व्यायाम का पैसा? तुम्ही काय निवडाल? 

Reading Time: 2 minutes पैसा आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी एकमेकांवर काही प्रमाणात अवलंबून आहेत. साधारणतः जर पैसा आणि व्यायाम यापैकी कुठलीही एक गोष्ट निवडण्याचा विकल्प दिल्यास कुणीही पैसा निवडेल, कारण भौतिक गरजा पैशाशिवाय पूर्ण करणे अश्यक्य आहे. असे असले तरी  येल (Yale) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ मधील अहवालांमधून एक वेगळा निष्कर्ष समोर आला आहे. या अहवालनुसार पैशाच्या तुलनेत व्यायामामुळे माणूस जास्त आनंदी राहतो, आहे ना आश्चर्यकारक? शास्त्रज्ञांच्या मते, वर्षाला सुमारे १७,५०,००० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीपेक्षा नियमित व्यायाम करणारी व्यक्ती जास्त आनंदी असते. 

अर्थसाक्षर कथा – गुंतवणुकीचे मृगजळ

Reading Time: 4 minutes “अर्थसाक्षर कथा” या सदरामधील आजची कथा फसव्या योजनांच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाला बसलेल्या लाखो रुपयांच्या भुर्दंडाची आहे.

अर्थसाक्षर कथा – संकट दुर्धर आजारांचे

Reading Time: 4 minutes आरोग्य खर्च ही समस्या अनेकांसमोर आवसून उभी असेल. त्यात आरोग्य विमा नसल्यामुळे अजिबातच आर्थिक मदत होत नाही. पण अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका.असाध्य किंवा गंभीर आजार, ऑपरेशन/ औषधोपचार करूनही काहीच फायदा न होता बळावत जाणारा आजार आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, अशा परिस्थितीत आरोग्य विमा नसल्यामुळे हतबल झालेला रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्या मदतीला असतात त्या शासनाच्या विविध योजना व सेवादायी संस्था. या संस्था आर्थिक मदत तर करतातच, पण काही संस्था रुग्णाला व त्याच्या कुटुंबियांना पुनर्वसनासाठीही मदत करतात. 

अर्थसाक्षर कथा – संपत्ती आणि नातेसंबंध

Reading Time: 4 minutes अर्थ म्हणजे पैसा पण अर्थसाक्षरता म्हणजे निव्वळ गुंतवणूक, किंवा आर्थिक नियोजन नव्हे तर, अर्थसाक्षरता म्हणजे परिस्थितीनुसार पैशाचे मूल्य समजून घेणे.  इथे परिस्थिती म्हणजे केवळ जागतिक मंदी वगैरे नव्हे तर, तुमच्या समोर असणारी भावनिक, सामाजिक, कौटुंबिक किंवा इतर काही कारणांमुळे उद्भवणारी परिस्थिती. जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो. पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. लक्षात ठेवा पैसा माणसासाठी असतो, माणूस पैशासाठी नाही. पण आजच्या काळात “पैसा झाला मोठा” अशी परिस्थिती आहे. तुमच्या कष्टाच्या कमाईवर फक्त तुमचा अधिकार आहे हे जरी खरं असलं तरी, तुमच्या जीवलगांप्रती तुमची काही कर्तव्यही आहेत हे विसरून कसं चालेल? आजची कथा अशाच एका जीवलगांप्रती आपलं कर्तव्य विसरलेल्या समीरची आणि त्यामुळे दुखावलेल्या त्याच्या आईची आहे. 

रिच डॅड पुअर डॅड – श्रीमंतीचा प्रवास 

Reading Time: 4 minutes ‘रिच डॅड पुअर डॅड’ मधून मी समजून घेतलेल्या तसेच आत्मसात केलेल्या गोष्टी – माणसानं  स्वावलंबी असावं. जे इतरांच्या नजरेतून सुटत ते पाहणं. ‘‘Kiss – keep It Simple Stupid.’’  कोणतंही काम अवघड न समजता सोप्या रितीने पूर्णत्वास कसं नेता येईल हे पहावं. कोणतीही अडचण आपल्या आंतरिक शक्ती पेक्षा जास्त श्रेष्ठ नसते. अगदी लहानपणापासून मला पडत असलेल्या प्रश्नाचं उत्तर मला ‘रिच डॅड पुअर डॅड’ ने दिलं. 

Reading: वाचनाच्या सहाय्याने करा नैराश्यावर मात

Reading Time: 2 minutes अनेक संशोधनातून असे सिध्द झाले आहे की वाचनाने माणसाच्या बौद्धिक क्षमतामध्ये वाढ होते. अनेकदा वाचन ही एक उपचारपद्धती म्हणून सुद्धा वापरली जाते. अल्पस्वरूपाच्या ताणामध्ये असणाऱ्या किंवा नैराश्य अनुभवत असलेल्या व्यक्तींसाठी वाचन हा उत्तम उपाय असतो. उत्सही,आनंदी करणारं वाचन एक उर्जा देऊ शकते आणि अशी उर्जा माणसाचे आयुष्य घडवते. कित्येक थोर व्यक्ती आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना किंवा कामाची प्रेरणा म्हणून त्यांनी वाचलेल्या एखाद्या पुस्तकाचे नाव सांगतात.

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

दसऱ्याला करा दहन या दहा आर्थिक सवयींचे!

Reading Time: 4 minutes आज दसरा! दसरा हा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आजच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि युद्ध जिंकले, त्यामुळे आज रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. खरंतर रावण हा अत्यंत हुशार, शूर आणि श्रीमंत होता. परंतु त्याचा अहंकार, अट्टाहास त्याच्यासाठी काळ बनून आला. त्याला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला नाही. त्यामुळे शेवटी तो विनाशाच्या मार्गाला गेला. रावणाची प्रतिमा दहन करण्यामागे, “आपल्या मनातील वाईट भावनांचे दहन करणे” हा मुख्य उद्देश आहे. आपल्या मनात अशा अनेक भावना, इच्छा असतात ज्या आपल्यासाठी घातक ठरू शकतात. तसंच, आपल्या काही सवयी आपल्या आर्थिक स्थितीसाठीही घातक ठरू शकतात. आजच्या लेखात जाणून घ्या रावणाच्या दहा तोंडांप्रमाणे असणाऱ्या आपल्या दहा सवयी, ज्यांचं दहन करणं आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे.

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

Reading Time: 3 minutes सर्वसामान्यपणे कोणताही नियम अंगी बाणवायचा असेल, त्याला आपल्या सवयीचा भाग बनवायचा असेल, तर सलग २१ दिवस ती गोष्ट पाहिजे. एक संकल्प करा आणि त्याचे पालन सातत्य आणि शिस्तिने २१ दिवस करा. तुम्हाला त्या संकल्पाची सवय लागलेली असेल. यशाची शिखरे गाठणारे लोक त्यांच्या नियमित सवयीसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे तुम्हालाही आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर आपल्या शरीराला आणि मनाला काही सवयी लावणे गरजेचे आहे. चांगल्या सवयी अंगी बाणवा आणि बघा तुमचे आयुष्य बदलेले असेल.  पुढील नियमांचे पालन करा. या सवयी तुमचे आयुष्य बदलतील –

Work Life Balance : ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

Reading Time: 3 minutes आजच्या धकाधकीच्या आयुष्यात “काम आणि कुटुंब” याची सांगड घालताना म्हणजेच ‘वर्क लाईफ बॅलन्स” करताना जवळपास प्रत्येकाचीच तारेवरची कसरत होत असते. यामुळे अनेक आजार व त्यामुळे येणारे इतर तणाव वाढत चालले आहेत. यावर उपाय काय? कसा करायचा वर्क लाईफ बॅलन्स?  याचं उत्तर अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त खाली दिलेल्या मुद्द्यांचा नीट विचार करा आणि प्रोफेशनक आयुष्यासोबत कौटुंबिक जीवनही आनंददायी करा.