घरात अनुभवी ज्येष्ठ असतील तिथे त्रुटी राहत नाही. परंतु नवथर मंडळी असतील तर बहुतेकदा सोपस्कार पार पाडले जातात. असंच काहीसं म्युच्युअल फंड व त्यातील विविध पर्यायांची कार्यपद्धती माहित न करून घेता जाहिरात बघून कमिशन वाचणार म्हणून डायरेक्ट गुंतवणूकदार बनतात. मग पदरी मोदकाचा प्रसाद येण्याऐवजी खिरापत सांभाळण्याची वेळ येते.

निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना

Reading Time: 3 minutes गुंतवणुक करताना आपल्यासाठी प्राधान्यक्रम हा मुद्दलाची सुरक्षितता, रोखता आणि नियमित उत्पन्न अशा प्रकारे असतो. त्याशिवाय चलनवाढीला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकदेखील करावी लागते आणि इन्कम टॅक्स देखील कमीत कमी बसेल हे पाहावे लागते. मात्र ‘आखूड शिंगी बहुदुधी’ अशी सर्वगुणसंपन्न गुंतवणूक योजना कुठलीच नसते. विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि त्यांची एकत्र मोट बांधून, पोर्टफोलिओ बनवून आपल्याला मार्ग काढावा लागतो. हे रिटायर्ड लोकांना माहिती असलेच पाहिजेत असे विविध गुंतवणूक पर्याय कुठले आणि त्यांचे गुणधर्म काय, हे आपण आज पाहू. मात्र प्रत्येक पर्यायात किती रक्कम गुंतवावी हा प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

Reading Time: 4 minutes शेअर घेऊ की रोखे की कमोडीटी घेऊ याचा गुंतवणूकदाराने विचार करण्यापेक्षा पात्रताधारक फंड व्यवस्थापक गोळा झालेल्या रकमेचे नियोजन करत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक किमान १,००० रुपयांपासून तर मासिक गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरु करू शकतो. काही फंड घराणी मासिक १०० रुपयांपासून देखील गुंतवणूकीची सुविधा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोकड सुलभ असून गरज पडल्यास विना थांबा तुम्ही काढू शकता. म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त इतर गुंतवणूक साधनांमधे एकल जोखीम – एकल परतावा असे धोरण दिसून येते.

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes सेवानिवृत्तीपश्चात आपल्या आर्थिक समीकरणांमध्ये अमुलाग्र बदल होतो. आता आपली आर्थिक गुंतवणूक हाच मासिक उत्पन्नाचा स्रोत बनतो. त्यामुळे साहजिकच गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि आपली उद्दिष्टे पूर्णपणे बदलून जातात.

बांधकाम व्यवसायाचे भवितव्य

Reading Time: 8 minutes मी आता पंचवीस वर्षांहून अधिक काळ रिअल इस्टेटमध्ये वेगवेगळ्या भुमिकांमधून काम केलंय म्हणून काम केल्यामुळे या “रुग्णाविषयी” थोड्याफार गोष्टी जाणतो ज्यामुळे आपल्याला रोगाचं स्वरूप समजू शकेल. रोगाचं निदान झालं तरच आपल्याला योग्य उपचाराचा विचार करता येईल. इथे सगळ्यात पहिला व महत्वाचा नियम म्हणजे आपल्या “मायबाप” सरकारचा देशाविषयीचा (म्हणजे मतदारांविषयीचा) जो दृष्टिकोन आहे त्यानुसार देशातला कोणताही व्यवसाय चालवला जातो व रिअल इस्टेटही या नियमाला अपवाद नाही. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठंसं, सगळयाच देशांना हे लागू होत नाही का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. 

गुंतवणुकीच्या चुकीच्या कल्पना

Reading Time: 3 minutes समाज माध्यमं आणि वृत्तपत्र, टीव्ही अशी पारंपरिक माध्यमांमधून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अर्थसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य समाजापर्यंत अनेक संकल्पना पोचल्या आहेत. खरेतर या सगळ्या माहितीचा भडीमार सातत्याने सुरु आहे. मात्र या एकमार्गी संभाषणामुळे गुंतवणूकदारांच्या सवयी कितपत बदलत आहेत? तर फारशा नाहीत. याचे एक महत्त्वाचे कारण आपण गेल्या आठवड्यात बघितले – गुंतवणूक क्षेत्रातील ग्राहकाभिमुख असणाऱ्या वितरक, एजन्ट किंवा रिलेशनशिप मॅनेजर अशांच्या गैरप्रथा आणि त्यातून गुंतवणूकदारात निर्माण होणारी अनास्था आणि उदासीनता. त्याचबरोबर दुसरे मला जाणवलेले एक कारण म्हणजे गुंतवणूकदारांच्या मनातल्या अनेक चुकीच्या कल्पना.